MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 10 October 2018
कारवाईच्या बडग्यानंतर वाहन चालकांना समजलंय वाहतूक नियमांचे महत्व
एमपीसी न्यूज – विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, सिग्नल न पाळणे, भर रस्त्यात वाहने थांबविणे हे चित्र मागील कित्येक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत होते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात अफाट प्रगती केलेल्या या औद्योगिकनगरीला वाहतुकीच्या बाबतीत मात्र मोठे खेडे असेच म्हटले जायचे पण मागील दोन महिन्यांपासून वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालकांविरोधात सुरु केलेल्या कारवाई सत्रानंतर […]
सव्वाशे अनधिकृत होर्डिंग हटवून 25 जणांवर गुन्हा
पिंपरी – पुण्यातील जुना बाजाराजवळ होर्डींग पडल्याची दुर्घटना घडल्यानंतर अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड महापालिकेतर्फे अनधिकृत होर्डिंगवर जोमाने कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार काळेवाडी येथे बीआरटीएस मार्गालगतचे होर्डिंग मंगळवारी हटविण्यात आले. होर्डिंगचे उंचचउचं सांगाडे हटविण्यासाठी महाकाय क्रेनला पाचारण करण्यात आले होते. महापालिकेने आतपर्यंत सव्वाशे होर्डिंगवर कारवाई केली आहे. या प्रकरणी 25 जणांवर गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अनधिकृत होर्डिंग व्यावयिकांचे धाबे दणाणले आहे.
२६ कोटी ३९ लाखाच्या विकास विषयक कामांना स्थायीची मंजूरी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे २६ कोटी ३९ लाख २९ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.
खंडोबा माळ चौकात सिग्नलवर बीआरटी बस बंद
एमपीसी न्यूज – इंजिन गरम झाल्याने आकुर्डी येथे बीआरटी मार्गात बस बंद पडली. आज (मंगळवार) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खंडोबा माळ चौकातील सिग्नलवर हा प्रकार घडला आहे. पीएमपीएमएल बस क्रमांक 42 ही बस कात्रज येथून निगडीकडे जात होती. बस आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकातील सिग्नलवर आली असता बसचे इंजिन गरम झाल्याने बस अचानक बंद पडली. त्यावेळी बस पूर्ण भरलेली होती. बस […]
सिंगिग सुपरस्टार स्पर्धेत मयुरी अत्रे प्रथम
आकुर्डी : रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्यावतीने रोटरी सिंगिंग सुपरस्टार स्पर्धा घेण्यात आली. सिंगिंग सुपरस्टार स्पर्धेत मयुरी अत्रे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेस उत्स्फूर्त सहभाग लाभला. आकुर्डी येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 78 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी 30 स्पर्धकांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यात 8 स्पर्धकानी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अलबेला सजन आयो रे, ढोलकीच्या तालावर, दिल से रे, बहुत प्यार करते है तुमको सनम, मैं फिर भी तुमको छाऊंगा या अशा अनेक गाण्यांनी स्पर्धेत रंगत आणली. स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली. परीक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले.
स्मार्ट सिटीतील कचरा कुंड्या ‘ओव्हर फ्लो
पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणार्या पिंपरी-चिंचवड शहरातील कचर्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात सर्वत्र कचरा कुंड्या ‘ओव्हर फ्लो’ झाल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सत्ताधारी आणि प्रशासनाने त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. स्वच्छ भारत अभियानात शहराचा कचरा झाल्यानंतर देखील कच-या सारख्या गहन प्रश्नाकडे प्रशासन आणि सत्ताधारी गांभीर्याने पाहत नसल्याने शहरवासियांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
एका वर्षात ताथवडेचा सुधारित डीपी झाला मंजुर
पिंपरी : नुकताच पिंपरी-चिंचवड शहरातील 10 वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या ताथवडे गावाचा सुधारित विकास आराखडा म्हणजेच ‘डीपी’. 28 ठिकाणच्या आरक्षणांमध्ये बदल करून तो मंजूर करण्यात आला. परंतु 1986 पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट असलेल्या 15 पेक्षा जास्त गावांच्या सुधारित विकास आराखडयाबाबत प्रशासन गेल्या 33 वर्षांपासून जैसे थेच का? 1995 पासून अद्याप पर्यंत म्हणजेच 23 वर्ष होईपर्यंत डीपी सुधारित न करण्यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न शहरवासियांना भेडसावत आहे, असे हल्लाबोल घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी केला आहे.
आयुक्तसाहेब होर्डिंगला द्या की झटका…
पिंपरी : शहरात एकूण 1850 अधिकृत होर्डिंग्ज आहेत. तर, 325 अनधिकृत होर्डिग्ज असून आकाशचिन्ह व परवाना विभागाने या होर्डिग्ज धारकांना नोटीस बजाविल्या आहेत. तर, आतापर्यंत 22 जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात होर्डिंग काढताना कोणतीही खबरदारी न घेतल्याने होर्डिंग्जचा सांगाडा कोसळल्याने चारजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पुणे, पिंपरी व जिल्ह्यात होणार ‘यिन’ची प्रतिनिधी निवड
पुणे - महाविद्यालयीन तरुणाईतील बुद्धिमत्ता व सर्जनशीलतेला वाव देऊन त्यांच्यात नेतृत्वगुण तयार करणाऱ्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या नेतृत्व विकास उपक्रमांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील प्रतिनिधींची निवड प्रक्रिया गुरुवार (ता. ११) आणि शुक्रवारी (ता. १२) होणार आहे.
चिंचवडमधील गोठ्यामुळे दुर्गंधी (व्हिडिओ)
पिंपरी - महापालिकेच्याच चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाच्या इमारतीलगतच बेकायदा गोठा सुरू आहे. जनावरांचे मलमूत्र पार्किंगमध्ये पसरत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
कुटुंबकल्याणच्या साहित्य नोंदी ऑनलाइन
औंध - कुटुंबकल्याण विभागाच्या साहित्याच्या नोंदी आता फॅमिली प्लॅनिंग लॉजिस्टिक इन्फॉर्मेशन सिस्टीमद्वारे होणार असल्याने मागणी व पुरवठ्याची माहिती एलएमआयएस या सॉफ्टवेअरवर ऑनलाइन बघता येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप बोरा यांनी दिली. ही माहिती वेब, मोबाईल ॲप व एसएमएस याद्वारे उपलब्ध केली जाईल असेही ते म्हणाले.
म्हाळुंगे-माणच्या टीपी स्कीममध्ये त्रुटी
पुणे - म्हाळुंगे-माण येथील नगर रचना योजनेवर (टीपी स्कीम) दाखल हरकती- सूचनांनुसार करण्यात आलेल्या बदलाचे नकाशे नाहीत, तसेच आरक्षणांसाठीच्या जागांना अरुंद रस्ते ठेवणे, प्लॉट विकसित होऊ शकणार नाहीत अशा पद्धतीने त्यांची रचना करणे, लॅण्डलॉक करणे अशा स्वरूपाच्या अनेक त्रुटी राहिल्या असल्याचे नगर रचना विभागाने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) कळविले आहे. यावरून योजना करताना भूखंडांचे नियोजन व्यवस्थित झालेले नसल्याचे समोर आले आहे.
पोटहिश्श्याचे वाद मिटणार
पुणे - ग्रामीणसह शहरी भागात जमिनीच्या पोटहिश्श्यावरून वर्षानुवर्षे वाद होतात. मात्र आता ही प्रक्रिया सुटसुटीत केली आहे. जमिनीचे पोटहिस्से करण्यासाठी आता सर्व सदस्यांच्या सहमतीची, अथवा न्यायालयाच्या आदेशाची गरज नाही. एखाद्या सदस्याची हरकत असेल, अथवा मोजणीच्या वेळेस तो गैरहजर राहात असेल, तर त्याला नोटीस काढावी. सुनावणीनंतर ती निकाली काढून जमिनीचे पोटहिस्से करावेत, असा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. यामुळे अभिलेखातील दुरुस्तीसही मदत होणार आहे.
निगडी प्राधिकरणात आदिशक्ती-स्त्रीशक्ती महोत्सवाचे आयोजन
चौफेर न्यूज – निगडी प्राधिकरण येथे नगरसेवक अमित गावडे व श्री समर्थ युवक प्रतिष्ठाणच्यावतीने आदिशक्ती-स्त्रीशक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. निगडी प्राधिकरण येथील से. २६, छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाशेजारील, हेडगेवार भवनाच्या प्रांगणात हा महोत्सव रंगणार आहे.
पालिकेसमोर “ढोल बजाओ’ आंदोलन
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता राजन पाटील यांच्यावर कारवाईसह प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर मंगळवारी (दि.9) “ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले. ढोल वाजवून महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा यावेळी निषेध करण्यात आला.
आरोग्य शिबिरामध्ये पाचशे नागरिकांची तपासणी
दिघी- भारतीय जनता पक्षाच्या वतीने बोपखेल येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा सुमारे 500 नागरिकांनी लाभ घेतला. बऱ्याच नागरिकांना त्यांना होत असलेल्या आजाराबद्दल माहितीच नव्हती. या शिबिरामुळे अनेकांना आपल्या तब्येतीविषयी योग्य ती माहिती मिळाली असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. शिबिराचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्यावतीने दिघी बोपखेल प्रभागाच्या नगरसेविका हिराबाई गोवर्धन घुले व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष चेतन घुले यांनी पुढाकार घेऊन केले.
नवरात्रीसाठी काळ्या मातीचे वितरण
निगडी – वाढत्या शहरीकरणामुळे सध्या काळी माती शहरात दिसेनासी झाली आहे. नवरात्रीमध्ये घटस्थापनेसाठी काळ्या मातीस विशेष महत्त्व असते. भाविकांना काळ्या मातीसाठी फिरावे लागत असल्याचे लक्षात घेऊन स्विकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर यांनी तळवडे परिसरात भाविकांना काळ्या मातीचे वाटप केले. पांडुरंग भालेकर यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले की, काळी माती दुर्मिळ झाली आहे.
नवरात्रीसाठी सजले श्री घारजाई माता मंदिर
निगडी – रुपीनगर-तळवडे भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री घारजाईमाता मंदिरात, नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापनेच्या निमित्ताने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील स्वच्छतेसह मंदिर रंगरंगोटी व दीपमाळ स्वच्छतेची कामे करण्यात आली आहेत. तसेच नऊ दिवस होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन आणि नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.
कचऱ्याच्या निविदेप्रकरणी सत्ताधाऱ्यांचा “यू टर्न’
पिंपरी – शहरातील कचरा आठ वर्षे उचलण्याच्या प्रसिद्ध केलेल्या नव्या निविदांना स्थगिती देत, जुन्याच निविदेत फेरबदल करत या निविदेला मान्यता दिली आहे. सुमारे 350 कोटी खर्चाच्या निविदेच्या ऐनवेळच्या प्रस्तावाला मान्यता देताना या प्रक्रियेत आगामी आठ वर्षांत 85 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचा दावा स्थायी सदस्य विलास मडिगेरी यांनी केला आहे. त्यामुळे जुन्याच निविदांना मान्यता द्यायची होती, तर नवीन निविदा प्रसिद्ध तरी का केली? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
घंटागाडी कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीसाठी 20 हजार रुपये बक्षिस रक्कम दिली जाणार शाहे. ऐनवेळी मांडलेल्या प्रस्तावाला स्थायीने मान्यता दिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या रकमेत पाच हजारांची वाढ करण्यात आली आहे. स्थायी समितीने या खर्चाच्या ऐनवेळच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
पिंपरी-चिंचवड पालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना गेल्यावर्षी 15हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. या रकमेत यंदा वाढ करण्याची या कर्मचाऱ्यांची मागण हिोती. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यात पाच हजाराने वाढ देण्यात आली आहे. गेल्या वर्षी 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान होते. घंटागाडी कर्मचाऱ्यांना यामुळे यंदा 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
पिंपरी-चिंचवड पालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना गेल्यावर्षी 15हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. या रकमेत यंदा वाढ करण्याची या कर्मचाऱ्यांची मागण हिोती. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यात पाच हजाराने वाढ देण्यात आली आहे. गेल्या वर्षी 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान होते. घंटागाडी कर्मचाऱ्यांना यामुळे यंदा 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)