In massive relief to more than 15,000 inhabitants of reside
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 4 December 2018
इंद्रायणी स्वच्छतेचा वसा घ्या - महेश लांडगे
भोसरी - जीवनदायी ठरणाऱ्या इंद्रायणी नदीचे पाणी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. नदीचे पाणी प्रदूषित होणारच नाही, याची खबरदारी सर्वप्रथम नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे इंद्रायणी नदी स्वच्छतेचा वसा नागरिकांनी घेतला पाहिजे,’’ असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी भोसरीत केले.
चादरवाटप लालफितीत
पिंपरी - शहरातील झोपडपट्टीतील महिलांना महापालिकेतर्फे प्रत्येकी दोन चादर, दोन बॅरेक कंबल, दोन दरी पंजा, दोन बेडशीट असा संच मोफत देण्यात येणार होता. या प्रस्तावाला अडीच महिन्यापूर्वी स्थायी समितीची मंजुरी मिळूनही प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे हा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे.
गोवर, रुबेलाची लस सुरक्षित
पुणे - राज्यातील ४९ लाख विद्यार्थ्यांना पहिल्या चार दिवसांमध्ये गोवर आणि रुबेलाची लस देण्यात आली. यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याला लसीमुळे त्रास झाला नाही. त्यामुळे ही लस सुरक्षित असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.
‘रोझलॅंड’चे मॉडेल ‘आयआयटी’ राबविणार
पिंपरी - घनकचरा व्यवस्थापनात स्वयंपूर्ण असणाऱ्या पिंपळे सौदागरमधील रोझलॅंड सोसायटीने तयार केलेले मॉडेल आता पवईच्या आयआयटीने राबविण्याचे ठरवले आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेण्यासाठी आयआयटीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सामाजिक संस्था, सरकारी अधिकारी, निवडक सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
अपंगत्वावर मात करीत 'त्याने'' केली क्रिडा क्षेत्रात संघर्षमय कामगिरी
जुनी सांगवी : ''नव्वद टक्के अपंगत्व असतानाही त्यावर मात करीत दापोडीतील २१ वर्षीय तरुणाने अॅथलेटिक, पॉवरलिफ्टिंग आणि क्रिकेट या खेळांमध्ये संघर्षमय कामगिरी करत चमक दाखविली आहे. दापोडीत राहणाऱ्या साहिल सय्यदने या तिन्ही क्रीडाप्रकारात साहिलने गोल्ड, सिल्वर मेडल, 'मॅन ऑफ द मॅच' असा बहुमान मिळवला आहे. सध्या तो महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळत आहे. केवळ जिद्द आणि दुर्दम्य इच्छा शक्तिच्या जोरावर साहिलचा संघर्षमय प्रवास सुरू आहे.
स्थलांतरित मुलांच्या दारी फिरती शाळा (व्हिडिओ)
पिंपरी - उद्योगनगरीत रोजगाराच्या शोधात आलेल्या स्थलांतरित कामगारांच्या मुलांची शिक्षणाची आबाळ होऊ नये, यासाठी डोअर स्टेप स्कूल संस्थेने शहरात फिरत्या शाळा सुरू केल्या आहेत. झोपडपट्टी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन अशी मुले शोधून त्यांना शिकविण्याचे काम सुरू आहे.
“ज्ञानोबा-माऊली’, “पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषाने अलंकापुरी दुमदुमली
आळंदी – “अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपूत्र’ या भावनेने माउलींचे आशीर्वाद घेण्यासाठी वैष्णवांची मांदियाळी सोमवारी आळंदीत अवतरली. निमित्त होते कार्तिकी एकादशीचे. सहभागी भाविकांनी ज्ञान, प्रेम अन् भक्तीचा अनुपम्य सोहळा डोळ्यात साठवत माऊलींवरील निस्सीम श्रद्धेचा जणू प्रत्ययच दिला. “ज्ञानोबा-माऊली…’ असा जयघोष, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’चा नामगजर, टाळ, मृदंग, वीणेचा त्रिनाद आणि हरिनामाचा जयघोष करीत लाखो भाविकांनी कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले.
“बीआरटी’ ई-बस शहरात दाखल
पुणे – शहरात पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी येऊ घातलेल्या एका इलेक्ट्रिक बसेसची ट्रायल नुकतीच पार पडली. 9 मीटर लांबीची ही बस होती. यानंतर आता बीआरटी मार्गावरून धावणारी 12 मीटर लांबीची ई-बस देखील दाखल झाली असून आजपासूनच (दि.4) या बसची ट्रायल होणार आहे, अशी माहिती पीएमपीतील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
महापालिका खर्चातून महापौरांना महागडा “टॅब’
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून अनेक वारेमाप खर्चांना फाटा देऊन काटकसर व बचतीचे धोरण राबविले जात असतानाच, महापौर राहुल जाधव यांनी स्वत:च्या वापरासाठी चक्क पालिकेच्या खर्चातून “टॅब’ विकत घेतला आहे. तब्बल 74 हजार रूपयांचा हा महागडा टॅब आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे काटकसर व बचतीचे धोरण निव्वळ दिखाव्यापुरते असल्याची टीका होऊ लागली आहे.
“59 मिनिटात एक कोटी’ फसवेगिरी?
पिंपरी – अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 59 मिनिटात एक कोटीपर्यंतचे कर्ज ही सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी योजना आणली आहे. या योजनेबाबत उद्योजकांमध्ये प्रचंड उत्साह होता. परंतु 59 मिनिटांमध्ये कर्ज मंजूरी होत असून “इन प्रिंसिपल ऍप्रूव्हल’ होत आहे. नियमित कर्जासाठी जी प्रक्रिया करावी लागते, तीच प्रक्रिया आणि तेवढाच वेळ या योजनेतंर्गतही लागत असल्याने ही योजना एक प्रकारची फसवेगिरी असून एका खासगी कंपनीचे भले करण्यासाठी ही योजना राबवली असल्याचा गंभीर आरोप पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस ऍण्ड ऍग्रीकल्चर या औद्योगिक संघटनेकडून करण्यात आला आहे.
जलपर्णीमुक्तीसाठी 68 लाखांचा खर्च
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदीमध्ये जलपर्णी वाढत चालली आहे. ती हटवनू नदी पात्र स्वच्छ करण्यासाठी पालिका 68 लाख रूपये खर्च करणार आहे. नदी स्वच्छतेचे हे काम पावसाळा वगळून हिवाळा व उन्हाळा या 8 महिन्यांच्या कालावधीत केला जाणार आहे.
कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन !
पिंपळे-सौदागर – येथील कुणाल आयकॉन सोसायटीतील प्रकल्पात ओला व सुका कचऱ्यापासून मशिनरीद्वारे खत निर्मिती करण्यात येते. चार ते पाच हजार सोसायटीची लोकसंख्या आहे. या उपक्रमाचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
आधी मोबदला द्या; मग भू-संपादन करा !
सांगवी – पिंपळे-गुरव येथील तुळजा भवानी मंदिर ते सृष्टी चौक रस्त्याचे रुंदीकरण आणि कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. दि. 1 डिसेंबरला पिंपरी-िंचंचवड महापालिकेने येथील बाधितांना नोटीस देऊन 24 तासांत बांधकाम काढून टाकावे, असा आदेश दिला. परंतु सरकारी नियमानुसार बाधितांना मोबादला द्यावा आणि मगच भू-संपादन करावे, अशी मागणी पिंपळे-गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदीयाल यांनी केली आहे.
कल्याणकारी योजनांसाठी स्वतंत्र उपायुक्त
पिंपरी – शहरातील अपंग व्यक्तींच्या विकासासाठी महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागांतर्गत राबविल्या जाणा-या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णय 14 नोव्हेंबर 2017 नुसार महापालिकेने स्वतंत्र उपायुक्त नेमावा. अपंगांच्या सर्व मागण्या तत्काळ पूर्ण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी प्रशासनाला केल्या.
जानेवारीत होणार “रनेथॉन ऑफ होप मॅरेथॉन’
पिंपरी – रोटरी क्लब ऑफ निगडी पुणे तर्फे 13 जानेवारी (रविवारी) निगडी प्राधिकरण येथे नवव्या रनेथॉन ऑफ होप 2019 या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरवासियांच्या जीवाशी खेळतेय “पीएमपी’
पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) प्रशासनाचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बसच्या चाकाच्या आठ ऐवजी चार बोल्टवरच पीएमपीचे व्हील सुसाट धावत असल्याचा धक्कादायक प्रकार एका प्रवाशाने उघडकीस आणला आहे.
अनधिकृत नळजोडांवर धडक कारवाई
पिंपरी – शहरात सोळा हजारांहून अधिक अनधिकृत नळजोड असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास महापालिकेने सुरवात केली आहे. पाणीपुरवठा विभागाने गेल्या दोन दिवसांत 64 अनधिकृत नळजोड तोडले. ही मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
255 कोटींची निविदा वादाच्या भोवऱ्यात
पिंपरी – केंद्र सरकारने “स्मार्ट सिटी’ योजनेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश करण्यात आल्यानंतर पहिलीच निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी या निविदेत “रिंग’ झाल्याचा आरोप करत, ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी महापालिका आयुक्त तथा “स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांना दिले आहे. तर ही निविदा संशयास्पद असून, त्याबाबत माहिती देण्याची मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी देखील केली आहे
वायसीएममध्ये रुग्णांना भोजन देणाऱ्या संस्थेला संगणक भेट
चौफेर न्यूज – पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रूग्णालयातील गरीब व गरजू रूग्णांना मोफत जेवण पुरविण्याऱ्या ‘रियल लाईफ रियल पिपल्स’ या संस्थेला आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी एक संगणक प्रदान केला.
आकुर्डी डी.वाय.पाटील संकुलात १५ डिसेंबरला ‘विंटर कार्निव्हल’चे आयोजन
चौफेर न्यूज – आकुर्डी येथील डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘विंटर कार्निव्हल २०१८’ चे १५ आणि १६ डिसेंबररोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासासाठी विविध खेळ, सांगितिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवेशपत्रिका देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे विभागातील उच्च माध्यमिक शाळा, व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या कार्निव्हलमध्ये भाग घेऊन आपल्या विविध गुणांना वाव देण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
रिव्हर सायक्लोथॉनमध्ये ७ हजारांहून अधिक पर्यावरण प्रेमींचा सहभाग
चौफेर न्यूज – इंद्रायणी स्वच्छता अभियान रिव्हर सायक्लोथॉन पुरतेच मर्यादित न राहता ‘एक पाऊल भावी पिढीसाठी-इंद्रायणीच्या रक्षणासाठी’ पुढे कायमस्वरुपी सुरु ठेवण्याचे नियोजन आहे. यामध्ये विविध, संस्था, संघटनांना सहभागी करुन घेण्यात येईल. या अभियानाच्या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धन करणे, पाणी आडवा-पाणी जिरवा, पशू, पक्षी यांचे संवर्धन करणे, पक्षालय सुरु करणे, उत्सव काळात निर्माल्य व मुर्ती नदीत टाकू नये यासाठी समाज प्रबोधन करणे, आठवड्यातून एक दिवस कोणतेही वाहन न वापरता फक्त सायकलने प्रवास करणे, आठवड्यातून एक दिवस इंद्रायणी नदी परिसरात श्रमदान करणे असे विविध पर्यावरण पुरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत यामध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले.
Subscribe to:
Posts (Atom)