Tuesday, 18 March 2014

द्रुतगती मार्गाला लवकरच गती

... होऊन पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल. सुमारे 43 किलोमीटरच्या प्रकल्पासाठी 1380 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गाला हडपसर, पुणे- नगर रस्ता, सिंहगड रस्ता, बाणेर रस्ता, औंध रस्ता, पिंपरी-चिंचवड रस्ता आणि भोसरी रस्ता जोडले जातील.

वायसीएम आगामी काळातील महत्त्वपूर्ण रुग्णालय - डॉ. संचेती

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा रौप्य महोत्सव
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाने पंचवीस वर्षे रुग्णांच्या सेवेत महत्वपूर्ण योगदान दिल्यामुळे आगामी काळातील वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण रुग्णालय म्हणून याचा नावलौकीक होईल. भविष्यकाळामध्ये हे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय होईल या दृष्टीने रुग्णालय निर्मितीच्यावेळी नियोजन केल्याने आज हे रूप दिसत आहे. असे मत पद्मविभूषण डॉ. कांतीलाल संचेती यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यंशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास आज 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.

मावळात नेते आघाडीचा नव्हे; बिघाडीचा धर्म पाळणार


पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होणार, हे आता खासदार गजानन बाबर आणि कॉंग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेले आझम पानसरे ठरविणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कारण लक्ष्मण जगताप यांचा पराभव हे पानसरेंचे ...पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर राष्ट्रवादीसोबत असले, तरी ...

लोकसभा निवडणूक न लढविण्याचा खासदार गजानन बाबर यांचा निर्णय

उमेदवारी नाकारल्यानंतर बंडाचा झेंडा फडकवत शिवसेनेचा राजीनामा देणारे खासदार गजानन बाबर यांनी ही लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या पक्षात जायचे अथवा कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी 'एमपीसी न्यूज'शी बोलताना सांगितले.

अजित पवार कसा घेणार समाचार?

पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघाचा प्रचार प्रारंभ तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी (दि. १८) दुपारी तीन वाजता होणार आहे. पक्षाचे सर्वेसर्वा, उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार याविषयी सर्वत्र मोठी उत्सुकता आहे. 
आमदार लक्ष्मण जगताप यांनी धुडकावून लावलेली उमेदवारी, यानंतर उमेदवारी स्विकारण्यास अनेकांनी दिलेला नकार, यातूनच उमेदवार शोधाशोधीसाठी झालेली दमछाक आणि दम देऊनही ‘सकाळी एकाकडे आणि रात्री दुसरीकडे’ जाणारे पदाधिकारी यामुळे ते उद्विग्न झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर ते कोणाचा समाचार घेणार याविषयीचे तर्कविर्तक लढविले जात होते.

राजस्थानी बांधवांच्या पारंपरिक पारंपरिक गेरा नृत्याने पारणे फिटले

कासारवाडी मधील आईमाता मंदिर येथे सिरवी क्षत्रीय समाज बांधवांनी आज (सोमवारी) एकत्र येऊन धुळवडीचा सण साजरा केला. पारंपरिक गेरा आणि घुमर नृत्याच्या पदलालित्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले.