Saturday, 29 September 2018

बेशिस्त 24000 वाहनचालकांवर कारवाई

पिंपरी - पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या महिनाभरात पोलिसांनी तब्बल 24 हजार 103 जणांवर कारवाईस सुरवात केली आहे. यामुळे आगामी काळात वाहतुकीला शिस्त लागल्याशिवाय राहणार नाही. 

Pimpri Camp traders eye biz boost after heavy vehicle ban

PIMPRI CHINCHWAD: Traders from Pimpri Camp expect to do bett ..

Super-specialties to come up in twin cities

PCMC’s five hospitals will get upgraded; authorities also identifying land to build a separate multi-specialty hospital; now the proposal awaits approval

सुदर्शननगर चौकात “ग्रेड सेपरेटर’

पिंपरी – पिंपळे गुरव येथील सुदर्शननगर चौकात महापालिकेच्या वतीने 335 मीटर लांबीचा ग्रेड सेपरेटर उभारला जाणार आहे. यासाठी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत 27.86 कोटीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. हा ग्रेड सेपरेटर नाशिकफाटा – वाकड बीआरटीएस रोडला जोडला जाणार आहे.

‘सर्वसाधारण सभेत सत्ताधारी विषय घुसडतात’

पिंपरी : महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी सभा कामकाजात आयत्यावेळी चुकीच्या पद्धतीने विषय घुसडले. नगरसेवकांना देखील त्याची माहिती दिली जात नसल्याचा आरोप करत आयत्यावेळी विषय घेण्यास नगरसेविका मंगला कदम यांनी तीव्र आक्षेप घेतला. तसेच तहकूब सभेत कोणत्या नियमाच्या आधारे विषय दाखल करुन घेतले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

स्मार्ट सिटीसाठी मालमत्ता देण्याचे अधिकार आयुक्तांना

पाच वर्षात केंद्र सरकारचे 500 कोटींचे अनुदान मिळणार 
महासभेची मान्यता घेणे बंधनकारक
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटीतील कामे करण्यासाठी महापालिकेच्या मालकीची जागा, रस्ते, उद्याने, विद्युत पोल, चौक, शाळा, इमारतीसह इतर मालमत्तांचा वापर करण्यास देण्याचे सर्वाधिकार पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीऐवजी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात आले आहेत. तसेच त्याला महासभेची मान्यता घेणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी अभियानाचा कालावधी पाच वर्षाचा असून या योजनेत पाच वर्षात केंद्र सरकारचे 500 कोटींचे अनुदान मिळणार आहे. महापालिका आयुक्त हर्डीकर यांना जरी मालमत्तेबाबतचे अधिकार देण्यात आले असले तरी, कोणत्याही निर्णय घेण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महासभेची आयुक्तांनी मान्यता घेणे आवश्यक असल्याचे महासभेने नुकतेच जाहीर केले आहे.

पोलीस हप्ते घेण्यात दंग; नगरसेवकांचा हल्लाबोल

शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे : मुली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
सर्वसाधारण सभेत निषेध; पोलीस आयुक्तांना महापालिकेत पाचारण करण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड : शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. मुली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, तरुणी सर्वच असुरक्षित आहेत. सोनसाखळी हिसकावणे, मोबाईल चोरी, भुरट्या चोर्‍यांचा कहर झाला आहे. पोलीस ठणे, चौक्या हप्ते वसुलीचे ठिकाणे झाली आहेत. पोलिसांचा उतमात वाढला असून तक्रारकर्ते, पीडितांनाही दाद देत नाही त्यांच्यावरच कायद्याचा दंडुका उगारला जातो, अशा संतप्त शब्दात सत्ताधारी भाजपसह सर्वपक्षीय नगरसेकानी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गुरुवारी टीकेची झोड उठवली.

पिंपरीतील शगुन चौकातील अतिक्रमणांवर कारवाई

पिंपरीच्या शगुन चौकातील अतिक्रमणांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शुक्रवारी कारवाई करण्यात आली.

Pimpri Chinchwad police launch public awareness campaign for traffic violations

The Pimpri Chinchwad police commissionerate has taken a deci ..

‘Set up committee to watch PCMC hospitals’

Activists write to civic body chief, citing deteriorating patient care

PCMC catches 176 employees loitering

During surprise checks conducted over two days, the civic bod ..

रेंजहिल्समध्ये मेट्रोचे काम आठवड्यात

पिंपरी, ता. 28 - शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने पुढे जात असले तरी हॅरिस पुलानंतरचे काम सुरू झालेले नव्हते. संरक्षण विभागाने काम सुरू करण्यासाठी महामेट्रोला परवानगी दिल्याने हा महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. रेंजहिल्समध्ये येत्या आठवड्याभरात मेट्रोचे काम सुरू होईल. 

“बंद’ला प्रतिसाद “थंड’

पिंपरी – रिटेल क्षेत्रामध्ये सरकारने शंभर टक्‍के थेट परकीय गुंतवणुकीला दिलेल्या मंजुरीच्या विरोधात “कॅट’ या व्यापारिक संघटनेने देशव्यापी “भारत व्यापार बंद’चे आवाहन केले होते. शहरातील बहुतेक सर्वच व्यापारी आणि व्यावसायिक संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आणि समर्थन देण्याची घोषणा केली होती. परंतु शहरामध्ये तसेच उपनगरांमध्ये या “बंद’ला अतिशय थंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. शहरातील सुमारे 4500 दुकानांपैकी 20 टक्‍के दुकाने देखील बंद नव्हती. सामान्य नागरीक तर दूरच परंतु कित्येक व्यापाऱ्यांनी देखील या “बंद’ बद्दल कल्पना नसल्याचे दिसून आले.

आता जयंती उत्सवांसाठी ट्रस्ट

पिंपरी – उच्च न्यायालयाने करदात्यांच्या पैशातून धार्मिक सण व उत्सव साजरे करण्यास महापालिका व स्थानिक संस्थांना बंदी केली आहे. यामुळे महापालिकेसमोर पेचप्रसंग उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीत उत्सव व जयंती साजरी करण्याबाबतचे धोरण महापालिका प्रशासनाकडे नसल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. 28) आयोजित बैठकीत नाराजी व्यक्त केली. जयंती उत्सव साजरे करण्यासाठी महापालिका ट्रस्ट स्थापन करणार असून गटनेत्यांच्या बैठकीत त्यावर लवकरच शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

पिंपरी महापालिकेचा पशुवैद्यकीय विभाग ‘गाढ झोपेत’

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सध्या आरोग्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. भटकी कुत्री, डुक्करांच्या समस्यांनी नगरसेवकांची झोप उडवली आहे. मात्र या प्रश्नाचं महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला काहीच देणंघेणं नसल्याचं समोर आलं आहे. शहरात भटकी कुत्री आणि डुक्करांचा प्रश्न ‘आ’वासून उभा असताना पिंपरीत असलेल्या पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी भर दुपारी ऑनड्युटी कार्यालयात खुर्चीवर बसून ‘गाढ झोपेत’ असल्याचे दिसून आले आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट टीव्ही प्रेक्षपणाची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभा सतत वादळी ठरत आहेत. या सभेचे शहरातील टीव्ही वृत्तवाहिनीवरून नागरिकांसाठी थेट प्रक्षेपणाची सोय करावी, अशी मागणी  थेरगावातील सामाजिक कार्यकर्ते संजय गायके यांनी महापौर राहूल जाधव यांच्यासह सर्व गटनेत्यांकडे केली आहे.

स्वच्छ सुंदर शहरासाठी दोन ऑक्टोबरपर्यंत शहरात स्वच्छता मोहिम

स्वच्छ सुंदर शहरासाठी’,पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. या पंधरवड्याची सुरूवात नुकतीच करण्यात आली. या कालावधीत श्रमदान, सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छतेची शपथ, प्रभात फेरी यांचे आयोजन करण्यात येत आहे.

शर्मिला बाबर यांची विद्यापीठ अधिसभेवर नियुक्ती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर 2018-19 साठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेविका व शिक्षण समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पेन आंतरराष्ट्रीय काँग्रेसचे भारतातील पहिले संमेलन आकुर्डीत रंगले

निर्भीडसत्ता न्यूज –
जगभरातील कवी, कथा-कादंबरीकार व अन्य लेखकांची संघटना असलेल्या ‘पेन आंतरराष्ट्रीय काँग्रेस’ या संस्थेचे संमेलन पेन साऊथ इंडिया सेंटरच्या वतीने ८४ व्या आंतरराष्ट्रीय पेन काँग्रेसचे आयोजन पहिल्यांदाच पुण्यात झाले. दि. २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या चार दिवसाच्या परिषदेमध्ये पुणे विद्यापीठातील काही निवडक महाविद्यालयांची निवड करण्यात आली. त्यात आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाची निवड करण्यात आली.

भोसरीत 2 ऑक्टोबरला गदिमा कविता महोत्सव

भोसरी : महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्यातर्फे गीतरामायणकार ग.दि. माडगुळकर जन्मशताब्दीनिमित्त मंगळवारी (2 ऑक्टोबर) सकाळी अकरा वाजता राज्यस्तरीय 25 वा गदिमा कविता महोत्सव भोसरीत आयोजित केला आहे, अशी माहिती संयोजक पुरुषोत्तम सदाफुले व मुरलीधर साठे यांनी दिली. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात होणार्‍या महोत्सवाचे उदघाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस असतील.

शहरातील विद्यार्थी करणार नागरिकांचे प्रबोधन

निबंध, चित्रकला स्पर्धांचे इसिएकडून आयोजन
पिंपरी : इन्हॉयरमेंट कन्झर्वेशन असोसिशनच्यावतीने पिंपरी-चिंचवड मनपा शाळांच्या सोबत स्वच्छ भारत जनजागरण फेरी, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी 635 शाळांमधून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छ भारत जनजागरणबाबत लाखो विद्यार्थी शिस्तबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचे नियोजन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छ भारत विभाग प्रमुख आणि अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 28 सप्टेंबरपासून शाळांमध्ये रोज स्वच्छता शपथ घेण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबर पर्यंत मुलांना रोजच्या परिपाठात ही शपथ घेतली जाणार आहे. निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे इसिए अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले.

स्केटिंग ग्राऊंडचे काम वेगात करण्याच्या सूचना

भोसरी : महापालिकेतर्फे विकसित करण्यात येणार्‍या भोसरी, इंद्रायणीनगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग ग्राऊंडचे काम वेगात करा. खेळाडूंना सर्व सोयीसुविधायुक्त असे शहरातील पहिलेच ग्राऊंड करण्यात येणार आहे. ग्राऊंडचे काम दर्जेदार करावे.  खेळाडूंना ट्रॅक उपलब्ध करुन देण्यात यावा. पहिल्या टप्प्याचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्यात यावे असे निर्देश भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अधिका-यांना दिले आहेत. वर्षभरापासून त्याचे काम सुरु आहे. आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी (दि.26)पालिकेच्या अधिका-यांसमवेत कामाची पाहणी केली. त्यावेळी आमदार लांडगे यांनी अधिकार्‍यांना काम दर्जेदार करण्याबरोबरच विविध सूचना दिल्या आहेत. यावेळी नगरसेविका नम्रता लोंढे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता विजय वाईकर, कनिष्ठ अभियंता राहुल जन्नू, निलेश केदार, वास्तूविशारद पंकज कांबळे, राहुल राणे, योगेश कुमावत, ठेकेदार आनंद निकुंभ, मंदार कुलकर्णी उपस्थित होते.

चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा झाला विस्कळीत

नगरसेविका चिंचवडे यांनी केला निषेध 
पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरुन देखील शहरवासियांना मुबलक पाणीपुरवठा होत नाही. चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. सणासुदीच्या काळात देखील पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने संताप व्यक्त करत शिवसेनेच्या नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांनी महासभेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांचा निषेध केला. त्यामुळे परिसरात समान व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला द्याव्यात, अन्यथा महिला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही नगरसेविका चिंचवडे यांनी दिला.

पुणे- लोणावळा लोकलच्या चार फेऱ्या रद्द

पुणे  - पुणे ते लोणावळा दरम्यानच्या लोहमार्ग देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सोमवार (ता. 1) ते 17 ऑक्‍टोबरपर्यंत दररोज तीन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या काळात पुण्याहून लोणावळ्याला जाण्यासाठी दुपारी सव्वाबारा आणि एक वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. तसेच लोणावळ्याहून पुण्याला येण्यासाठी दुपारी दोन आणि तीन वाजून चाळीस मिनिटांनी सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. 

“थिसेनक्रुप’च्या कामगारांना 15 हजारांची वेतनवाढ

पिंपरी – येथील थिसेनक्रुप इंडस्ट्रिज इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये कामगारांना ऐतिहासिक मुदतपूर्व वेतनवाढ करार पार पडला. या करारानुसार कामगारांना सरासरी 15 हजार 250 रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे.

शहरातील नऊ जणांना व दोन शाळांना कृतीशील जिल्हास्तरीय पुरस्कार

निगडी – महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने देण्यात येणारे जिल्हास्तरीय कृतीशील मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातील नऊ जणांना व दोन शाळांचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे. कृतीशील मुख्याध्यापक म्हणून चिंचवड येथील फत्तेचंद जैन माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक हिंदूराव नानासाहेब कलंत्रे, वाल्हेकरवाडी येथील प्रेरणा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जयसिंग शितोळ यांची निवड करण्यात आली आहे. कृतीशील शिक्षक पुरस्कार धनराज संभाजी गुटाळ, गणेश अण्णा झोडगे, वंदना अलोक मिश्रा, माया माणिक पाटोळे, सौदागर कृष्णा केमदाराने यांना दिला जाणार आहे. तसेच कृतीशील शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार बिपीनचंद्र दादासाहेब माने, संदिप कारभारी गर्कळ यांना जाहीर करण्यात आला आहे. शहरातील कृतीशील शाऴा म्हणून ज्ञानदीप माध्यमिक व सौ अनुसया वाढोकार उच्च माध्यमिक विद्यालय रुपीनगर-तळवडे व शिवभूमी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यमुनानगर निगडी यांनी जाहिर झाला आहे.

शालेय पोषण आहारात लवकरच दूध

पुणे – दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश करण्याच्या अंमलबजावणीला लवकरच सुरुवात होणार आहे. याबाबतची प्रक्रिया अंतीम टप्यात असल्याचे राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.