Citizens can now expect timely redressal of their grievances from Pimpri Chinchwad Municipal Corporation as municipal commissioner Shravan Hardikar has warned officials of disciplinary action if they fail to resolve issues within the stipulated time.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 1 June 2017
PCMC approves 2 grade separators in Jagtap Dairy area
If the two grade separators are constructed, then there will be in all six grade separators in Pimpri-Chinchwad. Three grade separators have already been constructed on the Pune-Mumbai Highway. Last week, the standing committee had sanctioned a grade ...
ग्रेड सेपरेटरना मंजुरी
नाशिक फाटा ते वाकड 'बीआरटीएस' रस्त्यावर जगताप डेअरी येथे दोन समांतर ग्रेड सेपरेटर (समतल विलगक) बांधण्यात येणार असून, त्यासाठीच्या २८ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास पिंपरी-चिंचवड पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मंजुरी ...
पिंपरीत मंडईसाठी बांधलेल्या इमारती धूळखात
पिंपरी, पिंपरी रेल्वे स्टेशन, मासूळकर कॉलनी, भोसरी, धावडे वस्ती, चिंचवड, चिंचवड स्टेशन, चिखली-कृष्णानगर, सांगवी, डांगे चौक, आकुर्डी, निगडी अशा जवळपास २४ ठिकाणी महापालिकेने भाजी मंडई बांधल्या आहेत. क्षेत्रीय कार्यालयानुसार अ-४, ब-८, ...
‘एसपीव्ही’त शिवसेना, मनसेला संधी?
पिंपरी - स्मार्ट सिटी अभियान शहरात राबविण्यासाठी विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या कंपनीत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तारूढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता हे संचालक असतील. त्याशिवाय शिवसेना आणि मनसेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाला संचालक म्हणून संधी मिळणार आहे. मनसेचे सचिन चिखले हे एकमेव नगरसेवक असल्याने त्यांचे नाव निश्चित आहे.
स्थायीत 8 कोटी खर्चाच्या विकास कामांना मान्यता
पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या स्थायी समितीने उद्यानाची देखभाल, पाणी पुरवठा नवीन वितरिका आणि बीन्स कंटेनर खरेदीकरिता सुमारे 8 कोटी खर्चाच्या विविध विकासकामांना स्थायी समितीने बैठकीत मान्यता दिली. स्थायी समिती सभागृहात आज (बुधवारी) झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या.
खासदार आढळरावांचे “आरटीआय’अस्त्र!
– प्रशासनावर आरोप : विकासकामांवर आवस्तव खर्च
– महापालिका आयुक्तांकडे माहिती मागवली
– महापालिका आयुक्तांकडे माहिती मागवली
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाला “कोंडी’त पकडण्यासाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शहरातील पाणी कपातीवरुन भाजपला लक्ष्य करतानाच आता सेना नेत्यांनी विकास प्रकल्पांवर अवास्तव खर्च सुरु आहे, असा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे विविध प्रकल्पांची इत्त्यंभूत माहिती मागवली असून, वेळेत माहिती न दिल्यास “सीबीआय’कडे तक्रार करणार आहे, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर कारवाई
पिंपरी, (प्रतिनिधी) – अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 मध्ये रावेत-वाल्हेकरवाडी येथील अनधिकृत बांधकामावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली.
या कारवाईमध्ये 1 आर.सी.सी., 1 विट बांधकाम, 7 पत्राशेड अशा एकुण 9 बांधकामांवर कारवाई करण्यात आली. 10 हजार 447 चौरस फूट ही बांधकामे होती. कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता केशवकुमार फुटाणे तसेच कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली. महापालिकेचे 7 पोलीस कर्मचारी, 10 मजूर व 10 महापालिका कर्मचारी तसेच 2 ट्रॅक्टर, 2 जे.सी.बी. च्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.
असंघटित कामगारांचा पिंपरीत शनिवारी मेळावा
पिंपरी, (प्रतिनिधी) – कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या असंघटित कामगारांचा मेळावा आयोजित केला आहे. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात शनिवारी (दि.3) हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात कष्टकऱ्यांना श्रम प्रतिष्ठा पुरस्कार, मोफत विमा व पेन्शन कार्डाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांनी दिली.
महापालिका सेवकांची पतसंस्था शहरात आदर्श!
आमदार लांडगे यांचे गौरवोद्गार: 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची पतसंस्था ही शहरातील एक आदर्श पतसंस्था असून कोणत्याही वादाशिवाय संचालक मंडळ सभासदांच्या व लोकहिताचे काम करीत असल्याचे गौरवोद्गार आमदार महेश लांडगे यांनी काढले.
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची पतसंस्था ही शहरातील एक आदर्श पतसंस्था असून कोणत्याही वादाशिवाय संचालक मंडळ सभासदांच्या व लोकहिताचे काम करीत असल्याचे गौरवोद्गार आमदार महेश लांडगे यांनी काढले.
सांगवीतील पदपथांना दुकानदारांचा विळखा
- अतिक्रमण विरोधी पथकाचे साटे-लोटे असल्याचा आरोप
सांगवी, (वार्ताहर) – जुनी सांगवीतील शितोळेनगर-ढोरेनगरला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दुकानदारांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे हे पदपथ पादचाऱ्यांसाठी की दुकानदारांसाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाच्या पथकाला “चिरी-मिरी’ मिळत असल्यानेच दुकानदारांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
थेरगाव परिसरात स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी
थेरगाव, (प्रतिनिधी) – गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून थेरगाव, गणेशनगर प्रभाक क्रमांक 24 मध्ये दुषित पाणीपुरवठा होत आहे. दुषित पाणी पिल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून थेरगाव परिसरात स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक सचिन भोसले यांनी महापालिकेकडे केली आहे.
यंदाच्या प्रो-कबड्डीत पिंपरी चिंचवडचा आवाज, अभिषेक बच्चनच्या पिंक पँथरकडून खेळणार
पिंपरी चिंचवड - या वर्षीच्या प्रो कबड्डी लीगमध्ये पिंपरी चिंचवडच्या सुनील सिध्दगवळी या खेळाडूची निवड झाली आहे. अभिनेता अभिषेक बच्चनने सुनीलला 6 लाखांत खरेदी करून जयपूर पिंक पॅंथर संघात सहभागी करून घेतले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ...
साळवी फाउंडेशन, आदिनाथ क्लब विजयी
आदिनाथ चषक क्रिकेट स्पर्धा : मगर स्टेडियमवर आयोजन
पिंपरी, (प्रतिनिधी) – आदिनाथ क्रिकेट क्लबतर्फे नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवर 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या आदिनाथ चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या सामन्यात साळवी फाउंडेशनने कोकाटे क्रिकेट अकादमी पराभूत केले. तर आदिनाथ क्रिकेट क्लबनेही कोकाटे फाउंडेशनचा पराभव केला.
पिंपरी, (प्रतिनिधी) – आदिनाथ क्रिकेट क्लबतर्फे नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवर 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या आदिनाथ चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या सामन्यात साळवी फाउंडेशनने कोकाटे क्रिकेट अकादमी पराभूत केले. तर आदिनाथ क्रिकेट क्लबनेही कोकाटे फाउंडेशनचा पराभव केला.
जिल्हा रुग्णालयात महिला प्रतिक्षालयाची मागणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात महिला प्रतिक्षालय सुरू करण्याची मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली. जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. सध्याचे प्रतिक्षालय आहे; मात्र ते बंद अवस्थेत असल्याने महिलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्वरीत ते प्रतिक्षालय सुरू करण्याची मागणी कामठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)