PIMPRI CHINCHWAD: The Bharatiya Janata Party leader, Laxman Jagtap, and Bhosari legislator Mahesh Landge have together demanded a detailed project report (DPR) of the Metro rail route from Moshi to Nashik Phata (on Pune-Nashik highway) and Nashik Phat
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 11 January 2018
CM bats for Hinjewadi Shivajingar Metro line in Pune; urges Centre to give priority
Chief minister Devendra Fadnavis has urged the Centre to approve the third Metro rail line between Hinjewadi to Shivajinagar to be constructed by the Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA).
मेट्रोसाठी पालिका जागा हस्तांतर करणार
पिंपरी – महापालिका हद्दीत महामेट्रो प्रकल्पाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. पिंपरी ते दापोडी या साडेसात किलो मीटर अंतर असून या हद्दीतील महापालिका ताब्यातील काही जागांची महामेट्रोला आवश्यकता आहे. याकरिता महामेट्रोचे अधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांची नुकतीचआयुक्त कार्यालयात बैठक झाली. त्यात कोणकोणत्या जागा हस्तांतरण करण्यात येतील, यावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. त्यानुसार महापालिकेने लवकरच महामेट्रोला जागा हस्तांतर करण्यास सकारात्मता दर्शवली आहे.
पुणे मेट्रोचे विस्तारीकरण सुरू असलेल्या कामातच
पुणे : मेट्रोच्या पिंपरी चिंचवड- स्वारगेट मार्गाच्या सध्या सुरू असलेल्या कामातच अनुक्रमे निगडी आणि कात्रजपर्यंत विस्तारीकरण होण्याची शक्यता आहे. त्याबाबत महामेट्रोने प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांकडून पाठपुरावा होत असल्यामुळे आणि खर्चातही बचत होऊ शकते, हे लक्षात घेऊन सुरू असलेल्या कामातच विस्तारीकरण करण्याचा 'महामेट्रो'चा प्रयत्न आहे.
निगडी-दापोडी बीआरटी सुरू करणार – महापौर
पिंपरी – निगडी ते दापोडी रस्त्यावरील बीआरटीएस बस सेवेसाठी महापालिकेने सुमारे दोनशे कोटी रुपयांचा खर्च केला आहे. त्यामुळे या मार्गावर बीआरटी सुरू करण्यासाठी आग्रही असल्याची भूमिका महापौर नितीन काळजे यांनी आज (बुधवारी) पत्रकारांशी बोलताना मांडली.
प्राधिकरणाची रस्तारूंदीकरणासाठी धडक कारवाई
वाल्हेकरवाडी : रावेत-वाल्हेकरवाडी या ३४.५ मीटर अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा ताबा घेण्याकरीता अडथळा ठरत असलेल्या कच्च्या आणि पक्क्या स्वरूपातील जवळपास ७४ घरांवर प्राधिकरण प्रशासनाने बुलडोजर फिरवला.
Huge national flag to unfurl at Nigdi on Republic Day
Pimpri Chinchwad: On January 26, the Republic Day, one of the largest national flags will be unfurled at the Bhakti Shakti garden in Nigdi on the Pune-Mumbai national highway stretch.
Multiplex body awaits state’s nod to stop playing national anthem
PUNE: As the Supreme Court has made the playing of the national anthem at theatres optional, the city-based Multiplex Association of India will be approaching the state government to seek an amendment to its earlier circular, which mandated multiplexes to play the national anthem before each film screenings.
शहरातील दहशतखोरांना राजकीय वरदहस्त – खासदार श्रीरंग बारणे
पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांमध्ये चारचाकी व दुचाकी तोडफोडीचे सत्र सुरू असून अशा प्रकारे उपद्रवी व्यक्तींकडून समाजात दहशत माजवली जात आहे. खेड्यापाड्यांतून पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात आलेल्या निष्पाप नागरिकांच्या मनामध्ये भिती निर्माण केली जात आहे. काही गटांकडून जाणिवपूर्वक दहशत परसवली जात असताना पोलिसांवरही राजकीय दबाव वाढत चालला आहे. याला राजकीय वरदहस्त असून आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, हे सर्वसामान्य नागरिकांच्या मनावर बिंबवण्यासाठीच दहशतखोरांचा हा खटाटोप आहे. यावर सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळी मूग गिळून शांत बसले आहेत, असा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपचा उल्लेख न करता पत्रकारांशी बोलताना केला.
सांगवी येथे आज महाआरोग्य शिबिराचे आयोजन; आमदार लक्ष्मण जगताप यांची माहिती
राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान आणि जिजाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १२ जानेवारी रोजी सांगवी येथे गरजू व गोरगरीब रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
देशातील तरुणाईला कौशल्य विकासाच्या माध्यमातून घडविल्यास भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेला टक्कर देईल – मुख्यमंत्री फडणवीस
देशातील तरुणाईला कौशल्य विकासाच्या माध्यमातून घडविल्यास भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेला टक्कर देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांचा स्किल डेव्हल्पमेंट विषय आवडीचा आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्यास सरकार प्राधान्य देत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वाढीव करांमुळे पेट्रोलचा सर्वाधिक दर महाराष्ट्रात
पेट्रोलवर राज्य शासनाकडून आकारण्यात येणारा हा कर देशातील कोणत्याही राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
मिळकतकरासाठी आता 'सेल्फ ऍसेसमेंट'
पुणे : केंद्र सरकारच्या 'अमृत' योजनेत निवड झालेल्या आणि दहा लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मिळकतकराची आकारणी 'सेल्फ ऍसेसमेंट' पद्धतीने लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मालकाने स्वसाक्षांकित खरेदीखतासह आवश्यक कागदपत्रांच्या प्रती सादर केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यावर विश्वास ठेवून संबंधित मिळकतीची करआकारणी करावी, असे आदेश राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. तसे झाल्यास नवी मिळकत अथवा सदनिका खरेदी केल्यानंतर कर लावून घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खेटे घालण्याची गरज राहणार नाही.
आयुक्तांचा आदेश कर्मचाऱ्यांकडून फाट्यावर
पिंपरी – कार्यालय सोडून बाहेर फिरणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यापूर्वी दिला. परंतु, त्या आदेशाला विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखविली. त्यामुळे आयुक्तांनी पुन्हा आदेश काढून कर्मचारी बाहेर दिसल्यास त्या विभाग प्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा आदेशाद्वारे दिला. परंतु, आयुक्तांचे आदेश कितीही निघाले तरी कारवाई होत नसल्यामुळे त्यांच्या आदेशाची अधिकारी व कर्मचारी खिल्ली उडवत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका संगीत अकादमीत शिक्षकांची नेमणूक
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका संगीत अकादमीतील विद्यार्थ्यांना आत्ता अनंत पांडुरंग जगदाळे हे संगीताचे धडे देणार आहेत. जगदाळे यांची अकादमीमध्ये संगीत शिक्षक म्हणून नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. निगडी, प्राधिकरणातील संत तुकाराम व्यापारी संकुलामध्ये महापालिकेची संगीत अकादमी आहे.
भाजप नगरसेवक तुषार हिंगे फरार
पिंपरी – खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला भाजपचा नगरसेवक तुषार हिंगे तीन महिन्यानंतरही सापडलेला नाही. त्यामुळे अखेर त्याला फरार घोषित करून या गुन्ह्यात आरोपपत्र दाखल करण्याची नामुष्की पोलिसांवर आली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले आहे.
रामनगर परिसरात सीसीटीव्ही बसवा; नगरसेविका मीनल यादव
पिंपरी – शहरातील रामनगर प्रभाग क्रमांक 14 मध्ये गेल्या दोन दिवसापासून काही टोळक्याकडून मध्यरात्री वाहनांसह घराची मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरु आहे. या तोडफोडीमूळे परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत व घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रभागात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी नगरसेविका मीनल यादव यांनी केली. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
बर्डव्हॅलीत “लेझर शो’ करा; नगरसेविका गोरखे यांची मागणी
पिंपरी – महापालिकेच्या चिंचवड येथील बर्डव्हॅली उद्यानात आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केली. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, महापालिकेने खाण असलेल्या ठिकाणी बर्डव्हॅली उद्यान विकसित केले आहे. त्यामुळे बर्डव्हॅली उद्यानाकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे.
शॉर्टसर्कीटमुळे आकुर्डीत चार दुकाने जळून खाक
पिंपरी, (प्रतिनिधी) – आकुर्डी येथील पीसीपी महाविद्यालयाजवळील सुयोग बुक डेपोला सोमवारी (दि.8) मध्यरात्री बाराच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. या आगीमध्ये सुयोग बुक डेपोच्या दुकानाचे चारही दुकाने जळून खाक झाले.यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी पिंपरी व निगडी प्राधिकरण येथील अग्निशामक दलाच्यादोन गाड्यांनी आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत ही चारही दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली होती.
Barne set to submit memo to CM today
Pimpri Chinchwad: Shiv Sena Maval MP Shrirang Barne will approach chief minister Devendra Fadnavis, seeking compensation for those whose vehicle are damaged by mobs.
तोडफोड प्रकरणी तीन संशयित ताब्यात
पिंपरी – थेरगाव येथे वाहनाची तोडफोड करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी सोमवारी (दि.8) रात्री ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव परिसरातील रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची काही अनोळखी व्यक्तींनी तोडफोड केली.
Subscribe to:
Posts (Atom)