मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे ‘खासदार आपल्या भेटीला’ या अभियाना अंतर्गत मतदार संघातील विविध भागांमध्ये जावून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. याच अनुशंघाने नवी सांगवी परिसरामध्ये जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या असल्याची माहिती बारणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 18 November 2017
महापौरांपाठोपाठ आता आयुक्तांचा स्वीडन दौरा
पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांच्यापाठोपाठ आयुक्त श्रावण हर्डीकर स्वीडन देशाच्या दौर्यावर जाणार आहेत. हा दौरा २० ते २६ नोव्हेंबर या कालावधीत आहे.
टपाल कार्यालयात मिळणार आधार कार्ड
चौफेर न्यूज – पुढील वर्षापासून महाराष्ट्र व गोव्यातील नागरिकांना राज्यांतील टपाल कार्यालयामधून (पोस्ट ऑफिस) आधार कार्ड मिळणार आहेत. या दोन्ही राज्यांमधील १२००हून अधिक पोस्ट कार्यालयांमध्ये आधार क्रमांकासाठी नोंदणी प्रक्रियाही २०१८पासून सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल एच. सी. अगरवाल यांनी दिली.
आयुक्तांना सल्ला देण्यासाठी सल्लागार नेमावा
पिंपरी – महापालिकेत वर्ग एक, दोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गलेलठ्ठ पगार मोजूनही शहरात किरकोळ कामांवर देखील सल्लागार नेमणूक करण्यात येत आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सल्ला देण्यासाठी पालिकेत सल्लागार नेमण्यात यावा, तसेच त्या सल्लागाराचा येणारा सर्व खर्च उचलण्याची तयारी माझी आहे, अशी उपरोधिक मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन सादर केले आहे.
PCMC officials & judges to inspect new site for courts
PIMPRI CHINCHWAD: Civic officials and judges will inspect a new location in the Nehrunagar area to set up 20 new courts on Saturday.
Ashok Stambh to come up at Pimpri Chowk
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will build a 27ft Ashok Stambh (pillar) at Pimpri Chowk on the Pune-Mumbai highway, for which the city improvement committee gave its approval on Thursday.
Bopkhel residents to meet top officials
Pimpri Chinchwad: The residents of Bopkhel will meet district collector and municipal commissioner to seek clarity on the construction of an alternate road to their village.
Treasure hunt, informal get-together to drive home message of recycling
Pune: A treasure hunt at a waste-sorting facility, a meet-and-greet over an eco-conscious beer-and-snacks session. This is how a company engaged in the social sector plans to drive home the necessity of recycling waste.
शहरातील शाळा-कॉलेज, हॉस्पिटलच्या बाहेर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मनसेची मागणी
पिंपरी चिंचवड शहरातील शाळा-कॉलेज तसेच हॉस्पिटलच्या बाहेर सुरक्षिततेच्या कारणास्तव सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. याबाबत शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने महापालिका सहाय्यक आयुक्त डॉ.महेश डोईफोडे यांना निवेदन दिले.
भोसरीतील १०० कोटींचा पूल कचऱ्यात!
कोटीच्या कोटी उड्डाणे घेत तब्बल १०० कोटीच्या घरात पोहचलेला भोसरीत उड्डाणपूल आता चक्क कचऱ्यात गेल्याचे चित्र आहे. १०० कोटींच्या या पुलाबद्दल कित्येक रंजक स्वप्ने नागरिकांनी दाखविण्यात आली होती. पुलाखाली उद्यान, पे अँण्ड पार्क होणार, यामुळे या परिसराचा कायापालट होणार अशा बऱ्याच घोषणा झाल्या होत्या. परंतु हे सर्व काही कागदावरच राहिले असून नियोजना अभावी या पुलाखाली अक्षरशः कचराकुंडी निर्माण झाली आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर जाणार स्वीडन दौ-यावर
महापौर नितीन काळजे आणखी स्पेन दौ-यावर गेलेले असताना आता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर विदेशवारीवर स्वीडन दौ-यावर जाणार आहेत. ते येत्या सोमवारी (२० नोव्हेंबर) या दौ-यावर रवाना होणार आहेत. त्यांच्यानंतर महापालिका आयुक्तांचा कारभार कोण बघणार, याची उत्सुकता आहे.
पिंपरी-चिंचवडला ज्यादा पाणी देण्यास जलसंपदा मंत्री तयार
पिंपरी-चिंचवड शहराला जास्तीचे पाणी देण्यास मुंबईतील कालावा समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली आहे. ठरवून दिलेल्या पाणी आरक्षणापेक्षा अधिक पाणी पवना धरणातून घेण्यास राज्य शासनाने तयारी दर्शविल्याने शहराला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
खाद्य पदार्थ विक्रेत्यांना स्वच्छतेचे धडे
पिंपरी – हातगाडी किंवा टपरीधारक अशा खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यवसाय करताना स्वच्छतेला अधिक प्राधान्य दिल्यास व्यवसाय वृद्धी होईल, असा विश्वास अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांनी व्यक्त केला.
आणि कलाटे पवारांमध्ये जुंपली….!
वाकड मधील एका कामाच्या मंजुरीच्या निमित्ताने आज पिंपरी महापालिकेत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यात चांगलीच जुंपली. काही पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी मध्यस्थी केल्याने हे प्रकरण ‘हात घाई’ वर जाता जाता राहिले.
शहरातील नाट्यगृहे रंगकर्मींना देण्यास प्राध्यान्य द्यावे – अमित गोरखे
पिंपरी चिंचवड शहरातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, नागरिकांना सांस्कृतीक कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा. यासाठी महापालिकेने शहरात चार नाट्यगृहांची निर्मिती केली आहे. मात्र, त्याचा वापर सांस्कृतीक कार्यक्रमापेंक्षा इतर खासगी कार्यक्रमांसाठी जास्त प्रमाणात केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने महिन्यातील चार रविवार सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी नाट्यगृहे आरक्षित ठेवावीत, अशी मागणी संस्कार भारती आणि कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी महापालिकेकडे केली आहे.
दुरूस्तीची काढलेली कामे म्हणजे कामांचा दिखावा?
जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड शहरात सत्तातरानंतर पहिल्यांदाच पालिकेने प्रत्येक कामात सल्लागार नियुक्त करून सर्व सामान्य माणसांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी सुरू असुन ती थांबविण्यात यावी, याबाबत महापालिका आयुक्तांकडे माजी स्थायी अध़्यक्ष प्रशांत शितोळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,पिंपरी चिंचवड शहराचा सन २००२ ते २०१७ पर्यंतच्या काळातील विकास पाहता पिंपरी चिंचवड महापालिका ही देशातील वेगाने विकसित झालेली महापालिका आहे. २०१७ च्या सत्तांतरानंतर गेल्या काही महिन्यांपासुन सत्ताधारी व प्रशासन कोणत्याही कामासाठी सल्लागार नेमुन सर्वसामान्य माणसांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी करत आहे? विशेष म्हणजे सन २०१७ पुर्वी सल्लागारांना तिव्र विरोध करणारे आत्ता सत्ताधारी झाल्यावर सल्लागारांना स्वागत कक्ष उभारून बसले आहेत. अनेक,रस्त्यांच्या कामाला दुरूस्तीची गरज नसताना सल्लागारांमार्फत कामे काढुन कामांचा दिखावा कशासाठी?अनेक कामांचा क्रॉस सेक्शन काँमन असताना असतानाही सल्लागारांची नेमणुक कशासाठी, यात महापालिकेचे अधिकारी निष्क्रिय झाले आहेत का? कामावर तुमचे नियंत्रण नाही का? असे अनेक प्रश्न त्यांनी या निवेदनात विचारले आहेत.यात विविध चुकींच्या कामाचे दाखले त्यांनी निवेदनात दिले आहेत.
Proposal for Aadhaar-linked e-registration still awaits nod
It has been over a year since proposed, but the state government is yet to give its nod to amend Registration Rules, 1961, for enabling individuals to go for Aadhaar-linked e-registration of properties.

‘मूडीज्’ने भारताचे क्रेडिट रेटिंग वाढवले; रेटिंगमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर सुधारणा
नवी दिल्ली – भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातील एक चांगली बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी ‘मूडीज्’ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला आहे. भारत सरकारने लागू केलेल्या जीएसटी, आधार संलग्नता आणि विविध लाभांचे पैसे थेट खात्यात जमा करणे अशी विविध महत्त्वाची पावले उचलण्यात आल्याने ‘मूडीज्’ने हा निर्णय घेतला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)