Saturday, 4 November 2017

मेट्रो निगडीपर्यंत होऊ द्या सुसाट

पिंपरी - मेट्रो प्रकल्प आणि त्याच्यासमवेत बीआरटी बससेवेमुळे नाशिक फाटा येथील मेट्रो स्थानक प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. या ठिकाणी प्रवासी मोठ्या संख्येने तिन्ही सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करणार असल्याने तेथे ‘ट्रान्स्पोर्ट हब’ निर्माण होणार आहे. मेट्रो प्रकल्प निगडीपर्यंत वाढविल्यास पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवाशांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. मेट्रो पिंपरीच्या पुढे निगडीपर्यंत नेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

मेट्रो प्रकल्पामुळे रेल्वेचा फायदाच : चाऊस्कर

रेल्वे प्रशासनाचे सहकार्य, दोन्ही प्रवाशांना सुविधा 
पुणे – शहरातील प्रस्तावित मेट्रोचे एक स्टेशन पुणे रेल्वे स्थानकाच्या हद्दीत येत असून त्याबाबत रेल्वे प्रशासन पूर्ण सहकार्य करणार असून त्याबरोबर मेट्रोमुळे रेल्वेच्या प्रवाशांना सुद्धा फायदा होणार आहे.

मेट्रोच्या आणखी नऊ स्थानकांना मंजूरी

पिंपरी ते रेंजहिल दरम्यान प्रवाशांची सोय   
पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल मार्गाचे काम वेगाने सुरू असतानच; या मार्गावर 9 ठिकाणची स्थानके उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रीयेत हे काम हिंदूस्तान कन्स्ट्रक्‍शन कंपनी (एचसीसी) ला देण्यात आले आहे. या स्थानकांसाठी सुमारे 497 कोटी रूपयांचा खर्च येणार असून या कामासाठी कंपनीस दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे.

प्राधिकरणातील बांधकामे अनधिकृतच?

राज्य शासनाने अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्याचा अध्यादेश काढल्यानंतर पिंपरी-चिंचवडप्राधिकरणातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, नियमितीकरणासाठी निश्चित करण्यात आलेल्या अटी आणि विविध नियमांमुळे ...

खंडोबा माळ चौक ते संभाजी चौक अपघाताचा धोका; वाहने सावकाश हाका

पिंपरी - मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, बेकायदा पार्किंग आणि बेशिस्त वाहनचालक यामुळे आकुर्डीतील खंडोबा माळ चौक-म्हाळसाकांत चौक- संभाजी चौकापर्यंतच्या रस्त्यावर अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

बीआरटी सुरक्षेसाठी सिग्नल जनजागृती करणार – आयुक्त श्रावण हर्डीकर

निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावरून पादचारी व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित होतो. त्याबाबत सुरक्षित बीआरटीसाठी महापालिका सिग्नल व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहे. त्यासाठी वेगळी संस्था लवकरच नेमली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे.

८५ हजार संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण

पुणे - राज्यभरात एक लाख ९६ हजारांपेक्षा जास्त सहकारी संस्था आहेत. त्यामध्ये सर्वाधिक सहकारी गृहरचना संस्था आहेत. दरवर्षी ३१ मार्चपूर्वी वैधानिक लेखापरीक्षण करणे बंधनकारक असले तरी लेखापरीक्षण अपूर्ण राहत होते; परंतु सप्टेंबरअखेर राज्यातील ८५ हजार ७९० सहकारी संस्थांचे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण झाल्याची माहिती सहकार आयुक्तालयाकडून देण्यात आली.

पिंपरी चिंचवड बार असोसिएशन निवडणूक; अध्यक्षपदी राजेश पुणेकर विजयी

पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्‌स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेश पुणेकर यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी कालिदास इंगळे यांची निवड करण्यात आली.

महावितरणकडून ग्राहकांना ठेंगाच

अनागोंदी कारभार : खासदार बारणेंच्या सूचनांनाही वटाण्याच्या अक्षता
पिंपरी, (प्रतिनिधी)- सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या पुणे जिल्ह्यातील सर्वात जुन्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे उद्योजक कमालीचे त्रस्त तर आहेतच, परंतु आता घरगुती ग्राहकदेखील महावितरणच्या कारभारामुळे जेरीस आले आहेत. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी पाहता खासदार श्रीरंग बारणे यांनी दोन दिवसांपूर्वीच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत खासदार आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्या होत्या की नागरिकांना त्रास होता कामा नये. परंतु या सूचनांचा उलटा परिणाम शहरात पहावयास मिळत आहे. बैठकीच्या दुसऱ्याच दिवशीपासून शहरातील वेगवेगळ्या रोज किमान एकदा तरी वीज पुरवठा खंडित होत आहे.

उंदीर खरेदी नियमानूसार होतेय ; प्रशासनाचा दावा

पिंपरी, (प्रतिनिधी) – संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात सर्पांना लागणाऱ्या खाद्यात 75 पैसे ते दीड रुपयांना मिळणारे उंदीर हे एका खासगी संस्थेकडून 138 रुपये खरेदी पालिकेने केले आहेत. या उंदीर खरेदी घोटाळा झाल्याने ती खरेदी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यावरुन पालिकेवर समाज माध्यमातून टिकेचे झोड उठली आहे. याबाबत खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने उंदीर खरेदी ही नियमानूसार झाल्याचा दावा शुक्रवारी प्रसिध्दपत्रकाद्वारे केला आहे.

शहरातील 22 शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने होणार सन्मान

पिंपरी, प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार दि. 5 नोव्हेंबरला चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात 22 शिक्षकांना देण्यात येणार आहे. यामध्ये खासगी शाळा, महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शिक्षकांचा समावेश आहे. 14 शिक्षिका आणि 8 शिक्षक अशा एकूण 22 शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

लवकरच शिक्षण समिती; शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा होण्याची शक्यता

शिक्षण हक्क कायद्यान्वये पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त झाले आहे. त्याऐवजी नवीन शिक्षण समिती निर्माण केली जाणार असून, समितीवर ९ नगरसेवकांची वर्णी लागणार आहे.

निगडीत ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि वसुंधरा क्लब पुणे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात पर्यावरण विषयक विविध लघुपट, अनुबोधपट प्रदर्शित केले जाणार आहेत. यंदाच्या महोत्सवाचे मुख्य उद्दि्ष्ट ‘नदी वाचवा-जीवन वाचवा’ राहणार आहे. तसेच जल दिंडीचे प्रणेते डॉ. विश्वास येवले यांना यंदाचा ‘वसुंधरा’ पुरस्कार  प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद बन्सल यांनी दिली.

अहमदाबाद दौऱ्यामुळे पिंपरी पालिकेचे कामकाज तीन दिवस विस्कळीत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर, सभागृहनेते आणि इतर 54 असे जवळजवळ सभागृहातील निम्मे नगरसेवक आणि आयुक्त व इतर 11 वरिष्ठ अधिकारी (विभागप्रमुख) असा मोठा लवाजमा अहमदाबाद (गुजरात) दौऱ्यावर गेल्याने पालिका व त्यातही मुख्यालयाच्या कामकाजावर त्याचा गेल्या तीन दिवसांत मोठा परिणाम  झाल्याचे दिसून आले आहे. चार दिवसांचा हा दौरा असल्याने आता सोमवारीच काहीसे सुनेसुने व सुस्त पालिका मुख्यालय पुन्हा मस्त होणार आहे.

आधार क्रमांक – सिम कार्डला लिंक करण्याची मुदत ६ फेब्रुवारीपर्यंत

नवी दिल्ली: जर तुम्ही अजूनही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केला नसेल, तर तो तातडीने करुन घ्या. अन्यथा तुमची मोबाईल सेवा बंद होऊ शकते. मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्यासाठी ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारने तसे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल केलं.