MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 21 April 2020
पिंपरी चिंचवडमध्ये आज कोरोनाचा एकही रूग्ण नाही; तर गेल्या चार दिवसांत ६ जण ‘कोरोनामुक्त’
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड करांना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाग्ररस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत होती. मात्र आज दि.२० रोजी दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. तर आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या चार दिवसात तब्बल ६ रुग्ण बरे झाले असून ‘कोरोनामुक्त’ झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
निवासाची व्यवस्था करा, मगच कंपन्या सुरू करा
पिंपरी - उद्योगाची थांबलेली चाके सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील चाकण, तळेगाव, रांजणगाव व नगर रोड या ग्रामीण भागातील उद्योगांना कामकाज सुरू करायचे असेल, तर कंपन्यांच्या परिसरातच कमीत कमी कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. कंपन्यांपासून शंभर मीटरच्या परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कामासाठी जाता येणार आहे, असे उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी सांगितले.
केंद्राच्या टीमनं घेतली पुण्यात बैठक, केल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना, जाणून घ्या
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केन्द्रीय स्तरावरील टिम आज पुण्यात आली. या टिमने कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूचे प्रमाण या अनुषंगाने माहिती जाणून घेतली.
राम वाकडकर युवा मंच व पोलिसांचा एक हजार बांधकाम मजूर कुटुंबांना मदतीचा हात
एमपीसी न्यूज – राम वाकडकर युवा मंच वाकड यांच्या वतीने आणि वाकड पोलिसांच्या मदतीने वाकड परिसरातील महाराष्ट्र आणि इतर राज्यातील बांधकाम साईटवर काम करणाऱ्या एक हजार मजूर कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला आहे. दहा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य देण्यात आले आहे. वाकड परिसरात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि इतर राज्यातील मजूर वर्ग पोट भरण्यासाठी आला आहे. […]
भोसरी, दिघी, बोपखेल चऱ्होलीत 25 रुग्ण; रावेत, किवळे, चिंचवड कोरोनामुक्त
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे शहर कंटेनमेंन्ट झोन म्हणून घोषित केले आहे. शहराच्या सीमा 27 तारखेपर्यंत पुर्णपण बंद केल्या आहेत. आजपर्यंत शहरातील 62 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये भोसरी, दिघी, बोपखेल, च-होली हा भाग येत असलेल्या ‘इ’ प्रभाग कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. या […
#Lockdown2.0 : पिंपरी चिंचवड शहरात 11 ठिकाणी नाकाबंदी; सीमेवरील चार पूल कायमस्वरूपी बंद
पिंपरी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शहराच्या सीमेवर 11 ठिकाणी रविवारी मध्यरात्री पासून नाकाबंदी पाॅईंट सुरू केलेत. तर, चार पूल कायमस्वरूपी बंद करण्यात आले. नाकाबंदी साठी 20 अधिकारी व 100 कर्मचारी नियुक्त केले आहेत. 27 एप्रिल पर्यंत नाकाबंदी आदेश लागू राहणार आहे.
कोरोनातून झाला बरा मग...
पिंपरी : तो तरुण. पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली प्राधिकरणातील उभारलेल्या घरकुल वसाहतीत राहतो. दुर्दैवाने तो एका धार्मिक कार्यक्रमाच्या हाय रिस्क काॅन्टॅक्टमध्ये आला. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. म्हणून महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. डॉक्टरांनी तपासणी केली.
‘करोना’च्या विळख्यात तरुणाई
- शहरातील एकूण रुग्णांपैकी 67 टक्के रुग्ण चाळिशीच्या आतील
- आठ लहान मुलांनाही लागण ः केवळ तीन ज्येष्ठांना बाधा
#Waragainstcorona: पिंपरी-चिंचवडमधील प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा मोफत कोरोना चाचणी; आमदार महेश लांडगे यांचे आवाहन
महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शहरांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाबाबत घडामोडी पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी धडपड करीत असतात. जीव धोक्यात घालून वृत्तांकन करणाऱ्या या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची मोफत कोरोना चाचणी करण्यात येईल, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
#Waragainstcorona: ‘रिअल हिरो’च्या पगाराला ‘कात्री’ नको; उलट प्रोत्साहन भत्ताही द्या : आमदार महेश लांडगे
– राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंतीबाबत निवेदन
– …अन्यथा महासभेत प्रस्ताव; ‘त्या’कर्मचाऱ्यांना पगारासह ‘इन्सेंटिव्ह’
राष्ट्रवादीच्या नगरसेविकेने महापालिका प्रवेशद्वारावर स्वखर्चाने बसविले सॅनिटायझर टनेल
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत- धर यांनी आज (सोमवारी) महापालिका प्रवेशद्वारावर स्वखर्चाने सॅनिटायझर टनेल बसविले आहे. महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सॅनिटायझर टनेलचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेविका वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे बनले ‘अन्नदाता’, पिंपळे सौदागर मधील मजुरांना केले अन्नदान
- पक्षाचे नेते अजित पवारांची सूचना येताच उतरले मैदानात
- भूकेने व्याकूळ झालेल्या गोरगरिबांना सापडला आशेचा किरण
आता इथून पुढे ‘नो मास्क, नो पेट्रोल-डिझेल’
देशभरातील अनेक जिल्ह्यांत २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या देखील नक्कीच वाढलेली पहायला मिळेलं… अशात देशामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता पेट्रोल पंपावर मास्क घातलेलं असल्याशिवाय पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, अशी माहिती पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात ७५ हजार रॅपिड टेस्ट करणार- राजेश टोपे
मुंबई | महाराष्ट्रात करोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहेत. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात ७५ हजार चाचण्या केल्या जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर राज्याच्या करोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही टोपे यांनी नमूद केले.
टाटांचे मोबाइल पेट्रोल पंप लॉकडाऊनमध्ये हिट,पुण्यातील स्टार्टअप देतंय घरपोच इंधन
टाटांची ही कंपनी मोबाइल पेट्रोल पंप म्हणजे घरपोच पेट्रोल देण्याच सुविधा उपलब्ध करून देते. या वेगळ्या होम डिलिव्हरीमुळे या कंपनीची मागणी वाढू लागली आहे.
Video : आयटीयन्स'ला सोशल डिस्टन्सिंगची धाकधूक; पालकमंत्र्याकडे मांडली कैफियत
पिंपरी - आयटी कंपन्यांना 50 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकारेपणे पालन करत आजपासून (ता.20) कामावर रुजू होण्याच्या सूचना कंपन्यांनी दिल्या आहेत. मात्र, आयटीतील बड्या कंपन्यांमध्ये निम्म्या कर्मचाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक असल्याने गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. धोक्याची घंटा लक्षात घेता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र फोरम फाईट असोसिएशनचे प्रमुख पवनजीत माने यांनी निवेदनाद्वारे वर्क फ्रॉम होमच सुरू ठेवण्याची कैफियत मांडली आहे.
Video : शेतकऱ्यांकडून शहरातील सोसायट्यांमध्ये थेट भाजी, फळे विक्री सुरू
पिंपरी - राज्य सरकारच्या महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाच्या नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संघटनेच्या वतीने शहरातील सोसायट्यांमध्ये थेट भाजी, फळे विक्री सुरू करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असून ग्राहकांनाही ताजी फळे, भाज्या रास्त भावात मिळू लागली आहे. गेल्या महिन्याभरात 15 सोसायट्यांमधून हा उपक्रम राबविण्यास सुरवात झाली आहे.b
चाकण एमआयडीसीचा आवाज बंदच
चाकण - लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चाकण औद्योगिक वसाहतीतील एक हजारावर छोट्या, मोठ्या कंपन्या बंद आहेत. सरकारच्या आदेशानुसार वीस एप्रिलला कंपन्या सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु कडक नियम त्यात बहुतांश कामगार, कंपनी अधिकारी पुणे, पिंपरी, चिंचवड भागातील असल्याने व तो भाग सील केल्याने व मोठ्या प्रमाणात कामगार गावी गेल्याने कामगारांअभावी कंपन्या सुरू झाल्या नाहीत.
Subscribe to:
Posts (Atom)