Monday, 7 May 2018

पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिक्षण समिती गठीत करा ; आयुक्तांचे आदेश

आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आदेश

पिंपरी (विकास शिंदे) – बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 च्या कलम 9 प्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेत नव्याने शिक्षण समिती स्थापन करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला. महापालिका भैागोलिक क्षेत्रातील सर्व शाळांसाठी ( सर्व व्यवस्थापन, माध्यम, परिक्षा मंडळे, खासगी अनुदानित, खासगी विना अनुदानित) आदींची जबाबदारी पार पाडण्यासाठी 9 सदस्यांची नव्याने शिक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिक्षण समिती गठीत करा ; आयुक्तांचे आदेश

Dapodi bridge nears completion, one arm likely to be opened for traffic in early June

THE HARRIS bridge at Dapodi on Pune-Mumbai Highway, which witnesses heavy traffic most of the day, is soon likely to offer some breather for motorists with the additional bridge work nearing completion. The work started 15 months ago.

Harris bridge, dapodi, pune-mumbai highway, Pune, pune news, indian express news

Empire Estate flyover may open to traffic in a week

PIMPRI CHINCHWAD: The long-delayed Empire Estate flyover in Chinchwad may be opened to vehicular traffic in a week.

PCMC to set up welfare centre for differently abled people in Morwadi

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will construct a welfare centre for differently abled people.

पवनामाई जलपर्णीमुक्त अभियानांतंर्गत 2 ट्रक जलपर्णी काढली

निर्भीडसत्ता – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम या अभियानांतर्गत रविवारी (दि. 6 ) 2 ट्रक जलपर्णी काढण्यात आली. अभियानाचे 183 दिवस पूर्ण झाले असून आतापर्यंत 1275 ट्रक जलपर्णी नदीतून काढण्यात आली आहे.

मेट्रोवर आता ‘पुणेरी टॅलेंट’ची पाटी

पुणे - देशातील मेट्रो प्रकल्पांचा विस्तार वेगाने होत असतानाच आता त्यासाठी कुशल मनुष्यबळाची कमतरता भेडसावू लागली आहे. त्यावर शिक्षणाच्या माहेरघरातून मार्ग शोधण्यात यश आले आहे. अभियांत्रिकीबरोबरच विज्ञान शाखेच्या पदवीधरांनाही आता ‘मेट्रो’ प्रकल्पांत करिअर करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठीचा खास अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षात येथे सुरू होत आहे. त्यामुळे देशातील मेट्रो प्रकल्पांना तंत्रज्ञांची रसद पुण्यातून मिळणार आहे.

नगरसेवकांचीच ठेकेदारी, मुख्यमंत्री काय करणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवकांना अगदी निक्षून सांगितले होते की, ‘नगरसेवकांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी ठेकेदारी करू नये’. तोच नियम पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपलाही तंतोतंत लागू आहे. मात्र, बहुतांशी नगरसेवक आणि त्यांच्या तमाम मित्र परिवार, नातेवाइकांना इथल्या ठेक्‍यातच खरा इंटरेस्ट आहे. निवडणुकीत केलेला कोटी-दोन कोटी खर्च त्याशिवाय निघणार कसा, असा बिनतोड युक्तिवाद काही लोकप्रतिनिधींचा आहे. 

पिंपरीमध्ये अवैध धंदे जोरात

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शहरातील आठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुमारे ३० मटका आणि पत्त्याचे क्‍लब सुरू असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.

प्राधिकरणातील गणेश तलावात गाळ

पिंपरी - प्राधिकरणातील गणेश तलावात साठलेल्या गाळाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असून तलावात शेवाळही साचले आहे. याची तातडीने सफाई करण्याची आवश्‍यकता आहे. 

पहाटप्रहरी उडाले हास्याचे फवारे...

पिंपरी - पहाटे सहाची वेळ. गार वारा सुटलेला. अशा प्रसन्न वातावरणात कासारवाडीतील पटांगणात हास्याचे फवारे उडू लागले. वयाची बंधने झुगारून देत सर्व वयोगटातील नागरिकांनी रावण हास्य, स्वागत हास्य, डेक्कन क्वीन असे हास्याचे प्रकार उत्साहाने केले. निमित्त होते जागतिक हास्यदिवसाचे.

बांधकाम मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर

पिंपरी - बांधकाम मजुरांचा सुरक्षेच्या उपाययोजनांअभावी मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत असताना, महापालिका थेरगाव रुग्णालयाच्या बांधकाम साइटवरच मजुरांच्या जिवीताच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. कायद्यानुसार मजुरांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे बंधनकारक आहे. महापालिका मात्र, या कायद्याला पायदळी तुडवत आहे. 

Flouting norms, BJP nominates party workers and leaders to PCMC panels

IN what is being seen as a violation of civic norms, the BJP in Pimpri-Chinchwad nominated 24 party workers and leaders — instead of members of NGOs or community-based organisations (CBOs) — to eight divisional ward committees of the civic body

Pimpri-Chinchwad, community-based organisations, PCMC panel, BJP, Indian express news

पिंपरीत भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांचा डाव अर्ध्यावर मोडण्याच्या हालचाली

नामनिर्देशित सदस्यांच्या धर्तीवर नवा प्रयोग

एम्पायर इस्टेट पुलाचे उद्घाटनापूर्वीच नामकरण; विविध संघटनांनी दिले ‘लहुजी वस्ताद’ यांचे नाव

पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील एम्पायर इस्टेटच्या उड्डाणपुलासाठी महापालिकेने संत मदर तेरेसा यांचे नाव निश्चित केले होते. मात्र, उद्घाटनापूर्वी शहरातील मातंग समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि बारा बलुतेदार संघटनांच्या वतीने “क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे उड्डाणपूल” असे नामकरण करण्यात आले आहे.

माओवादी लोकशाहीवादी असल्याचे ढोंग करून तरुणांना जाळ्यात ओढतात – स्मिता गायकवाड

निर्भीडसत्ता – नक्षलवाद हा माओवादी विचारसरणीतून सुरु झाला. आदिवासी किंवा दलितांचा उध्दार ही फक्त तरुणांना आकर्षित करण्याची फसवी घोषणा आहे. बंदुकीच्या जोरावर “लाल किले पे लाल निशान” हे त्यांचे अंतिम ध्येय आहे. शहरी भागात लोकशाहीवादी असल्याचे ढोंग करुन तरुणांना जाळ्यात ओढतात. त्यांना विघातक कारवाया करायला प्रवृत्त करतात.म्हणून माओवाद हा देशाच्या आंतरिक सुरक्षिततेला धोका आहे, असे मत निवृत्त सैन्याधिकारी स्मिता गायकवाड यांनी व्यक्त केले.

लोहगाव विमानतळ देशात तिसरे

पुणे - प्रवासी संख्येच्या वाढीमध्ये लोहगाव विमानतळाने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तब्बल 20.6 टक्‍क्‍यांनी प्रवासी संख्या वाढली आहे. कोलकता पहिल्या, तर अहमदाबाद विमानतळ दुसऱ्या स्थानावर आहे. 

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

पुणे - हीरक महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सकाळ इंडिया फाउंडेशनने या वर्षीही उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांकडून बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले आहेत. फाउंडेशनतर्फे ५५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

नीटसाठी वीस हजार विद्यार्थी

पुणे - एकीकडे परीक्षेच्या ॲडमिट कार्डवर छायाचित्र चिकटविण्याची घाई, विद्यार्थिनींकडील कानातले-नाकातले, तर विद्यार्थ्यांच्या गळ्यातील चेन, हातातील ब्रेसलेट, घड्याळ काढण्याची लगबग, तर दुसरीकडे परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची सुरू असलेली तपासणी, नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी सज्ज असलेले अधिकारी आणि कर्मचारी अशा काहीशा ‘टेन्शन’मय वातावरणात शहरातील जवळपास ३० हून अधिक परीक्षा केंद्रांवर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) पार पडली. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी शहरातील सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.