Tuesday, 14 March 2017

गावाकडचा रांगडा गडी बौलगाडीतून महापालिकेत

पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रथमच ग्रामीण नेतृत्व

एमपीसी न्यूज - सर्वात श्रीमंत व हायटेक मानल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेला नितीन काळजे यांच्या निवडीमुळे आज गावाकडचा टच मिळाला. कारण एरवी लालदिव्यांच्या गाड्यांचा ताफ्यांची सवय असलेल्या महापालिकेला आज बैलगाडीचेही दर्शन झाले. कारण गावाकडचा रांगडा गडी आज महापौरपदी बसला. काळजे यांनी महापालिकेच्या आवारात बैलगाडीतूनच एन्ट्री केली.

पिंपरीच्या महापौरपदी भाजपचे नितीन काळजे बिनविरोध

एमपीसी न्यूज-  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या नितीन काळजे यांची आज(मंगळवारी) बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्याम लांडे यांनी माघार घेतल्यामुळे पिठासीन अधिकारी दौलत देसाई यांनी काळजे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली.  

पिंपरीच्या उपमहापौरपदी भाजपच्या शैलजा मोरे बिनविरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदी शैलजा मोरे यांची आज(मंगळवारी) बिनविरोध निवड झाली. निकिता कदम यांनी माघार घेतल्यामुळे पिठासीन अधिकारी दौलत देसाई यांनी काळजे यांच्या निवडीच्या अधिकृत घोषणा केली.   

एक वर्ष लोटूनही आरटीओ कार्यालयाचे स्थलांतर नाही

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू केल्यानंतर चिखली येथील प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये कामकाज सुरू झाले. प्राधिकरणाकडून आरटीओने ती इमारत भाडय़ाने घेतली आहे. या इमारतीमधील जागा अपुरी असल्यामुळे ...

Sane opposes Behl as PCMC opposition leader

Pimpri Chinchwad: After the NCP suffered a drubbing in Pimpri Chinchwadmunicipal election, resentment is brewing among a section of corporators. Senior corporator, Datta Sane, has openly challenged the appointment of PCMC opposition leader Yogesh ...

काँग्रेस बचावासाठी शहराध्यक्ष हटाव मोहीम

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने अस्तित्व हरवलेल्या काँग्रेसच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता ‘काँग्रेस बचाव’ची घोषणा करत शहराध्यक्ष सचिन साठे यांना हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. निवडणुकीत एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही, याची जबाबदारी स्वीकारून साठे यांनी पदाचा दिलेला राजीनामा त्वरित मंजूर करून निष्ठावान कार्यकर्त्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्वतंत्र गटाबाबतचे महापौरांना आज पत्र

पिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी योगेश बहल यांची झालेली निवड अमान्य करून पक्षाच्या विरोधात ३६ पैकी २४ नगरसेवकांनी पुकारलेला बंडाचा पवित्रा कायम ठेवत सभागृहात वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. १४) निवडीनंतर तसे पत्र महापौरांकडे दिले जाणार आहे. बंडखोर गटाचे नेते व नवनिर्वाचित नगरसेवक दत्ता साने यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ही माहिती दिली.

PCMC: कॉंग्रेसमध्येही बंडाळी; अध्यक्ष बदलाची मागणी

पिंपरी : "राष्ट्रवादी'नंतर पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसमध्येही बंडाळी उफाळून आली असून पालिका निवडणुकीतील दारुण पराभवामुळे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्याऐवजी दुसरा निष्ठावान अध्यक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सदस्या आणि माजी नगरसेविका निगार बारस्कर यांच्याकडे या बंडाचे नेतृत्व असून त्यांनी साठे यांच्याऐवजी दुसरा अध्यक्ष देण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यांच्यासह निवडक कार्यकर्त्यांनी शहर काँग्रेस पक्ष बचाव ही मोहीम उघडली आहे.

ACB to investigate Bhosari land scam against BJP leader Eknath Khadse

The plea was filed by Pune-based activist Hemant Gavande, alleging, that Khadse, misused his position as revenue minister and had purchased a three-acre plot in an industrial zone at Bhosari near Pune in the name of a relative for Rs 3.75 crore against ...

‘मेट्रो’लगत परवडणारी घरे

शिवाजीनगरला बहुमजली ‘हब’; जंगली महाराज, फर्ग्युसन रस्त्यावरून स्काय वॉक
पुणे - शिवाजीनगरमध्ये धान्य गोदामाच्या जागेवर बहुमजली ‘मेट्रो हब’ साकारणार असून, तीन मार्गांची स्थानके एकाखाली एक अशा पद्धतीने तेथे उभी राहणार आहेत. तसेच जास्तीत जास्त प्रवाशांना मेट्रोचा वापर करता यावा, यासाठी जंगली महाराज, फर्ग्युसन रस्ता आणि गरवारे पुलाजवळून पादचाऱ्यांना थेट मेट्रोपर्यंत आणण्यासाठी ‘स्काय वॉक’ उभारण्याची संकल्पनाही महामेट्रो कंपनीने मांडली आहे. त्याचबरोबर शहरात नागपूरच्या ‘मिहान’ प्रकल्पाच्या धर्तीवर ‘मेट्रो सिटी’ उभारण्यात येणार असून, त्यात सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध होऊ शकतील. 

गृहनिर्माण सोसायट्यांत टॅंकरच्या वाऱ्या

पिंपरी - महापालिकेच्या तिजोरीत कररूपाने सर्वाधिक महसूल जमा करणाऱ्या पिंपळे सौदागरमधील नागरिकांना उन्हाळ्याच्या तोंडावरच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या महिनाभरात तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली असून, येथील बहुतांश हाउसिंग सोसायट्यांमधील टॅंकरच्या वाऱ्याही वाढल्याचे चित्र आहे. अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये दिवसाला तब्बल २०-२२ टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी सोसायट्यांना दिवसाकाठी दहा ते १५ हजार रुपये खर्च येत आहे. पाणीटंचाईमुळे संतप्त असलेल्या या सोसायट्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

पक्षाने दिलेली आश्‍वासने पूर्ण करू

जगताप, काळजे यांची ग्वाही; उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील विजयाचा जल्लोष
पिंपरी - ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतदेखील करिष्मा दिसून आला. जनतेने मोदी यांच्या कारभारावर विश्‍वास ठेवून भरभरून मते दिली. पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने दिलेली सर्व आश्‍वासने पूर्णत्वाच्या दिशेने नेऊ,’’ अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि नियोजित महापौर नितीन काळजे यांनी शनिवारी दिली.

लोकसहभागातून विकासकामांवर भर देणार - शैलजा मोरे

भाजपचा ‘वचननामा’ प्रभावीपणे आणि तितक्‍याच पारदर्शकपणे राबविणे हाच माझा यापुढील मुख्य ‘अजेंडा’ राहील. ‘डिजिटायझेशन’ तसेच लोकसहभागातून तो राबविण्यासाठी प्रसंगी आग्रही राहील. अमरावतीच्या ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळा’च्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी सर्वसोयीसुविधांयुक्त ‘सार्वजनिक व्यायामशाळा’, ज्येष्ठांसाठी ‘विरंगुळा केंद्र’ आणि झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी सुसज्ज ‘आरोग्य केंद्र’ विकसित करण्यावर माझा भर राहील, अशी भूमिका शहराच्या नियोजित उपमहापौर शैलजा मोरे यांनी बोलून दाखविली.