Sunday, 15 September 2013

PMC, PCMC finally get promised CCTVs


PMC, PCMC finally get promised CCTVs
Pune Mirror
After a massive delay of over a year, the State government on Friday finally cleared the Closed Circuit Television Camera (CCTV) network project for the Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri ChinchwadMunicipal Corporation (PCMC) areas.

सुरज सुर्यवंशी ठरला पिंपरी चिंचवड फेस्टिवलचा मानकरी

पिंपरी चिंचवड फेस्टिवलमध्ये घेण्यात आलेल्या श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत सुरज सुर्यवंशी हा पिंपरी चिंचवड फेस्टिवलचा मानकरी ठरला. भालचंद्र कोळी बेस्ट पोजर तर मयुरेश मोरे हा बेस्ट इम्प्रुवड ठरला.

शहरात प्रथमच अत्याधुनिक 'फ्लाय कार केअर' शोरूम

पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच चिंचवडमध्ये अत्याधुनिक 'फ्लाय कार केअर' या कार वॉशिंग व पॉलिशींग शोरुम सुरु करण्यात आले आहे. नुकतेच या शोरुमचे उद्‌घाटन सिने अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या हस्ते करण्यात आले.

'मिशन 5@5'मध्ये उतरले मंगेश तेंडूलकर !

पीएमपीएमएलच्या बस प्रवास भाडे आकारणी संदर्भात विविध 16 संघटनांनी पुणे महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. मिशन पीएमपीएमएल 5@5 ला प्रसिध्द व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांच्या हस्ते पत्रके वाटून सुरुवात झाली.

'जेएनएनयुआरएम'साठी 'क्रिसील'ला संधी


दरमहा मोजावे लागणार 8 लाख 80 हजार पिंपरी-चिंचवड महापालिकेने केंद्र सरकारच्या 'जेएनएनयुआरएम' योजनेअंतर्गत हाती घेतलेल्या प्रकल्पांचा आराखडा तयार करणे, देखरेख ठेवणे तसेच अंमलबजावणीबाबत प्रशासनाला धोरणात्मक सल्ला देणा-या क्रिसिल या खासगी सल्लागार संस्थेला दुस-यांदा एका वर्षासाठी

आकुर्डी रोटरीतर्फे 4 हजार विद्यार्थिनींची रक्ताक्षय तपासणी

रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या वतीने पिंपरी-चिंचवड मधील चार विद्यालयांमध्ये राबविण्यात आलेल्या रक्ताक्षय (हिमोग्लोबीन) तपासणी शिबिरामध्ये सुमारे चार हजार विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. दीड हजार मुलींना लोहयुक्त गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

पिंपरीत शंख महल अन् सुपारीच्या गणपतीचे आकर्षण

पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक मंडळांनी यंदाही वैशिष्ट्यपूर्ण देखाव्यांची परंपरा जपली आहे. पिंपरीतील शंख महल आणि सुपारीचा गणपती आकर्षण ठरले आहे.

फाशीच्या निर्णयाचे स्वागत

दिल्ली सामूहिक बलात्कार खटल्यातील चारही आरोपींना फाशीची शिक्षेच्या न्यायालयाच्या निकालाचे नागरी हक्क सुरक्षा समितीच्याने स्वागत केले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी एक सामाजिक व गंभीर समस्या म्हणून उपाययोजना करण्याची मागणी समितीने केली आहे.

महापालिकेतर्फे अभियंता दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी-चिंचवड महापालिका व ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशन यांच्या वतीने भारतरत्न सर विश्वेश्वरैया यांच्या जयंती निमित्त व राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त सोमवारी (दि. 16) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महापौर मोहिनी लांडे यांनी दिली.

महामंडळाकडून प्रतिसाद अल्पच

पिंपरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने फेसबुकवर सुरू केलेल्या लिंकवर सूचनांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. एसटी कर्मचार्‍यांकडून मिळणार्‍या चांगल्या-वाईट अनुभवांबरोबरच एसटीने सेवेत सुधारणा करावी, अशा अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. एसटीची प्रतिमा सुधारण्यासंदर्भात अनेक सूचना करण्यात आल्या असून, त्याचा निपटारा झाला, तर एसटीचा चांगला ‘फेस’ समाजासमोर येईल, असा विश्‍वासही व्यक्त केला आहे. 

औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी पवार, चव्हाण यांचे एकमत

पिंपरी - महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांवर टीकाटिप्पणी करणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पिंपरी प्राधिकरणात औद्योगिक प्रदर्शन केंद्र व्हावे याबाबत मात्र एकमत झाले आहे.

किलोमीटरनुसार भाडे आकारण्यासाठी मोहीम

पुणे - किलोमीटरनुसार भाडेआकारणी करावी व पाच रुपयांत पाच किलोमीटरचा प्रवास मिळावा, या मागणीसाठी पीएमपी प्रवासी मंच व सजग नागरिक मंचसह 26 स्वयंसेवी संस्थांनी शनिवारी महापालिका व डेक्कन जिमखाना बस स्थानकांवर प्रवासी जागरूकता मोहीम राबविली.

Task force cuts down thefts to zero

The industrial task force started in Pimpri-Chinchwad has proved its effectiveness as both industrialists and the police claimed there have been zero incidents of thefts at night in the belt.The force, which carries out night patrolling, was started by industrialists with their own contributions. While the patrolling is going on in two major industrial sectors of Bhosari MIDC, industrialists from other sectors are showing interest in the move.