Tuesday, 12 May 2020

PM नरेंद्र मोदींकडून 20 लाख कोटीच्या ‘आत्मनिर्भर’ विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा

Two youths reach out to over 27,000 needy in Pimpri-Chinchwad, surrounding areas

Coronavirus in Pune and PCMC: Full list of COVID-19 hotspots in Pune and Pimpri Chinchwad

पिंपरी-चिंचवड: महाराष्ट्र पोलिसांचा जयघोष करीत परप्रांतीय मजूर आपल्या गावी रवाना

१०० परप्रांतीयांना पीएमपीएमएल बसने पुणे रेल्वे स्थानकात सोडण्यात आले 

स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामांना गती

महापालिका प्रशासन : कामगारांना मिळाला दिलासा

पिंपळे गुरव – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे सर्व उद्योगधंदे, व्यापार, व्यवसाय तसेच विकासकामे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली. परंतु शासनाने लॉकडाऊनमधील काही अटी शिथिल करून नियमांचे पालन करत उद्योगधंदे, व्यापार व विकासकामांना परवानगी दिली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना करोनामुळे खिळ बसली होती ती निघाल्याने पुन्हा एकदा विकासकामांनी गती घेतली आहे. त्यामुळे कामगारांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.b

लॉकडाउनचा महापालिकेला फटका! सहा सदस्यीय समिती करणार ‘काटकसरी’चे धोरण

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जमा रक्कमांची स्थिती गंभीर स्वरुपाची राहण्याची शक्यता आहे. पालिकेच्या विविध स्रोतापासून मिळणा-या उत्पन्नावर देखील परिणाम होणार आहे. अंदाजपत्रकातील अपेक्षित जमा रक्कमेमध्येही तुट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उपलब्ध निधी काटकसरीने व योग्य त्या आवश्यक बाबींवर खर्च करणे गरजेचे आहे. त्यासाठी उपलब्ध निधीचा काटकसरीने वापर […] 

राज्याच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडून महापालिकेच्या ‘कोरोना वॉर’ रुमची पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोना कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपायोजना व कोविड-19 वॉररुमची पाहणी राज्याचे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आज (सोमवारी) केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोविड-19 वॉररूम अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती त्यांना दिली. महापालिका परिसरातील सध्यस्थीतील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनाची माहिती आयुक्त हर्डीकर यांनी […] 

वर्षभर नवीन प्रकल्प, बांधकामे करु नका, वर्क ऑर्डर देवू नका; राज्य सरकारचे महापालिकेला आदेश

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने महापालिकांच्या कामांवर निर्बंध आणले आहेत. प्रत्येक विभागाला अर्थसंकल्पीय निधीच्या 33 टक्के निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेला चालू आर्थिक वर्षात कोणतेही मोठे प्रकल्प, बांधकामे अशी भांडवली कामे, नवीन योजना प्रस्तावित करता येणार नाहीत. आरोग्यविषयक सोडून कोणतीही खरेदी […]

...म्हणून मेट्रोचे 99 टक्के मजूर गावी परतले नाहीत

पुणे : ''लेबर कॅंपमध्ये पुरेशा सुविधा मिळत नाहीत म्हणून आम्हाला गावाला जायचे, असे मजुर म्हणतात तर, पुरेशा सुविधा दिल्या जात असल्यामुळेच 99 टक्के मजूर लेबर कॅंपमध्येच आहेत'', असा दावा महामेट्रोने केला आहे. 

‘डॅशबोर्ड’ बंद, लपवाछपवी सुरू?

दिली जात होती “करोना’ची माहिती : पालिकेकडून तांत्रिक सुधारणेचे कारण

Metro work keeps many back & busy

Manoj Kumar, a resident of Azamgarh in Uttar Pradesh, is working as a painter at the Pune Metro’s site at College of Agriculture in Pune. His wife and children are at his home town. “Since work is going at full speed, I preferred not to go back home,” he said.

E-token system for liquor purchase in Pune

Home delivery of liquor in Maha from Thursday

सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांनी कोविड-19 च्या सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली. विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि खासगी प्रयोगशाळा प्रमुख व समन्वयकांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत […]

उद्यापासून (12 मे) निवडक प्रवासी ट्रेन धावणार; आरक्षणासाठी संकेतस्थळ सुरू

एमपीसी न्यूज – निवडक रेल्वे वाहतूक मंगळवार ( दि.12) मेपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत नियोजन जाहीर केले आहे. सुरुवातीला कमी संख्येत रेल्वे गाड्या धावतील. यादरम्यान प्रवाशांची आरोग्य आणि कोरोना तपासणी केली जाईल. फक्त तिकीट निश्र्चित केलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. सोमवार (दि.11) रेल्वेचे […]

खासगी डॉक्टरांना विमा कवच द्या; फँमिली फिजिशियन असोशियनची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना बाधित खासगी डॉक्टाराचे नाव,पत्ता व त्यांच्या व्यवसायाचे ठिकाण प्रसिद्ध करण्यात येऊ नये. कोरोना बाधित खासगी डॉक्टरांना रुग्णालयात राखीव जागा ठेवाव्यात. खासगी डॉक्टरांना कुठल्याही प्रकारचे विमा संरक्षण नाही. त्यांना विमा संरक्षण पुरविण्यात यावे, अशा विविध मागण्या खासगी डॉक्टरांच्या फँमिली फिजिशियन असोशियन या संस्थेच्या डॉक्टरांनी महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी डॉक्टरांनी […]

भोसरीमध्ये रक्तदान शिबिरात 90 जणांचा सहभाग

सोशल डिस्टन्सींगचे पालन न केल्यास कठोर पावले उचलावी : महापौर माई ढोरे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सोशल डिस्टन्सींगचे पालन न केल्यास भविष्यात प्रशासनाने कठोर पावले उचलावी अशा सुचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी प्रशासनाला दिल्या. 

उद्योग सुरु करण्यास परवानगी द्या; खासदार श्रीरंग बारणे यांची आयुक्तांना सूचना

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील अर्थचक्र सुरु राहणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील लघुउद्योजकांना व्यावसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्र (कंन्टेन्मेंट झोन) वगळून विकासकामे, पावसाळ्यापुर्वीची कामे करावीत, असेही बारणे यांनी सांगितले आहे. 

कोरोना मुक्तीच्या लढयात परिचारिकांचे योगदान महत्वाचे: विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

कोरोना मुक्तीच्या लढयात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लाऊन रुग्णालयातील परिचारिका जोखीम पत्कारुन चांगली आरोग्य सेवा देत आहेत. या सर्व परिचारिकांचे योगदान महत्वाचे आहे, असे गौरवोद्गार विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज काढले.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आमदार अण्णा बनसोडे यांची पाहणी

पिंपरी-चिंचवड मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास आज आमदार अण्णा वनसोडे यांनी आज परिचारिका दिना निमित्ताने भेट दिली आणि परिचारिकांचे प्रश्न समजून घेतले. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाबळे, मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, रुग्णालयाच्या अधिसेविका व मोठ्या संख्येने परिचारिका उपस्थित होत्या. परिचारिकांनी काम करताना येणाऱ्या अडचणींचा पाढाच आमदारांसमोर मांडला असता, आमदार बनसोडे यांनी रुग्णालयाची सुरक्षा, कर्मचार्यांना संरक्षण, वेतन वाढ, पदोन्नती आदी प्रश्ना सोडविण्यासाठी तातडीने मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले

कर्मचारी व पगार कपात न करण्याच्या सरकारच्या आदेशाला केराची टोपली ; कामगार विभागात 68 तक्रारी

पुणे : लॉकडाऊनमुळे कंपनीचे उत्पादन घटले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे कारण पुढे करत कामावरून काढून टाकण्यात आले किंवा पगार कपात केल्याच्या 68 तक्रारी येथील कामगार विभागात नोकरदारांनी केल्या आहेत. कर्मचारी व पगार कपात न करण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या आदेशांना केराची टोपली दाखवल्याचे यातून स्पष्ट होते.

तळीरामांच्या गर्दीमुळे ‘करोना’चा धोका वाढला

करोना बाधितावर अत्यंसंस्कारास नातेवाईकांचा नकार

दीडशे फूट लांबून पाहिला मृत्यूदेह; कर्मचाऱ्यांकडे पुरेशा सुरक्षा साधनांचा अभाव