Saturday, 24 November 2018

पुढील पन्नास वर्षांचे नियोजन करत आहोत : पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांचे प्रतिपादन

पुण्यातील सध्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या बनलेल्या वाहतूक प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुमारे सात हजार 200 चौरस किलोमीटर लांबीच्या क्षेत्रफळाचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (सीएमपी) तयार करण्याचे नियोजन केले. त्याची माहिती येत्या 27 नोव्हेंबरला सादर करणार असल्याची माहिती पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी आज (दि .23) दिली.

पुढील पन्नास वर्षांचे नियोजन करत आहोत : पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांचे प्रतिपादन

‘पीसीएनटीडीए’चे तूर्तास विलिनीकरण नाही

'औद्योगिक आणि आयटी पार्क उदयास आलेला परिसर आणि कार्यक्षेत्रात वाढती लोकसंख्या पाहता येथे उत्तम नागरी सुविधा निर्माण करण्याचे मोठे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे तुर्तासतरी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण अशक्य आहे,' असे पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी स्पष्ट केले.

“त्या’ बांधकामांवर नियंत्रणाचा प्रयत्न!

पिंपरी – प्रत्येक शहराला नियोजनाची गरज आहे. मागील नगररचना योजनेच्या कायद्यात बदल केल्याने सद्यस्थितीत या योजनेला नागरिकांचा प्रतिसाद वाढणार आहे. तसेच, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या परिसरात अनियंत्रित बांधकाम सुरु असून त्यावरती नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, मत पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

पाणी नियोजनाचा पन्नास वर्षांचा मास्टर प्लॅन

पुण्यात औद्योगिकीकरण वेगाने वाढत आहे. त्यामुळे भविष्यात लोकसंख्याही वेगाने वाढणार. त्यासाठी रस्ते, पाणी या सुविधा मिळणे आवश्यक आहेत. त्यातील रस्ते सुविधा देण्याचे काम सोपे आहे. मात्र, पाण्यासाठी निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. पैसे देऊनही ते उपलब्ध होऊ शकत नाही. त्याकरिता पडणार्‍या पावसातून मिळणार्‍या पाण्याचे प्रभावी नियोजन करण्याचे धोरण पुणे महानगर प्राधिकरणाने स्वीकारले असून पुढील पन्नास वर्षांचा विचार करीत मास्टर प्लॅन करण्याचे नियोजन केले आहे. त्याची निविदाही नुकतीच प्रसिद्ध केली आहे.

Bids invited for Chikhali water treatment plant

PIMPRI CHINCHWAD: A water treatment plant (WTP) with a capacity of 300MLD will be constructed at Chikhali to cater to the increasing population in the twin cities, as specified in a tender document recently.

Illegal water supply to attract criminal cases now: PCMC

Connections to also be cut for over 11,000 such users, who missed chance to regularise

पीएमपीएलच्या आगार प्रमुखाचा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते गौरव

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या भोसरी आगाराने दिवाळीसना दरम्यान सर्वाधिक उत्पन्न मिळविले. पैशांच्या भरणा करण्यामध्ये भोसरी आगाराचा प्रथम क्रमांक आल्यानिमित्त आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आगार प्रमुख बापू वाघेरे यांच्या सत्कार करण्यात आला. तसेच बस चालकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी जॅकेटचे मोफत वाटप करण्यात आले.  भोसरीतील बीआरटी बस स्थानक येथे आज (शुक्रवारी)झालेल्या कार्यक्रमाला  हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक 

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाची दुरवस्था; आमदार लक्ष्मण जगतापांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले!

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दुरवस्थेबाबत भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी या रस्त्याचे काम करणारी रिलायन्स कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी (दि. २३) खडेबोल सुनावले. या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी जागेवर जाऊन या द्रुतगती महामार्गाची दुरवस्था दाखवली. या महामार्गाची दुरवस्था तातडीने दूर करण्यासोबतच महामार्गालगत तातडीने सुशोभिकरण करण्याची तंबी अधिकाऱ्यांना दिली. रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.    

“स्पोकन इंग्लिश’साठी 70 शिक्षक घेणार

पिंपरी – महापालिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरातील महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्रजीचे वर्ग डिसेंबर महिन्यापासून सुरु करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी 70 शिक्षकांना मानधनावर घेतले जाणार असल्याची माहिती, शिक्षण विभागाने दिली आहे.

किवळे-रावेत बीआरटी मार्गावरील पथदिव्यांच्या खांबात विजेचा प्रवाह

देहुरोड – किवळे-सांगवी बीआरटी मार्गावरील किवळे -रावेत दरम्यानच्या भागातील दोन्ही बाजूंच्या रस्त्यावरील 15 पथदिव्यांच्या खांबाच्या वीज वाहिनीच्या भागावरील झाकणे गायब झाली असल्याचे वीजवाहिन्या उघड्या दिसत आहेत. या खांबातून विजेचा धक्‍का लागून अपघात होण्याची भीती व्यक्‍त होत आहे.

पीएमपीएलची बसगाडी; धुरांच्या रेषा हवेत काढी..!

पीएमपीएलच्या ताब्यातील तब्बल 422 आऊटडेटेड बसेस सर्रासपणे रस्त्यांवर धूर ओकत धावत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात येत असताना, प्रशासन 150 इ-बसेस खरेदीची नौटंकी करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

पुणे,पिंपरी चिंचवडमधील म्हाडाच्या घरांसाठी सोडत जाहीर

निर्भीडसत्ता न्यूज –
पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळातर्फे (म्हाडा) पुणे-पिंपरी-चिंचवडमधील ८१२ परवडणाऱ्या घरांसाठी सोडत गुरुवारी (दि. २२) जाहीर झाली. या सोडतीसाठी येत्या ६ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. मात्र, प्रकल्पानुसार अ‍ॅमेनिटीजची वेगळी किंमत ग्राहकांना भरावी लागणार असल्याने म्हाडाच्या घरांची स्वस्ताई संबंधित प्रकल्पात असलेल्या सोयी-सुविधांवर अवलंबून असणार आहे.

संत तुकाराम महाराज पालखीचे चिंचवडगाव मार्गे देहुत प्रस्थान

एमपीसी न्यूज – गेले अनेक वर्षांपासून खंडित झालेली “काकड आरती” ची परंपरा यावर्षी पुन्हा जोमात चालु करण्यात आली. चिंचवड येथे संत तुकाराम महाराज पालखीचे चिंचवडगाव मार्गे देहुत प्रस्थान झाले. गेल्या महिनाभर सुरु असलेली काकड आरतीने त्याची सांगता झाली. त्यानंतर उत्साहाच्या वातावरणात दिंडी आणि मिरवणूक झाली त्यामध्ये तरुण , ग्रामस्थ आणि महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. ह.भ.प. […]

#EducationIssue दहावीची कलचाचणी ‘ॲप’द्वारे

पुणे - दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी आणि त्यांना करिअर मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त ठरणारी कलचाचणी आता ‘मोबाईल ॲप’द्वारे होणार आहे. यापूर्वी संगणकाच्या साहाय्याने होणारी ही चाचणी यंदापासून ‘ॲप’द्वारे ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.