एमपीसी न्यूज - भक्ती-शक्ती चौकातील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचा आराखडा नियोजित मेट्रो, मोनोरेल आदी तत्सम प्रकल्पांचा विचार करून तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चौकातील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम स्थगित करून नवीन आराखडा तयार करून ‘मेट्रो’, राज्य शासन आदींकडून नवीन आराखड्यास मंजुरी घेण्यात यावी. ‘मेट्रो’ने मंजुरी दिलेल्या आराखड्यानुसार येथील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 4 August 2017
“भक्ती-शक्ती’ उड्डाणपूल चुकीचा?
अमोल थोरात यांचा आरोप : कामाला स्थगिती देण्याची मागणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – भक्ती-शक्ती चौकातील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचा आराखडा नियोजित मेट्रो, मोनोरेल आदी तत्सम प्रकल्पांचा विचार करून तयार केलेला नाही. त्यामुळे या चौकातील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम स्थगित करून नवीन आराखडा तयार करून त्याला मेट्रो व राज्य शासनाची मंजुरी घेण्यात यावी. मेट्रोने मंजुरी दिलेल्या आराखड्यानुसार येथील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.
मेट्रोच्या आराखड्यानुसार कामे करण्याची मागणी
पिंपरी : भक्ती-शक्ती चौकातील ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाचा आराखडा नियोजित मेट्रो, मोनोरेल आदी तत्सम प्रकल्पांचा विचार करून तयार करण्यात आलेला नाही.
[Video] मेट्रो प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 486 झाडांचा बळी; पर्यावरण प्रेमींची नाराजी
एमपीसी न्यूज - मेट्रो प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 486 झाडे तोडावी लागणार आहेत. प्रकल्पासाठी काढण्यात येणा-या या झाडांमुळे शहराचे पर्यावरण धोक्यात येणार आहे. पर्यावरण प्रेमींनी तीव्र शद्बांत नाराजी व्यक्त केली आहे. तर, पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये तोडावयाच्या वृक्षांच्या 10 पट अधिक वृक्ष लावून पाच वर्षे संवर्धन करणार असल्याचे, महामेट्रोने स्पष्ट केले आहे.
Two new zones in PCMC limits from August 9
Two new zones in PCMC limits from August 9. TNN | Aug 4, 2017, 12:32 AM IST. Pimpri Chinchwad: The municipal corporation will form two new zones on August 9 to provide citizens easy access to municipal offices and officials. Recommended By Colombia.
CM tweets that separate police commissionerate under consideration for Pimpri- Chinchwad. Is this needed?
Areas like Chikhali and Moshi have a large slum population — their growth amid a recession indicates the possibility of anti-social elements committing increasing crimes. It is better that the law is implemented here by a separate Pimpri- Chinchwad ...
पिंपरी शहरातील प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांची काय असेल भूमिका?
पिंपरी - शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या १२ ऑगस्टला शहरात येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात शहरातील विविध प्रश्नांबाबत ते काय भूमिका घेतात, याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.
जातीच्या दाखल्यावरील निकालाची प्रतीक्षा कायम
पिंपरी - महापौर नितीन काळजे यांच्या कुणबी जात दाखल्याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर गुरुवारी सुनावणी झाली. समितीने महापौर काळजे आणि तक्रारदार घनश्याम खेडकर या दोघांची बाजू ऐकून घेतली. मात्र, निकाल राखून ठेवला.
एमआयडीसीमार्फत 18 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन
– सुभाष देसाई यांचा “हिरवा कंदील’
पिंपरी – शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सुमारे 100 एकर जागेवरील 18 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन एमआयडीसीमार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीत घेतला. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी हा विषय तात्काळ पाठविण्याचे आदेशही उद्योग मंत्र्यांनी दिले असल्याची माहिती शिवसेना आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी दिली.
‘मिडी बस’च्या माध्यमातून शटल सेवा
पुणे - शहरात येत्या तीन महिन्यांत सुमारे १५-२० मार्गांवर ‘शटल बस’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात येत्या दोन महिन्यांपासून दाखल होणाऱ्या ‘मिडी’ म्हणजेच ३५ सीटर बसच्या माध्यमातून ही सेवा पुरविण्यात येणार आहे. त्याबरोबर मार्गांचे सुसूत्रीकरण करण्याची प्रक्रियादेखील पीएमपी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे ३५० हून अधिक असलेले मार्ग आता २४३ वर आले आहेत.
दमछाक
पीएमपी सेवा सुधारली; काही प्रश्न कायमपुणे - अपेक्षित थांब्यावर बस थांबवली नाही म्हणून जाब विचारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चालकाने मारहाण केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर थांब्यावर अपेक्षित ठिकाणी बस थांबतात का, यासह पीएमपी सेवेबाबत ‘सकाळ’ने गुरुवारी पाहणी केली. यात अनेक ठिकाणी बस थांब्यापासून लांबच उभ्या राहत असल्याचे दिसले. गाड्यांच्या फेऱ्या वाढल्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे, मात्र वेळापत्रक न पाळणे, महिलांच्या राखीव जागांवर बसणारे पुरुष प्रवासी यासारखे प्रश्न असल्याचे आढळले.
सांगवीतील विसर्जन घाटाची दूरवस्था
सांगवी – जुनी सांगवी येथील पवना नदीवरील गणपती विसर्जन घाटाच्या पायऱ्या तुटल्या असून, गणपती स्थापनेच्या अगोदर त्या दुरुस्ती करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये धुमाकूळ घालणारी चोरट्यांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यात चिंचवडपोलिसांना यश आले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी ...
शालेय क्रीडा स्पर्धांचे नवीन वेळापत्रक जाहीर
जिल्हा क्रीडा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयोजित जिल्हास्तर शालेय आणि महिला क्रीडा स्पर्धांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
एच. ए. कामगारांचे पुन्हा वेतन थकले
चार महिन्यांपासून प्रतिक्षा : कामगारांमध्ये संतापाचे वातावरण
पिंपरी – केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या पिंपरीतील हिंदुस्तान ऍन्टीबायोटिक्स (एच. ए.) मधील कामगारांचे वेतन थकण्याचा प्रकार पुन्हा सुरु झाला आहे. या कामगारांचे एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत एकूण चार महिन्यांचे वेतन थकले आहे. आता आणखी किती महिन्यानंतर वेतन मिळणार, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
चापेकर बंधूंच्या क्रांतीतीर्थ स्मारकाचा होणार कायापालट
संग्रहालय, ग्रंथालय, म्युरल्सद्वारे उलगडणार ऐतिहासिक कालखंड
पिंपरी: चिंचवडगाव येथील क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या क्रांतीतीर्थ स्मारकाचा (चापेकर वाडा) कायापालट होणार आहे. स्मारकाशेजारील सात गुंठे मोकळ्या जागेत संग्रहालय, ग्रंथालय आणि म्युरल्सद्वारे ऐतिहासिक कालखंड उलगडणार आहे. संबंधित कामाचे भूमीपूजन सप्टेंबरमध्ये करण्याचे नियोजन आहे.
Subscribe to:
Posts (Atom)