सारथी हेल्पलाईनव्दारे आलेल्या तक्रारीची माहिती लोकप्रतिनिधीना देऊ नये अशी मागणी पिंपरी -चिंचवड आरोग्य सेनेचे सरचिटणीस गणेश थोपटे यांनी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी 'सारथी' हेल्पलाईन सुरु केली. सामान्य नागरिकांना सारथी नंबरवर फोन करून महापालिका विषयक समस्या नोंदवू शकतात. त्याचप्रमाणे विद्युत, पाणी पुरवठा, बाधकाम परवाना, अनधिकृत बाधकाम, रस्ते आदी विषयक सर्व प्रकारची आवश्यक माहिती नागरिकांना सहज मिळविता येऊ लागली आहे.