विविध प्रकारच्या बॉम्बचे मॉडेल पाहाण्याची नागरिकांना संधी
पिंपरी, 24 नोव्हेंबर
पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटात दहशतवाद्यांनी वापरलेल्या बॉम्बचे मॉडेल व अन्य वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब जवळून पाहाण्याची नागरिकांना संधी मिळणार आहे. निमित्त आहे मुंबई येथे 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या शूरवीरांना आदरांजली वाहण्याचे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 25 November 2012
‘श्रीमंत’ महापालिकेला परवडत नसल्यामुळे भोसरी नाटय़गृह ‘बीओटी’ वर देण्याचा निर्णय
‘श्रीमंत’ महापालिकेला परवडत नसल्यामुळे भोसरी नाटय़गृह ‘बीओटी’ वर देण्याचा निर्णय:
'श्रीमंत' पिंपरी महापालिकेने आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याचे कारण देत २५ कोटी खर्चून बांधलेले भोसरीचे अंकुशराव लांडगे नाटय़गृह 'बीओटी' वर देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभारी आयुक्तांनी बरेच दिवस रखडवून ठेवलेला विषय आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी हातावेगळा केला असून या संदर्भात निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. विभागांमध्ये समन्वय नाही, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, उत्पन्नापेक्षा दुप्पट खर्च व कामगिरी दाखवण्यापेक्षा रडगाणे करणाऱ्या अधिकाऱ्यांची अनास्था यामुळेच हा निर्णय घ्यावा लागल्याचे मानले जाते.
िपपरी-चिंचवडसह भोसरी-आळंदी-चाकण परिसरातील मोठा प्रेक्षकवर्ग डोळ्यासमोर ठेवून उभारण्यात आलेल्या भोसरी नाटय़गृहासाठी तब्बल २५ कोटी रुपये खर्च झाला. त्या तुलनेत नाटय़गृहातून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे आहे आणि होणारा खर्च उत्पन्नाच्या दुप्पट आहे. मागील वर्षी ८० लाख रुपये खर्च झाले तर ४० लाख उत्पन्न मिळाले. यंदा ७ महिन्यात २२ लाखापर्यंत उत्पन्न गेले. मात्र, खर्चाचा आकडा दुप्पटच आहे. याशिवाय, दर महिन्याला येणारे अडीच लाखापर्यंतचे वीजबील ही डोकेदुखी कायम असून साफसफाईसह अन्य खर्च ठरलेला आहेच. एकीकडे आर्थिक ओढाताण असताना हक्काचे उत्पन्न मिळू शकते, त्या गोष्टींकडे प्रशासनाने कधी लक्ष दिले नाही, हे उघड गुपित आहे. नगररचना, भूमीिजदगी, प्रभाग कार्यालय, मुख्यालय यांचे एकामेकांत त्रांगडे राहिल्याने नाटय़गृहातील वाहनतळ, गॅलरी व उपाहारगृहाचा निर्णय झाला नाही. त्यामुळे चार वर्षांतील मिळू शकणारी मोठी रक्कम मातीत गेली. मात्र, त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही.
खर्च व उत्पन्नाची तोंडमिळवणी होत नसल्याचे कारण देत नाटय़गृह 'बीओटी' वर देण्याचा प्रयत्न यापूर्वीच झाला होता. मात्र, ठराविक एक व्यक्तीच नाटय़गृह चालवण्यासाठी स्वारस्य दाखवते. एकच निविदा आल्याने तेव्हा निर्णय झाला नव्हता. आता दुसऱ्यांदा 'बीओटी' च्या निविदा काढण्यात येणार आहेत. मात्र, परिस्थितीत फरक नाही. भोसरीतील एकूण वातावरण पाहता बाहेरील कोणी नाटय़गृह चालवण्याचे धारिष्टय़ दाखवत नाही. तर, स्थानिक पातळीवरील कोणी उत्सुक नाही. त्यामुळे याबाबतचा तिढा सुटत नाही. नाटय़गृह चालेल की नाही, अशी शंका असतानाही भोसरीत नाटय़गृहाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हळूहळू ही परिस्थिती सुधारत जाणार आहे. मात्र, नियोजनाचा अभाव असल्याने कोटय़वधी रुपये खर्चून बांधलेली वास्तू दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

चिंचवडमध्ये सव्वा लाखांची घरफोडी
चिंचवडमध्ये सव्वा लाखांची घरफोडी:
चिंचवड येथे बंद सदनिकेचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरटय़ाने घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग कृष्णजी लवेळकर (रा. देवकर पॅराडाईज, गांधी पेठ, चिंचवड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवेळकर हे मंगळवारी सदनिका बंद करून बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी सकाळी परत आल्यावर त्यांना आपल्या सदनिकेचा दरवाजा तोडलेला दिसला. कपाटात ठेवलेले ६८ हजाराचे सोन्याचे दागिने व रोख ५० हजार असा एकूण एक लाख १८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे दिसून आले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुदान थेट बँकेत
अनुदान थेट बँकेत: पुणे। दि. २४ (विशेष प्रतिनिधी)
विविध सरकारी योजनांनुसार दिल्या जाणार्या अनुदानाची रक्कम ‘आधार कार्डा’शी निगडित संगणकीय व्यवस्थेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरुवात देशातील निवडक ५१ जिल्ह्यांमध्ये १ जानेवारीपासून केली जाईल. यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश असेल. केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज येथे ही माहिती दिली.
एका कार्यक्रमात बोलताना चिदम्बरम म्हणाले की, अशा प्रकारे ‘आधार’च्या माध्यमातून लाभार्थ्यांना रोखीने अनुदान देण्याची योजना डिसेंबर २0१३च्या अखेरपर्यंत संपूर्ण देशात राबविली जाईल.
ही योजना राबविण्यासाठी ८0 टक्क्यांहून जास्त लोकांना आधार कार्ड देण्याचे काम पूर्ण झालेल्या १५ राज्यांमधील ५१ जिल्हे सुरुवातीस निवडले गेले आहेत. आधार कार्डे जारी करण्याचे काम इतर ठिकाणी एकीकडे अधिकाधिक भागांमध्ये पूर्ण करत आणायचे व त्यानुसार अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याच्या योजनेचीही व्याप्ती दुसरीकडे वाढवीत न्यायची, असा सरकारचा इरादा आहे. त्याचबरोबर देशातील सर्व बँकांमध्ये ‘कोअर बँकिंग सोल्युशन्स’ ही संगणकीय प्रणालीही सुरू झालेली असेल. २0१४ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाणार्या ‘यूपीए’ सरकारच्या दृष्टीने राजकीय लाभ घेण्यासाठी थेट बँकेत अनुदान जमा करण्याची योजना राष्ट्रीय रोजगार हमी योजनेहून अधिक महत्त्वाची आहे. ही योजना यशस्वी झाली तर दरवर्षी सरकारी तिजोरीतून चार लाख रुपयांहून अधिक रक्कम थेट लाभार्थ्यांना मिळेल. हे लक्षात घेऊनच पंतप्रधान या योजनेच्या प्रगतीवर जातीन लक्ष ठेवून आहेत.

बाळासाहेबांनी काढलेली अखेरची व्यंगचित्रे

पिंपरी, 23 नोव्हेंबर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अखेरच्या काळात पिंपरी-चिंचवडमधील होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ.शैलेश देशपांडे व सर्च या संस्थेचे डॉक्टर उपचार करत होते. याच काळात डॉ. देशपांडे यांनी बाळासाहेबांच्या हाताचे थरथरणे किती कमी होत आहे हे पाहाण्यासाठी त्यांना काही व्यंगचित्रे काढण्यास सांगितली होती. ही व्यंगचित्रे डॉ.शैलेश देशपांडे यांच्याकडेच आहेत. ही बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली बहुदा अखेरीच व्यंगचित्रे आहेत. त्यांचे व्हिडीओ चित्रिकरण देखील डॉ. देशपांडे यांच्याकडेच आहे. त्यावरुन बाळासाहेबांवर डॉ. देशपांडे करीत असलेल्या उपचारांची आणि त्या काळात बाळासाहेबांच्या प्रकृतीमध्ये होत असलेल्या सुधारणांची कल्पना येते.

'ले-आउट' शिवायही मिळणार परवाना
'ले-आउट' शिवायही मिळणार परवाना ले-आउट' शिवाय बांधकाम परवाना नाही' या शीर्षकाखाली बुधवारी (ता. 21) "सकाळ'च्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताबाबत मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, नगरसेवक राहुल जाधव व मनसेचे पदाधिकारी नीलेश मुटके यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची भेट घेतली असता त्यांनी "ले-आउट'शिवाय बांधकाम परवानगी देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
Pimpri-Chinchwad roads unsafe to walk on: NGO
Pimpri-Chinchwad roads unsafe to walk on: NGO: Citizens are facing traffic problems due to lack of pedestrian safety measures and poor implementation of traffic regulations. This despite widening of roads, pointed out Paryavaran Sanvardhan Samiti, a group dealing with environmental issues in Pimpri-Chinchwad.
Vikas Patil, president, Paryavaran Sanvardhan Samiti said that at all busy junctions, autorickshaws are seen parked in a haphazard manner resulting in traffic congestion. "The civic body has widened many important roads in the city including Pune-Mumbai highway stretch, Telco road, and Aundh-Ravet highway and has spent crores on it. However, haphazard parking of vehicles and autorickshaws at busy junctions is obstructing the smooth flow of traffic," he said.

शहरात आत्महत्यांचे सत्र सुरूच
शहरात आत्महत्यांचे सत्र सुरूच: पिंपरी चिंचवड शहरांमध्ये एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्या आहेत. तर, एका महिलेने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचे सत्र अजूनही सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे.
बेकायदा इमारतींवर 'दणका' सुरु
(title unknown):
atikraman
बेकायदा इमारतींवर 'दणका' सुरु आयुक्त येताच कारवाईला वेग पिंपरी, 22 नोव्हेंबर महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी अमेरीका दौ-यावरुन परतताच पिंपरी-चिंचवड शहराती...

शहरात एकाच दिवशी दोघांच्या आत्महत्या, तर एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी, 22 नोव्हेंबर
पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन जणांनी आत्महत्या केली, तर एका ठिकाणी एक महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. थेरगाव येथे पवना नदी पुलाच्या कठड्याला दारूच्या नशेतील एका 56 वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज (गुरूवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. त्याचबरोबर एका 25 वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरात कपड्याच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना आज सकाळी चिखलीत उघडकीस आली. तर, भोसरी येथे काल (बुधवारी) रात्री एका विवाहित महिलेने पतीसोबत झालेल्या भांडणातून अंगावर रॉकेल ओतून पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये ही महिला शंभर टक्के भाजली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'हॉटेल वेस्ट'पासून महापालिका 'पीपीपी'वर बायोगॅस निर्मिती करणार

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या हॉटेलिंग बरोबरच 'वेस्ट फूड'चे प्रमाण वाढत आहे. गेल्या पाच वर्षात हॉटेल आणि कॅन्टीनमधील कच-यात दुपटीने वाढ झाली आहे. या कच-याच्या विघटनासाठी सध्या महापालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिकेने 'पीपीपी' तत्वावर बायोगॅस निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची निविदा महापालिकेने प्रसिध्द केली असून मोशी कचरा डेपो याठिकाणी तीन एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहणार आहे.

Subscribe to:
Posts (Atom)