Monday, 4 June 2018

जागतिक पर्यावरण दिवसाचे आयोजन, इको-फ्रेंडली उपक्रमांचे प्रदर्शन व पवनामाईची आरती

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून Connecting NGO PCMC व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून मंगळवार रोजी मोरया गोसावी मंदिराशेजारील जिजाऊ पर्यटन केंद्रात पर्यावरण दिन साजरा करण्यात येईल. 

  • कार्यक्रम: 'जागतिक पर्यावरण दिवस' 
  • दिवस व वेळ: दिनांक ५ जून, मंगळवार सायंकाळी ४ वाजता
  • स्थळ: जिजाऊ पर्यटन केंद्र, चिंचवड 
  • मॅप: https://goo.gl/maps/UtdxSrJADLL2
  • RSVP https://www.facebook.com/events/575523252819541/

Health dept seizes 2200kg of plastic carry bags in Pimpri Chinchwad

PIMPRI CHINCHWAD: Ahead of the World Environment Day on Tuesday, the health department officials have seized 2,190kg of plastic carry bags in two months from hawkers, vegetable vendors and shopowners in all the eight zones of Pimpri Chinchwad municipal limits.

पिंपरीत अतिक्रमणांची ठिकाणे निश्चित; दररोज कारवाई करण्याचे नियोजन

सहशहर अभियंता राजन पाटील यांची माहिती

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या अतिक्रमणांची उशिरा का होईना, महापालिका प्रशासनाने दखल घेतली आहे. शहरातील अतिक्रमणे झालेल्या ठिकाणांची माहिती एकत्रित करण्यात येत असून त्यानुसार मुख्यालयाच्या नियंत्रणाखाली दररोज कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

चिंचवडमध्ये तीन घरमालकांना दंड

पिंपरी : घरमालकाने भाडेकरूंची माहिती दिली नाही. त्यामुळे चिंचवड पोलिसांनी घरमालकांवर खटला भरला. न्यायालयाने त्या तीन घरमालकांना दंड ठोठवल्याची माहिती पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी दिली. 
अनेकदा घरमालक भाडेकरू ठेवतात. भाडेकरूंची त्यांची माहिती पोलिसांना देणे कायद्याने बंधनकारक असूनही मालक ती देत नाहीत. अशा घरमालकांना शोधून त्यांच्यावर खटला दाखल करण्याची मोहीम पुणे पोलिसांनी हाती घेतली आहे. त्यानुसार भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या तिघांना न्यायालयाने दंड ठाठोवला आहे. अशीच मोहीम संपूर्ण शहरभर हाती घेतल्याची माहिती उपायुक्‍त शिंदे यांनी दिली. 

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा अधिकाऱ्यांवर दाखल करा

पिंपरी : शहरातील होर्डिंग पडून दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्याकडे शहर शिवसेनेने केली आहे.

 

खासदार श्रीरंग बारणे यांच्या कार्यअहवालाचे उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या कारर्कीदीला चार वर्ष पुर्ण झाली आहेत. शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खासदार बारणे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले. 

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडेंना पिंपरी चिंचवड भाजपातर्फे अभिवादन

पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.

गॅस,पेट्रोल दरवाढीचा पिंपरीत कॉंग्रेसतर्फे निषेध

गॅस सिलिंडर,पेट्रोल, डिजल दरवाढीस जबाबदार असणा-या केंद्रातील भाजप सरकारचा पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. 2 जून) निषेध करण्यात आला. सिलिंडरचे प्रतीकात्मक पूजन करण्यात आले. तसेच महागाईच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

[Video] बिर्ला हॉस्पिटल जवळ ट्रॅफिक जॅम pmpml बसचा स्टेरींग रॉड तूटल्याने रस्त्याच्या मधोमध बस बंद


[Video] चिंचवड येथील केजुबाई बंधाऱ्यावर पवना नदी जलपर्णी स्वच्छता मोहिमेचा समारोप समारंभ


जलपर्णीमुक्त पवनामाई मोहीम

पिंपरी-चिंचवड शहरातील पवना नदीला जलपर्णीचा विळखा पडल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. महापालिकेला यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र जलपर्णी काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने कुणाल लांडगे स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने जलपर्णीमुक्त पवनामाई उपक्रम राबविण्यात आला. कासारवाडी येथे घेण्यात आलेल्या दुसऱ्या आठवड्यातही उपक्रमास युवकांचा उस्त्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शेतकरी संपामुळे भाज्यांचे भाव दुप्पट

पिंपरी : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पिंपरी कॅम्प येथील भाजी मंडईत शेतीमालाची आवक कमी झाली. फळभाज्यांचे भाव रविवारी 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढले. गाळ्यावरील माल संपल्याने दुपारनंतर जवळपास 10 ते 15 भाजी विक्रेत्यांना गाळे बंद ठेवावे लागले. चिंचवड भाजी मंडईतही भाजीपाल्याचे भाव दुप्पट झाले.

MahaMetro to construct four pillars across Mula river near Harris Bridge

PIMPRI CHINCHWAD: The Maharashtra Metro Rail Corporation (MahaMetro) has started constructing the first of the four pillars along Harris Bridge.

MahaMetro invites bids for underground work

PUNE: The Maharashtra Metro Rail Corporation (MahaMetro) has floated tenders for the underground section of the Pune Metro rail project.

Pune: On air soon, a radio programme dedicated to city’s IT couples

After Marathi movie Whats Up Lagna and popular TV show Tujha Majha Breakup, both featuring IT couples and their problems, the Pune station of Akashvani is all set to launch a similar programme in Pune.

आयटीआयच्या पाच हजार जागा वाढणा

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशामध्ये यंदा तब्बल पाच हजार जागांची वाढ होणार आहे. यातील अडीच हजार जागांची वाढ झाली असून येत्या आठ दिवसांमध्ये आणखी अडीच हजार जागा वाढणार आहेत. त्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर पुढील पंधरा दिवस विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी दिली आहे.

परवडणाऱ्या घरांसाठी 89 हजार अर्ज

पिंपरी : शहरात परवडणाऱ्या घरांची मागणी मोठी आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी शहरातून तब्बल 89 हजार 21 जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी सर्वांत जास्त अर्ज क्रेडिट लिंक सबसिडी योजनेसाठी (सीएलएसएस) 44 हजार 182 जणांनी अर्ज केले आहेत. 

रेल्वेला उशीर झाला तर अधिकाऱ्यांचे प्रमोशन रोखणार

नवी दिल्ली: रेल्वेच्या लेटलतीफ कारभाराला वैतागलेल्या लाखो प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सरकारनं पाऊल उचलले आहे. रेल्वे प्रशासनाच्या नवीन प्रस्तावानुसार, गाड्या उशिरा धावल्यास त्याची ‘किंमत’ रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोजावी लागणार आहे. जबाबदार अधिकाऱ्यांचे प्रमोशन रोखण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामगिरीत सुधारणा होऊन रेल्वेगाड्या वेळेत धावतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रिस्क्रिप्शन मधील चुका टाळण्यासाठी…

अनेक वेळा डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन न-समजल्यामुळे फार्मासिस्टकडून रुग्णांना चुकीची औषधे व चुकीचे डोस असणारी औषधे देण्यात येतात. अशा या घटनांमुळे अनेक वेळा रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाले आहेत. तर काही रुग्णांना आपला जीवही गमवावा लागला आहे. एकट्या अमेरिकेत, दरवर्षी 100000 प्रिस्क्रिप्शन चुका होतात. परंतु भारतामध्ये अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.