MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 20 May 2020
पिंपरी-चिंचवड ‘रेड झोन’मध्ये नाही मात्र कन्टेन्मेंट क्षेत्रात कडक निर्बंध
पिंपरी (प्रतिनिधी) – राज्य सरकारने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. रेड झोन वगळता इतर झोनमध्ये नव्या नियमावलीत लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली अहे. या नियमावलीत पिंपरी-चिंचवड महापालिकेला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. तथापि, शहरातील कन्टेंन्मेंट क्षेत्रात मात्र कडक निर्बंध लागू असणार आहेत. त्यामुळे “थोडी खुशी, थोडा गम’ अशीच परिस्थिती शहरवासियांसाठी राहणार आहे. 22 तारखेपासून या नियमावलीनुसार शहरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
‘आनंदनगरची धारावी होऊ नये यासाठी पाऊले उचला’
पिंपरी – चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीत करोनाने शिरकाव केला आहे. हा परिसर महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. महापालिकेने या भागाकडे विशेष लक्ष पुरविणे अत्यंत महत्वाचे आहे. येथे मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असून या परिसराची धारावी होऊ नये, यासाठी महापालिकेने तातडीने पाऊले उचलावीत, अशी मागणी नगरसेवक शैलेश मोरे यांनी केली आहे.
पिंपरी महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
सातवा आयोग लागू करण्याची पिंपरी पालिकेची जुनीच मागणी आहे.
Video: पिंपरी चिंचवड महानगरपालिका रॅपिड टेस्ट चालू करणार! - नामदेव ढाके
पिंपरी चिंचवड महानगरपालिका झोपडपट्टीतील नागरिकांची रॅपिड टेस्ट करणार,पिंपरी चिंचवड महापालिका नवीन बातमी
पिंपरी युवासेनेचे मदत कार्य सुरूच, कर्नाटकला जाणाऱ्या परप्रांतीयांसाठी अल्पोपहार व जेवणाची सोय..!
पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या या महासंकटात पहिल्या दिवसापासून पिंपरी युवासेना मैदानात उतरली आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारकडून मदतकार्य सुरू असून युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके एका ‘योध्दा’ प्रमाणे लढत आहे. गरजूंना शिधा, धान्य वाटप तसेच सुरक्षेसाठी सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप त्यांच्याकडून केले जात आहे. आता मूळगावी कर्नाटकला जाणाऱ्या परप्रांतियांसाठी अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
पिंपळे सौदागरमधील प्लॅनेट मिलेनियम सोसायटीची मागील बाजू ते स्पॉट 18 पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात
पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील प्लॅनेट मिलेनियम मागील बाजू ते स्पॉट १८ पर्यंतच्या १८ मीटर नोन डीपीच्या रस्त्याचे काही वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु लष्कराने अडवल्यामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. परंतु आता लष्कराने या रस्त्याच्या कामाला परवानगी दिल्यामुळे आज स्मार्ट सिटी अंतर्गत स्टॉर्म वॉटरच्या लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरातील कलाकारांना महापालिकेने मदतीचा हात द्यावा – अमित गोरखे
पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन वाढवलायं. सर्वत्र उद्योग-धंदे, व्यवसाय बंद आहेत. कलाकारांचे व्यवसायही याला अपवाद ठरले नाहीत. शहरातील कलाकार, नृत्य कलाकार, गायन कलाकार, वादक यांच्यासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर प्रकाश योजनाकार, ध्वनी योजना कार, मेकअप आर्टिस्ट पडद्यामागील कलाकार यांच्यावर देखील संकटाचा डोंगर कोसळला आहे. तरी पिंपरी चिंचवड शहरातील अशा कलाकारांना महापालिकेने मदतीचा हात द्यावा. आर्थिक तसेच इतर पध्दतीने मदत करावी अशी मागणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त व महापौर यांच्याकडे केली आहे.
Pune, Pimpri-Chinchwad RTO to function from Monday
Pune: The waiting period for the registration of vehicles, renewal of licence and other work is going to end as the state government has given a reason to smile to the vehicle owners and dealers. The state has allowed starting registration of new vehicles and applying for new licences too. The Regional Transport Offices (RTO) of Pune, Pimpri-Chinchwad and other offices in the district will start working from today.
Finolex Industries extends support to dealers and staff amid COVID-19
Pune: Finolex Industries Ltd (FIL), manufacturer of rigid PVC Pipes and Fittings took a slew of initiatives to reassure employees, dealers and associates amid the lockdown that has taken a toll on businesses.
श्रमिकांसाठी पुण्यातून दररोज ११ रेल्वे गाडय़ा
करोनाच्या सद्य:स्थितीबाबत पत्रकारांना दूरचित्रसंवादाद्वारे जिल्हाधिकारी राम यांनी ही माहिती दिली.
हॉटेल व्यावसायिकांपुढील संकटांमध्ये आणखी वाढ
परराज्यातील कामगार निघून गेल्याने अडचणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या बहुतांश हॉटेलमधील कामगार हे परराज्यातील आहेत. यातील अनेक कामगारांनी आपले घर गाठल्यामुळे शहरातील हॉटेल उद्योगांपुढील अडचणीत भर पडली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद असून सुरू कधी होणार याबाबत अनिश्चितता असतानाच आता मजूरही निघून गेल्यामुळे या उद्योगापुढील संकटात भरच पडली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)