Sunday, 14 October 2018

Delhi pact to boost quality of education

The MoU will include the implementation of student and teach ..

PCMC collects Rs 9.95 lakh in drive against plastic

A total of Rs9.95lakh was collected as fine for violating t ..

Pimpri-Nigdi metro line extension to cost Rs 1500 crore

Maha-Metro submitted its DPR for the extension of the Pimpri-Nigdi metro route on October 3 and as per the DPR will run parallel to the old Pune-Mumbai highway, till Nigdi.

Pimpri-Nigdi,metro,extension

“शहर परिवर्तन’चा अहवाल महासभेसमोर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर परिवर्तन समितीने त्यांचा पहिला अहवाल तयार केला असून महापालिकेच्या शनिवारी (दि. 20) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर सादर केला जाणार आहे. 

Citizens to give budget ideas

PIMPRI CHINCHWAD: Citizens can submit suggestions for develo ..

काळेवाडी फाटा बीआरटीचे काम संथगतीने

पिंपरी : काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता बीआरटी मार्गाचे काम संथगतीने सुरू असून, 2011 पासून सुरू असलेले काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बीआरटीएस ही गतिमान वाहतूकव्यवस्था तूर्तास तरी कागदावरच आहे.

‘वायसीएमएच्‌’ मध्ये मानसोपचार विभाग सुरु

एमपीसी न्यूज – जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच्) नव्याने मानसोपचार विभाग सुरु करण्यात आला आहे. या विभागाचे उद्‌घाटन महापौर राहुल जाधव आणि  आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वायसीएमएचचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश देशमुख, रुग्णालयाचे वैद्यकीय 

थेरगाव रुग्णालयात शहरातील पहिले “बर्न युनिट’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात एखादा स्फोट अथवा आगीची दुर्घटना घडल्यास जखमी रुग्णांना पुणे अथवा खासगी रुग्णालयात दाखल केले जात होते. यामुळे, रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेच्या थेरगाव येथील नव्याने बांधकाम सुरु असलेल्या सुसज्ज रुग्णालयात जळीत कक्ष (बर्न युनिट) उभारण्यात येणार आहे. शहरातील आगीच्या दुर्घटनेत जखमी होणाऱ्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी 30 खाटांची क्षमता असलेले शहरातील पहिले “बर्न युनिट’ तयार होत आहे.

सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर “वॉच’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर आता सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांचा वॉच असणार आहे. हजेरीच्या ठिकाणी अचानकपणे भेट देऊन ते सफाई कर्मचाऱ्यांची उपस्थिती व कामकाजाची तपासणी करणार आहेत. प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांनी हे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या हद्दीतील साफसफाई करण्याचे काम क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागाकडून केले जाते. महापालिका कार्यक्षेत्राचा वाढलेला क्षेत्रविस्तार, प्रशासकीय आव्हाने, स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी प्रकल्प अशा विविध योजना विचरात घेऊन, उपलब्ध मनुष्यबळाचा वापर केला जातो. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित दैनंदिन कामकाजासाठी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या जातात.

पालिकेच्या 105 शाळांमध्ये सायन्स सेंटर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 105 शाळांमध्ये चिंचवडमधील सायन्स सेंटरच्या धर्तीवर कायमस्वरुपी सायन्स सेंटर उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे. शिक्षण समितीने या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली आहे. शिक्षण विभागाच्या अखर्चित निधीतून हा निधी उभारला जाणार आहे.

44 पदांकरिता 447 अर्ज

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन विभागातील रिक्त फायरमन पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. मानधन तत्त्वावर 44 पदांकरिता महापालिका प्रशासनाला एकूण 447 अर्ज प्राप्त झाले आहेत. तपासणीअंती 144 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.

सावरकर मंडळाचा वनमेळावा उत्साहात

घोरावडेश्‍वर प्रकल्पाची दिली माहिती
पिंपरी : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाच्यावतीने घोरावडेश्‍वर डोंगर येथे वनमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यामध्ये विविध पर्यावरणप्रेमी संस्था व नागरिक सहभागी झाले. मेळाव्याचे यंदा दहावे वर्षे होते. यावेळी धनंजय शेडबाळे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन हरित घोरावडेश्‍वर या प्रकल्पाची माहिती दिली. 

जागतिक अंडी दिन महापालिकेच्या शाळेत साजरा

एमपीसी न्यूज –   जागतिक अंडी दिनानिम्मित पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक अंडी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या सेक्टर २२ प्रभाग क्रमांक १३ मध्ये कै. मधुकर पवळे शाळेमध्ये जागतिक अंडी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   यावेळी नगरसेवक सचिन चिखले यांनी विद्यार्थ्यांना अंडी खाण्याचे फायदे व त्यापासून मिळणाऱ्या जीवनसत्वाची माहिती दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत अंडी

पीसीएनटीडीएच्या भूखंड वाटपामध्ये महिला सामाजिक संस्थांसाठी 50 टक्के आरक्षणाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणतर्फे सामाजिक संस्थांना वाटण्यात येणा-या 84 भूखंडांपैकी 50 टक्के भूखंड महिला सामाजिक संस्थांसाठी आरक्षित ठेवावे, अशी मागणी मानिनी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये शहराच्या एकूण लोकसंख्येच्या 50 ते 60 टक्के लोकसंख्या 

तेजस्विनी बस तपासणीचे काम लवकरच सुरू होणार

तपासणीसाठी खास महिला पथक स्थापन
पुणे : खास महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बससेवेला चांगला प्रतिसाद मिळाला असून या बसेस तपासणीसाठी खास महिला पथक स्थापन करण्यात आले आहे. चार महिलांचा समावेश असलेल्या या पथकाला पंधरा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत हे पथक पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

शहरातील एकमेव श्री भवानीमाता सांस्कृतिक महिला मंडळ

एमपीसी  न्यूज –  शहरात सध्या नवरात्र उत्सवात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. घटस्थापनेच्या दिवशी जयघोष व मिरवणुक काढून निगडीतील श्री भवानीमाता सांस्कृतिक महिला मंडळाने आदर्श ठेवला आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य   म्हणजे  मंदिरातील पूजा, स्वच्छता, विविध उपक्रम घेण्याचे निर्णय़ सर्व महिला मंडळ करीत आहे. दरवर्षी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम या मंडळामार्फत घेण्यात येतात

नगरसेविका राजश्री काळे पालिकेत गर्दीसमोर रडल्या

पुणे : शहरभर अतिक्रमणे थाटली गेली आहेत, ती तुम्हाला दिसत नाहीत का ? मग, पारधी समाजातील कुटुंबीयांच्या घरांवर हातोडा का उगारला, अशा शब्दांत अतिरिक्त आयुक्तांना जाब विचारत, सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका राजश्री काळे यांनी महापालिकेच्या प्रशासनाची कोंडी केली. मात्र, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आपले म्हणणे ऐकून घेत नसल्याने काळे यांचा कंठ दाटून आला आणि गर्दीसमोरच त्या ढसाढसा रडल्या. ज्या लोकांच्या घरांवर कारवाई झाली, त्यांना महापालिकेत आणून आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. 

पिंपरी–चिंचवड शहरातील कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका – दत्ता साने

चौफेर न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करुन तो मोशी डेपो येथे डपिंग करणे, या कामाचा कालावधी २०१६ ला संपला असतानाही वेळोवेळी निविदा प्रक्रीया टाळून सबंधित अधिकारी व भाजपा पदाधिकाऱ्यांनी आर्थिक हित जोपासत महापालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे. या निविदेमध्ये महापालिकेचे सुमारे ८४ कोटी ५१ लाखांचे नुकसान झाले आहे. तरी, मागील स्थायी समिती तसेच वाढीव निविदा काढणारे संबधित अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच संबंधीत ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी पिंपरी – चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. या संदर्भात, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

सिद्धार्थनगर भागात स्वच्छतेचा बोजवारा

पिंपरी – तुंबलेल्या ड्रेनेज लाईन, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव यामुळे दापोडीतील सिद्धार्थनगर रहिवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या तक्रारीं निकालात काढा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्यांची गांभिर्याने दखल घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी स्थानिक पातळीवरच निकाली काढण्याबाबत ठोस कार्यवाही करुन, दर तीन महिन्यांनी त्याचा अहवाल प्रशासन विभागाकडे पाठविण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.