MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 13 May 2020
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड १९ वॉर रुम’च्या कामकाजाचे कौतुक
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘कोविड १९ वॉर रुम’ ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. तसेच येथून होत असलेल्या कामाचे कौतुक केले. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत डॉ. म्हैसेकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करुन त्यांना यावेळी सूचना केल्या. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय तसेच महापालिकेतील संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नवीन महापालिका इमारत रखडणार, आंद्रा-भामा प्रकल्पही लांबणार
एमपीसी न्यूज – कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा महापालिका अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकीय कामकाजासाठीच्या नवीन प्रस्तावित इमारतीचे कामकाज रखडणार आहे. तर, आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाचेही काम लांबण्याची चिन्हे आहेत. तर, यापुढे नवीन निविदा काढल्या जाणार नाहीत. नवीन प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार नाही. आहे ती कामे […]b
15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना आणखी 3 महिने ईपीएफ सहाय्य
नवी दिल्ली : ‘कोरोना’ संकटकाळात उद्योगधंदे पुन्हा हळूहळू मार्गावर येत असताना आर्थिक बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना आणखी 3 महिने ईपीएफ सहाय्य सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज विस्तृत सांगितले.
कॅप जेमीनी कंपनीकडून पिंपरी महापालिकेस १ हजार पीपीई किट सुपुर्द
पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॅप जेमीनी टेक्नॉलॉजिक लिमिटेड कंपनीकडून सीएसआर माध्यमातुन पिंपरी चिंचवड महापालिकेस १ हजार पीपीई किट वाटप करण्यात आले आहे.
शहरातील 29 ठिकाणे ‘कंटेन्मेंट’ झोन, 63 दिवसांत 175 जणांना कोरोनाची लागण
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 29 भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे ही 29 ठिकाणे ‘कंटेन्मेंट’ झोन (प्रतिबंधित क्षेत्र) आहे. या परिसराच्या सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद असून परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई आहे. तथापि, ‘कंटेन्मेंट’ झोन क्षेत्रातूनही काही नागरिक बाहेर पडताना दिसून येतात. दरम्यान, 10 मार्च ते 13 मे या […]
महापौरांच्या नातवाचे सामाजिक दातृत्व; वाढदिवसाचा खर्च टाळून ‘कोरोना’ लढाईसाठी केली मदत
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग लक्षात घेऊन सामाजिक दातृत्वाच्या भावनेने महापौर उषा ढोरे यांचा नातू ज्ञानेश ढोरे याने स्वत:च्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळला आहे. तो खर्च कोरोना रुग्णांवरचे उपचार, त्यासाठीची औषधे आणि इतर सामुग्री अशा सगळ्याच गोष्टींसाठी महापालिकेस 51 हजार रुपयांची मदत केली आहे. घरातूनच समाजकारणाचे बाळकडू मिळालेल्या ज्ञानेश याने […]
रेल्वेने प्रवास करायचा असल्यास आरोग्य सेतू अॅप वापरणे अनिवार्य
नवी दिल्ली | कोरोनामूळे देशांतर्गत विविध गाज्यांत अडकलेल्या मजुरांसाठी, श्रमिकांसाठी केंद्र सरकारने विशेष ट्रेन सुरु केल्या. कालपासून (१२ मे) नवी दिल्लीवरुनही काही विशेश ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. प्रवासासाठी लोकांनी स्टेशनवर गर्दी केली होती. दरम्यान, रेल्वेने आता स्पष्ट केले आहे की, ज्या प्रवाशांना विशेष ट्रेन्सद्वारे आपल्या गावी जायचे आहे, त्यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करणे अनिवार्य असणार आहे.
देशातील छोटे उद्योग होणार नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलला 'चॅम्पियन्स; वाचा सविस्तर
पुणे : देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 'चॅम्पियन्स' होण्यास मदत करण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाने www.Champions.gov.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. हे एक तंत्रज्ञान आधारित नियंत्रण कक्ष आणि व्यवस्थापन माहिती व्यवस्था असलेले संकेतस्थळ आहे. त्यासाठी आधुनिक टूल्सचा उपयोग करण्यात आला आहे.
मुंबई, पुण्याला बूस्टर; MSME वरील निधीचा वर्षाव फायदेशीर
पुणे - कोरोना विषाणूमुळे अत्यवस्थ झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आजपासून सुरू झालेल्या उपचारांचा सर्वाधिक फायदा सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) होणार आहे. देशात सर्वाधिक एमएसएमई महाराष्ट्रातील आणि त्याही मुंबई-पुणे भागात आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सर्वाधिक फटकाही याच भागामध्ये आहे. त्यामुळे, एमएसएमई क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींचा फायदा मुंबई आणि पुण्याला होणार आहे.
पिंपरी : ऐन उकडा अन् त्यात आता...
पिंपरी : लॉकडाउनमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून पिंपरीगावाचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. ऐन उन्हाळ्यात सकाळी, दुपारी आणि कधी कधी रात्रीची वीज गायब होत असल्याने नागरीक हैराण झाले आहेत.
‘घरी जाऊ द्या, नाहीतर उपाशी मरू द्या’
निवारा केंद्रातील नागरिकांचा अन्नत्याग : गावी पाठविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू
कोरोनाच्या आपत्तीत महापालिका आयुक्तांचा बढत्यांचा धमाका!
एमपीसी न्यूज – एकीकडे पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना दुसरीकडे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मात्र ‘क्रीम पोस्ट’ वरील बढत्यांचा धमाका उडवून दिला आहे. शहर अभियंता, दोन सहशहर अभियंता, आठ कार्यकारी अभियंत्यांना एकाचदिवशी बढत्या देत आयुक्तांनी आपल्या नावावर नवा विक्रम केला आहे. दरम्यान, आयुक्त हर्डीकर यांचा महापालिकेतील तीन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाला […]
वाकड परिसरात राहणारे कर्नाटक राज्यातील 300 मजूर ‘लालपरी’तून मूळगावी रवाना
एमपीसी न्यूज – कर्नाटक राज्यातून रोजगाराच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या आणि वाकड परिसरात राहणाऱ्या 300 मजुरांना वाकड पोलिसांच्या मदतीने कर्नाटक राज्यात पाठवण्यात आले. वल्लभनगर बस आगारातून या बस रवाना करण्यात आल्या. पिंपरी चिंचवड शहराची देशभरात औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. त्यामुळे नोकरी, रोजगाराच्या शोधात दररोज शेकडो जण देशाच्या विविध भागातून शहरात दाखल होतात. मिळेल ती […]
अरे बाप रे! अद्यापही 68 हजार मजूर अडकले पुण्यातच; डाेळे लागले परतीकडे
पुणे : बांधकाम, हॉटेल, सुरक्षा क्षेत्राबरोबरच उद्योगांमधील कंत्राटी आणि कायमस्वरूपीही सुमारे 68 हजार मजूर, कामगार परतीच्या प्रतीक्षेत आहेत. शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील मजूर, कामगारांचा यामध्ये समावेश आहे.
Subscribe to:
Posts (Atom)