#LiveableHinjawadi म्हणजेच #सुसह्यहिंजवडी या नावाने हिंजवडी, माण, मारुंजी, नेऱ्हे आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी एक चळवळ सुरु केली आहे. जगाच्या नकाशावर आयटी पार्कमुळे नावारूपाला आलेल्या या भागातील नागरिक व आयटी कर्मचारी मात्र मूलभूत सुविधांसाठी अनेक वर्षे झगडत आहे, जणू 'दिव्या खाली अंधार'! पाणी, रस्ते, कचरा निवारण इत्यादी मूलभूत गरजा तसेच नागरी सुविधा सरकार मार्फत पुरवल्या जाव्यात अशी नागरिक मागणी करीत आहेत. या मागण्या सरकारला संविधानानुसार आणि एमआरटीपी कायद्या अंतर्गत मान्य करणे बंधनकारक आहे.

