जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदाचा हक्क बजावावा यासाठी सनराईज प्रतिष्ठानच्या वतीने काही तरुणांनी आज (रविवारी) निगडीतील भक्ती-शक्ती उद्यान व परिसरात मतदान जनजागृती केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी पिंपरी-चिंचवड मधील काही युवकांनी मिळून जनजागृती करण्याचे काम सुरू केले आहे.
सनराईज प्रतिष्ठानमध्ये एकूण 8 ते 10 तरूण आहेत. सर्व तरूण हे उच्चशिक्षित असून ते आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करतात. हे सर्व तरूण ट्रेकींगच्या माध्यमातून एकमेकांना भेटले व समाजासाठी काहीतरी करावे यासाठी ते सध्या मतदान जनजागृती करीत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अतुल पाध्ये यांनी सांगितले.