Wednesday, 16 April 2014

Help desks in Pimpri to ensure maximum polling

Pimpri: To increase the voting percentage in the Pimpri segment of the Maval Lok Sabha constituency, the local poll administration has decided to open help desks at 29 locations in Pimpri on the voting day.

NCP crackdown on errant cadre imminent?

Pimpri: The local Nationalist Congress Party (NCP) leadership is understood to have furnished a list of over 20 names of party leaders and cadres who are allegedly involved in anti-party activities in the elections.

रेशनकार्ड हा पुरावा नाही!

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी रेशनकार्ड हा पुरावा ग्राह्य धरला जाणार नसल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच निवडणूक यंत्रणेमार्फत वाटप झालेली व्होटर स्लिप मतदाराकडे नसेल तर अन्य अकरा पुराव्यांपैकी एक पुरावा असेल तरच मतदान करू दिले जाणार आहे.

मावळात 2185 मतदान केंद्र, 12 हजार कर्मचा-यांची नियुक्ती

21 लाख 52 हजार मतदार 
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या गुरुवारी (दि. 17) मतदान होत आहे. त्यासाठी 2185 केंद्रांवर मतदान होत असून त्यात 19 लाख 52 हजार 198 मतदार भाग घेणार आहेत. त्यासाठी 12 हजार 123 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या मतदार संघात 50 मतदान केंद्र संवेदनशील ठरविण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत दिली.

भुमापक महिला अधिका-याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

पिंपरीतील परिरक्षक भुमापक अधिकारी सुनिता पठारे यांना दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्या पिंपरीतील कार्यालयात सापळा लावून आज (मंगळवारी) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

आता सोशल मीडियाद्वारेही प्रचार नको- जिल्हाधिकारी

प्रचाराची मुदत संपली असल्यामुळे उमेदवारांनी सोशल मीडियाद्वारे प्रचार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

आचारसंहिता भंगाच्या २00 तक्रारी

- ५५ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल : जिल्ह्यातील सर्व चेक पोस्टवर वाहनांची कडक तपासणी 

पुणे: जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात गेल्या एका महिन्यात आचारसंहिता भंगाच्या २00 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी ५५ प्रकरणांमध्ये प्रशासनाने संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.

मतदान करूनच सहलीला जाऊ..!

पुणे : ‘मतदार राजा जागा हो’ अशी हाक देण्याची वेळ आता राहिलेली नसून जागृत झालेला मतदार स्वत:हून मतदानाकरिता पुढाकार घेत आहे. शासकीय सुटी आणि शनिवार-रविवारची जोडून सुटी आल्याने सहलीला जाण्याआधी मतदान करण्याकडे जास्त ओढा असणारे वातावरण पुण्यामध्ये निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि खासगी ट्रॅव्हल्सची आरक्षणे १७ तारखेपेक्षा १८ एप्रिल रोजी मोठय़ा प्रमाणात झाली असून, मतदानाच्या दिवशी एसटीच्या ५0 टक्के फेर्‍या कमी होण्याची शक्यता आहे. 

चिंचवडला आजपासून ज्ञानोत्सव कार्यक्रम

पिंपरी : चिरंजीव पीठ, निगडी आणि कल्याण प्रतिष्ठान, केशवनगर यांच्या वतीने पं. राजू सवार यांच्या ‘श्री दत्तात्रय मोक्षगीता महाभाष्य सप्तखंडा’चे प्रकाशन व त्यानिमित्त चिंचवड गावात बुधवारपासून ‘ज्ञानोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवनीत कौर यांच्या 'ग्लॅमरस' रॅलीला ...

मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या प्रचारार्थ आज शेवटच्या दिवशी अभिनेत्री तथा अमरावती मतदार संघातील उमेदवार नवनीत कौर यांची रॅली काढण्यात आली. त्यात अभिनेत्री नेहा पेंडसे हिनेही सहभाग घेतल्याने रॅलीला 'ग्लॅमरस' स्वरुप आले होते. कौर यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा अक्षरशः झुंबड उडाली होती.

प्राधिकरणबाधितांमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात संताप

मावळ लोकसभेच्या निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस प्राधिकरणबाधित शेतक-यांच्या परताव्याबद्दल कोणतीही भूमिका मांडली नाही. त्यामुळे प्राधिकरणबाधितांमध्ये संताप पसरला असल्याचे प्राधिकरणबाधित संघर्ष कृती समितीचे नेते कैलास कुटे यांनी म्हटले आहे.