Monday, 5 June 2017

“सीएसआर’वर नाले सफाईची मदार

–  “डेडलाईन’ संपूनही मोठे नाले अपूर्ण 
पिंपरी, (प्रतिनिधी) – ऐनवेळी नाले साफसफाई कामे करणाऱ्या ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेतून पळ काढल्याने आरोग्य विभाग अडचणीत सापडला होता. मात्र, आयुक्‍तांनी शहरातील नाले साफसफाई कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात (सीएसआर) फंडातून करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने शहरातील 135 छोटे नाल्यांची स्वच्छता पुर्ण झाली आहे. परंतु, काही मोठे नाल्याची सफाई अजुनही अपुर्ण राहिली आहे. त्यामुळे यंदा नाले सफाईची मदार “सीएसआर’ फंडावर अवलंबून राहिल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे.

“कुंडी विरहीत वॉर्ड’मुळे नागरिकांची होतेय कुचंबणा

घंटागाडी वेळेवर येईना : कचरा टाकण्यास अडचणी
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी तसेच, रस्त्यावरील कचरा कमी करण्यासाठी शहरातील क्षेत्रीय कार्यालयानुसार काही ठिकाणी वॉर्डस्तरीय कुंडी विरहीत वॉर्ड ठरवण्यात आले आहेत. घरोघरी कचरा गोळ्या करणाऱ्या वाहनांमध्ये कचरा टाकण्यास आरोग्य विभागाकडून अनिवार्य केले आहे. मात्र, एकदा वाहन निघून गेल्यानंतर कचरा कुठे टाकायचा, असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला असल्याचे दिसून येते.

शहरवाढीला चालना, पर्यावरणाची दैना

पिंपरी : राज्यात झपाट्याने होत असलेल्या औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरणामुळे पिंपरी-चिंचवड शहरवाढीला चालना मिळत असली, तरी या ठिकाणी पर्यावरणाची दैना झाल्याचे दिसत आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती, नागरी सुविधांवर ताण येत असून, ...

PCMC's scavengers get safety gear after rap from natl body

Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has finally decided to take into account the need to provide safety gears to sanitation workers. The National Commission for Safai Karamcharis (NCSK) had issued a notice last week to the authorities ...

Old makes way for new in Pimpri cloth market

Oncrossing the threshold of Pimpri station not more than 40 minutes from the main city, one cannot help but acknowledge the diversity that the markets here have accommodated in the recent past. Just a few metres from the station is Shagun Chowk, which ...

बदलत्या वातावरणात सर्पदंशापासून सावधान!

पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दरवर्षी साधारण आठ ते दहा हजार साप पकडले जातात. यातील बहुतेक बिनविषारी असतात. सर्पदंशाचे प्रमाण शहरात नगण्य असले तरी बदलत्या वातावरणात सापांच्या स्वभावात होणाऱ्या बदलामुळे सर्पदंशापासून सावध राहण्याची गरज आहे. 

कांद्याची आवक कमी, भाव कोसळले

चाकण बाजारभाव : एकुण उलाढाल 95 लाख
चाकण, दि. 4 (वार्ताहर) – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये शेतकऱ्यांच्या संपामुळे कांदा, बटाटा आवकेत घट होऊन भावही कोसळले. कांदा, जळगाव, भुईमुग शेंगा, बटाटा लसूण भाव कमी झाले. राजगुरुनगर मार्केटमध्ये या आठवड्यात पालेभाज्यांची आवक कमी झाली. शेलपिंपळगाव उपबाजारात भाज्यांची आवक घटली. चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, पालक व मेथीची आवक कमी झाली. जनावरांच्या बाजारात बैल, जर्शी गाय, शेळ्या-मेंढ्या व म्हशींच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल 93 ते 95 लाख रुपये झाली.

दिघीत दिव्यांग मुलांसाठी पुनर्वसन केंद्राची उभारणी

भोसरी, (वार्ताहर) – दिघी येथील आसवार दाम्पत्याने पुढाकार घेऊन सुयश फाउंडेशनच्या माध्यमातून आश्रय रिह्याबिलेटेशन सेंटर (पुनर्वसन केंद्र) सुरू करण्यात आले आहे. अपंग व दिव्यांग मुलांच्या संगोपनासाठी ही संस्था काम करणार आहे.

सोन्याच्या दागिन्यांना फसवणुकीचे “पॉलिश’

पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक : दोन संशयितांचा पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये धुमाकूळ
ज्येष्ठ महिला टार्गेट; हिप्नॉटिझमचाही होतोय वापर

खंडित वीज पुरवठ्यामुळे लघु उद्योजक हैराण

उत्पादनावर परिणाम : महा-वितरणकडे उपाय-योजना करण्याची मागणी 
पिंपरी,  (प्रतिनिधी) – गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कुदळवाडी, चिखली व इंद्रायणी इंडस्ट्रियल इस्टेट, मोशी परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे लघु उद्योजक कमालीचे हैराण झाले आहेत. अनेकदा महा-वितरणकडे तक्रार करूनही त्यावर तोडगा निघत नसल्याने कंपनीतील उत्पादनावर त्याचा परिणाम होत असून महा-वितरणाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.