Thursday, 17 April 2014

Three detained for distributing money

The Sangvi police detained three persons with Rs 60,000 in Pimple Gurav area on Wednesday.

मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरुन पिंपळेगुरव मधून तिघे ताब्यात

मतदार स्लिपा वाटत असताना 60 हजार रुपयांची रोकड बेकायदेशीरपणे बाळगल्याबद्दल मावळ लोकसभा मतदार संघातील शेकापचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या तीन कार्यकर्त्यांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

.....तर लक्ष्मण जगतापांच्या सभेला गेलो नसतो

राज ठाकरे यांनी लक्ष्मण जगताप यांना पुन्हा फटकारले
शेकापचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप हे अनधिकृत बांधकामांचे समर्थन करीत आहेत, असे आपल्याला माहिती असते तर आपण त्यांच्या सभेलाच गेलो नसतो. आपण एका व्यक्तीसाठी आपली भूमिका बदलू शकत नाही, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जगताप यांना फटकारले. 'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' कार्यक्रमातील प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. राज ठाकरे यांच्या या स्पष्टोक्तीमुळे जगताप यांना मोठा हादरा बसला आहे.

उमेदवारांचे सकाळच्या टप्प्यातच ...

सोनाली कुलकर्णीनेही बजावला मतदानाचा हक्क
मावळ लोकसभा मतदार संघातील मतदानाला 2185 केंद्रांवर आज (गुरुवारी) सकाळी सात वाजता शांततेत सुरुवात झाली. सकाळीच मतदान करण्याकडे बहुसंख्य मतदारांचा कल दिसून येत आहे.

मतदानासाठी 'ते' येणार चीनहून चिंचवडला

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असताना चीनमध्ये नोकरी निमित्ताने स्थलांतरीत झालेले जोडपे खास मतदानासाठी उद्या (गुरुवारी) चिंचवडला येत आहेत.
मावळ लोकसभा मतदार संघासाठी उद्या सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यावेळी सर्वच स्तरातून प्रयत्न झाले. मात्र, त्याची दखल कितीजण घेतात हे उद्या समजणार आहे. मात्र, चिंचवड येथून चीनला कामानिमित्त स्थलांतरीत झालेले राजगंम श्रीराम व त्यांच्या पत्नी खास भारतात मतदानासाठी येत आहेत. महापालिकेच्या महात्मा फुले शाळेमध्ये त्यांचे मतदान आहे.

शहरातील बकाल उद्यानात सुधारणा ...

पिंपरी -चिंचवड शहरातील अनेक उद्यानांची अवस्था अतिशय बकाल असून सबंधित ठेकेदारास त्वरित जवाबदार धरून त्यात सुधारणा घडवून आणावी अशी मागणी पर्यावरण सवंर्धन समितीचे अध्यख विकास पाटील यांनी मुख्य उद्यान अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

पीएमपीएमएलकडून नागरिकांच्या तक्रारींची दखल

शासकीय यंत्रणांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही अशी ओरड नेहमी ऐकायला मिळते. परंतु पीएमपीएमएलने प्रवाशांच्या तक्रारनिवारणासाठी एक वेगळे पाऊल उचलून आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.
मात्र, दंड करण्यापेक्षा पीएमपीएमएलच्या संबंधित अधिका-यांनी एक वेगळी शक्कल लढवली. त्यांनी संबंधित बस चालकाला दोन दिवस यमुना नगर बस स्टॉपवर उभे करून येणारी बस थांबविण्याचे काम सोपविले. प्रवासी तासन्‌तास बस स्टॉपवर थांबतात. त्यांच्या डोळ्यासमोरुन एखादी बस न थांबता निघून जाते त्यावेळी त्यांना किती त्रास होतो, याची जाणीव त्या चालकाला व्हावी. त्याच्याकडून अशा प्रकारची चूक पुन्हा होऊ नये आणि प्रवाशांना चांगली सेवा मिळावी. असा त्या मागील त्यांचा हेतू होता.

मावळात पक्षविरोधी प्रचार करणाऱ्या तीन शिवसेना नगरसेविकांची हकालपट्टी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेच्या शारदा बाबर, सीमा सावळे व आशा शेडगे या तीन नगरसेविकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा उपनेते शशिकांत सुतार यांनी बुधवारी केली.

मतदार ठरविणार आज ७१ उमेदवारांचे ‘भवितव्य’

पुणे, बारामती, शिरूर व मावळ या लोकसभा मतदारसंघातील विविध पक्षांच्या उमेदवारांसाठीचे मतदान आज (गुरुवारी) सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. लक्षवेधी चारही मतदार संघांतील ७१ उमेदवारांच्या निवडणुकीसाठी एकूण ७४ लाख १६ हजार ४0१ मतदार आहेत. 

सौरभ मगर, ऐश्‍वर्या शिंदे प्रथम

पिंपरी : क्रीडा भारती, पिंपरी-चिंचवड शहर आणि ज्ञान प्रबोधिनी विद्यालय क्रीडाकुलतर्फे आयोजित जोर मारणे स्पर्धेत दहावीतील विद्यार्थी सौरभ मगरने १५00, तर ऐश्‍वर्या शिंदेने ३३१ जोर मारून अनुक्रमे मुले व मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला. 
हनुमान जयंतीनिमित्त निगडीतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या मैदानावर जोर मारणे, तसेच, मल्लखांब आड्या मारण्याची स्पर्धा झाली. स्पर्धेत सहावी ते दहावीच्या २00 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन व मारुती स्तोत्राने स्पर्धेस सुरुवात झाली. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एकूण २५ हजार जोर मारले. केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर व क्रीडाकुलप्रमुख भगवान सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. 

परिमंडल तीन हद्दीतून सातजण तडिपार

पिंपरी : निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिमंडळ तीनच्या हद्दीतून सात जणांना तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा जणांचा समावेश आहे. 
सलीम मकबुल पटेल (वय २५, रा. राजीव गांधी वसाहत, नेहरुनगर, पिंपरी), किरण ज्ञानोबा रणदिवे (वय २६, रा. विठ्ठलनगर, पिंपरी), समीर शहाबुद्दीन शेख (वय २८, रा. जय भवानी काट्याजवळ, विद्यानगर, चिंचवड), उदय ऊर्फ ज्वाला केदारसिंग गोरखा (वय २२, रा. गांधीनगर, पिंपरी), प्रकाश दिलीप साळसकर (वय २१, रा. मिलिंदनगर, पिंपरी), अतुल अविनाश पवार (वय २0, रा. आंबेडकर हौसिंग सोसायटी, पिंपरी), नीलेश हनुमंत कोळी (वय २४, रा. फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. 

कासारवाडीत युवकांचा शंभर टक्के मतदानाचा निर्धार

कासारवाडीतील इतिहासात प्रथमच कासारवाडीतील युवकांनी शंभर टक्के मतदानाचा निर्धार केला असून यासाठी कासारवाडीतील सिटीझन फोरमने पुढाकार घेतला आहे.