Thursday, 1 February 2018

[Video] भूजलाची गाथा

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन 

तिसऱ्या ट्रॅकचा अहवाल अंतिम टप्प्यात

पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यान प्रस्तावित असणाऱ्या उपनगरीय लोकल कॉरिडॉरचे काम मार्गी लागण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. या मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम प्रस्तावित असले, तरी रेल्वे प्रशासनाकडून त्याचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. मार्चअखेरीस तो केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. 

लोकल प्रवासी वेठीस

तळेगाव स्टेशन - एक्‍स्प्रेस गाड्यांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी थांबवून ठेवल्यामुळे, तब्बल अर्धा तास उशिराने तळेगाव स्टेशनला पोचलेल्या लोणावळा- पुणे लोकलच्या प्रतीक्षेत थांबलेल्या प्रवाशांचा संताप अनावर झाला. संतप्त प्रवाशांनी जवळपास अर्धा तास रेल रोको करीत तळेगाव रेल्वे स्टेशन मास्तरांना घेराव घातला.

लोकल उशिरा आल्याने तळेगावात प्रवाशांचा रेलरोको

तळेगाव स्टेशन : एक्सप्रेस गाड्यांना मार्ग मोकळा करुन देण्यासाठी थांबवून ठेवल्यामुळे, तब्बल अर्धा तास उशिराने तळेगाव स्टेशनला पोहोचलेल्या लोणावळा पुणे एल-६ डाऊन या लोकलच्या प्रतीक्षेत थांबलेल्या प्रवाशांचा संताप अनावर झाल्याने, प्रवाशांनी जवळपास अर्धा तास रेलरोको करत तळेगाव रेल्वे स्टेशन मास्तरांना घेराव घातला.

Pune-Mumbai highway: Shivneri bus death highlights dangers of 'bulky, ill-marked' speedbreakers, again

THE DEATH of two persons after they were hit by the luggage door of state-run Shivneri bus, which unlatched after passing over a speedbreaker on the Pune-Mumbai highway in Khadki on Sunday night, served as a stark reminder of the threat ill-designed speedbreakers on the stretch pose to the lives of commuters.

पावणे तीन हजार अवैध बांधकामांवर फौजदारी

पिंपरी – शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिका बांधकाम विभागाने अर्ज मागवले, मात्र अवैध बांधकामे नियमितीकरणाकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. शहरात डिसेंबर 2015 पर्यंतचे अवैध बांधकामे नियमित होण्याची प्रक्रिया सुरू असतानाही अद्याप महापालिका हद्दीत अवैध बांधकाम करण्यावर नागरिकांचा भर आहे. शहरात अवैध बांधकाम करणाऱ्या सुमारे पावणे तीन हजार नागरिकांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

सायक्‍लोथॉन स्पर्धेचे येत्या रविवारी आयोजन

जायंट स्टारकेन आणि रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी यांचा संयुक्‍त उपक्रम
पुणे – प्रदूषणाचे होणाऱ्या घातक परिणामांवषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांमध्ये प्रदूषणविरहित आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने स्टारकेन स्पोर्टस प्रा. लि आणि रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी यांनी रविवार, दि. 4 फेब्रुवारी रोजी सायक्‍लोथॉनचे आयोजन केले आहे.

थुंकणाऱ्यांना कोण अडविणार?

निगडी - शहरात अनेक ठिकाणी थुंकणारे दिसतात. मात्र, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याने जंतुसंसर्ग आणि रोगराई पसरते, याचे भान नसते. कुचकामी कायदा अन्‌ अंमलबजावणी यातून थुंकणाऱ्यांचे फावते.  स्वयंशिस्तीचा अभाव आणि बेपर्वाई यांना आळा घालण्यासाठी कायदा करून भागणार नाही, तर सामाजिक जागृती आणि दबाव गट निर्माण होण्याची गरज आहे; अन्यथा सामाजिक स्वास्थ्यापुढे जटिल प्रश्न भविष्यात निर्माण होईल, हे नक्की. 

पिंपरीत ‘स्मार्ट सिटी’साठी शासनाचा निधी नाहीच

‘स्मार्ट सिटी’साठी पिंपरी-चिंचवडची १८ ऑगस्ट २०१७ ला वर्णी लागली.

स्थायी समितीकडून ३० कोटींच्या कामांना मान्यता

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत आज (बुधवारी) सुमारे ३० कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली आहे. टेल्को रस्त्यावर केएसबी चौक ते थरमॅक्स चौकापर्यंत डांबरीकरणासाठी ४ कोटी २० लाखांचा खर्च मंजूर केला आहे.

सरकारी कार्यालयांना अवैध धंद्यांचा विळखा

पिंपरी - चिंचवड स्टेशन येथील गुलजार बिल्डिंगमध्ये असलेल्या दुकाने निरीक्षक कार्यालय आणि पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यालयाला घाणीचे साम्राज्य व अवैध धंद्यांनी विळखा घातल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस व महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्याचा नागरिक व अधिकाऱ्यांना त्रास होत आहे.

 

बिस्कीट, सिगारेटची एकत्र विक्री नकोच

पुणे - दुपारची वेळ... शिवाजीनगरचा गजबजलेला परिसर... शाळकरी मुलांसमोर सिगारेटचे झुरके ओढत थांबलेले तरुण... आणि सिगारेटमधून हवेत जाणाऱ्या धुराकडे कुतूहलाने पाहणारा शाळकरी मुलांचा घोळका.. असेच चित्र फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता अशा वेगवेगळ्या रस्त्यांवर शाळेच्या वेळेत दिसले. त्यामुळे लहान मुलांचे अन्नपदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थ एकाच ठिकाणी न विकण्याच्या आदेशाची नितांत गरज होती, हे लक्षात आले आणि त्याच्या अंमलबजावणीची आवश्‍यकता प्रकर्षाने समोर आली आहे.

आरटीआयमध्ये माहिती न देणा-या पालिका अधिका-याला दंड

माहिती अधिकार कायद्याअंतर्गंत माहिती न देणा-या पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंडे या अधिका-याला ५ हजार रुपये दंड झाला आहे. आरटीआय अधिनियमातील कलम ७(१) चे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्या वेतनातून हा दंड वसूल करण्याचे आदेश राज्य माहिती आयुक्तांनी दिले आहेत.

भाजपवाले ‘अँनाकोंडा’… कच-यातून २५२ कोटी गिळण्याचा डाव; राष्ट्रवादीचा आरोप

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करुन तो मोशी कचरा डेपो येथे नेण्याच्या नव्या कंत्राटात २५२ कोटी रुपयांचा संभाव्य घोटाळा होणार आहे. शहराच्या दोन भागाची विभागणी करुन भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा खर्च काढायचा आहे. भाजपवाले ‘अँनाकोंडा’ असून पैसे गिळून टाकत आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसने केला. तसेच करदात्यांच्या पैशांची लुटमार कदापी सहन केली जाणार नाही. या निविदेमुळे महापालिका भिकारी बनणार आहे. त्यामुळे त्याची फेरनिविदा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आयुक्तांकडे केली आहे. पिंपरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक नाना काटे उपस्थित होते.

कचरा संकलनाच्या कामातील भ्रष्टाचार थांबवा: प्रशांत शितोळेंचा आरोप

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील घराघरातील कचरा गोळा करून वाहतुक करण्याचे काम काढले आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियेत २५२ कोटी रुपये ज्यादा देवून करदात्यांच्या पैशांच्या लुटीचा डाव सुरू आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढून हा गैरकारभार थांबवा, अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष व माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत केली.

पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी घरफोडी; चोरट्यांनी ९० तोळे सोने आणि ३५ हजारांची रोकड लांबवली

नातेवाईकांच्या लग्नासाठी केले होते जमा

पिंपरीत सुमारे ७५ लाखांच्या रोकडसह एटीएमची कॅशव्हॅन घेऊन चालक फरार

कॅशव्हॅन भोसरीत सापडली मात्र, पैसे घेऊन चालक पसार

“बजाज’चा प्रश्‍न आता कामगार उपायुक्‍तांच्या “कोर्टा’त

– सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरुच 
– आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा
पिंपरी – बजाज कामगारांचा वेतनवाढ करार व निलंबित कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी आज सलग तिसऱ्या दिवशी बेमुदत उपोषण सुरु होते. या प्रश्‍नावर कामगार उपायुक्तालयात उद्या (गुरुवारी) विश्‍व कल्याण कामगार संघटना व व्यवस्थापन यांची बैठक होणार असून कामगारांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, शहरातील विविध कामगार व सामाजिक संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे.

Bajaj Auto workers go on hunger strike at Akurdi, Chakan plants

Earlier this month, the company had received a notice from the workers union - Vishwa Kalyan Kamgar Sanghatana - for an indefinite hunger strike at the two plants from January 29.

विकासाबरोबर पालिकेचे खेळालाही प्राधान्य – महापौर नितीन काळजे

जागतिक पातळीवर महापालिका हद्दीतील खेळाडू तयार झाले पाहिजेत. यासाठी महापालिका विविध खेळांच्या महापौर चषक स्पर्धा भरवत असते. तसेच महानगरपालिका विकासाबरोबरच खेळाला नेहमी प्राधान्य देत असते, असे मत नितीन काळजे यांनी व्यक्त केले.

डिजिटायझेशन आणि लोकसहभागामुळे सरकारी योजनांतील दलालीला चाप- देवेंद्र फडणवीस



दलाल या योजनांचा निधी लुबाडत असत.