Tuesday, 11 March 2014

स्थानिकांच्या मदतीने गुन्हेगारांवर जरब

हिंजवडी पोलिस स्टेशनची हद्द पुणे मनपा, पिंपरी चिंचवड व हिंजवडी परिसरातील गावे यांच्यामध्ये विभागली गेली आहे. तसेच आयटी पार्कमधील कंपन्यांमध्ये स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था आहे. तीन पोलिस चौकींच्या माध्यमांतून दररोज आढावा घेवून ...

PCMC demolishes 27 illegal structures

The anti-encroachment squad of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Monday demolished an unauthorized construction in Akurdi.

माझं नाव मतदारयादीत आहे का हो?

१८००२३३०००४ या क्रमांकावर संपर्क साधून मतदाराने त्याचे नाव सांगितल्यानंतर मतदाराला त्याच्या मोबाईल क्रमांकावर त्याचे नाव कोणत्या मतदारसंघात, यादीतील अनुक्रमांक , मतदान केंद्राचे नाव एसएमएस केला जातो.

गर्भवती महिलांना मिळणार लोअर बर्थ

पुणे : वयस्क, गर्भवती महिलांचा रेल्वेप्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. गर्भवती, वयस्क महिलांना यापुढे रेल्वेमध्ये लोअर बर्थ देण्यात येणार असून, त्यादृष्टीने आरक्षण फॉर्ममध्ये नोंदणी करण्यासाठी या अर्जामध्ये बदल करण्यात येत आहे. आरक्षित श्रेणीमध्ये कोणत्याही परिस्थितीत अशा महिलांना लोअर बर्थ देण्यात येणार आहे. 

आघाडी सरकारविरोधात लढणार

पिंपरी : अनधिकृत बांधकामप्रश्न न सोडविल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकार विरोधात लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपळे गुरव येथे केली. मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून जगताप यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असताना अचानकपणे त्यांनी घेतलेल्या भूमिकेने राजकीय खळबळ उडवून दिली आहे. रविवारी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि मीनाक्षी पाटील यांच्या समवेत जगताप यांनी आघाडी सरकार विरोधात दंड थोपटले आहेत. जनता देईल तो पर्याय स्वीकारेन, अशी भूमिका जगताप यांनी घेतली. 

बाराशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार

पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून राजकीय पक्षांमध्ये रणकंदन माजलेले असताना, दुसरीकडे निवडणुकीसाठी आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे, असे पुणे पोलिसांच्या परिमंडळ तीनचे उपायुक्त डॉ.

आकुर्डीत तीन मजली अवैध बांधकामावर ...

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी बेकायदा बांधकामांवरची कारवाई पुढे सुरुच ठेवली असून आकुर्डी येथील तीन मजली इमारतीवर आज (सोमवारी) बुल्डोजर फिरविण्यात आला.

पर्यावरण संवर्धन समितीच्या ...

पर्यावरण संवर्धन समितीने सुरु केलेल्या पर्यावरण विषयक संकेतस्थळाचे अनावरण पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

मावळमधील संभाव्य 'उलथा-पालथी'चा ...

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची उमेदवारी स्वीकारणार नाही, असे सांगत शेकापच्या पाठिंब्यावर मावळमधून लोकसभा निवडणूक लढवू इच्छिण्याच्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भुमिकेमुळे पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्याची गंभीर दखल घेत उद्या (मंगळवारी) थेरगाव येथे कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलाविली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली.

गडकरी समर्थक म्हणतात शिरुरमध्ये ...

पिंपरी-चिंचवड भाजपमधील गडकरी समर्थक एका मोठ्या गटाने शिरुर लोकसभा मतदार संघात 'इंजिन' चालवा, असे फर्मान सोडले असल्याची तक्रार मुंडे गटाने केली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते संभ्रमात सापडले असून याबाबतचे गा-हाणे आज (सोमवारी) पक्षश्रेष्ठींपुढे मांडण्यात आल्याचे समजते. या सर्व प्रकारामुळे भोसरी विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

क्रीडाकुलच्या विद्यार्थ्यांनी ...

निगडी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या क्रीडाकुल विभागातील खेळाडू विद्यार्थ्यांनी भारतीय लष्करात कसे जाता येईल, याविषयीचे मार्गदर्शन मेजर विक्रांत काळे यांनी केले.

बार असोसिएशनचा रौप्यमहोत्सव साजरा

पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचा रौप्य महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. पिंपरी न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश ए. पी. मोहिते, एस. पी. सय्यद, पिंपरी बारचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील कड, अ‍ॅड. अतिश लांडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. न्यायालय परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी अ‍ॅड़ सुहास पडवळ, अ‍ॅड. प्रवीण बोडके, अ‍ॅड. सुरेश खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी बारचे आजवरचे अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.