पिंपरीः कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवक अपात्रतेचे लोण आता राज्यभर पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातूनच पुण्यातील दोन, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चार नगरसेवकांवरही ही अपात्रतेची तलवार आता लटकू लागली आहे. हे सहाही नगरसेवक सत्ताधारी भाजपचेच आहेत. निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने वा ते मुदतीनंतर दिल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 27 August 2018
`राष्ट्रवादी'च्या काळातच पिंपरी स्मार्ट; भाजप महापौरांची अप्रत्यक्ष कबुली
पिंपरीः ``पिंपरी चिंचवडचा "स्मार्ट सिटी'त समावेश होण्यापूर्वीच शहराच्या पिंपळे सौदागर भागात आल्यावर नवी मुंबईत प्रवेश केल्याचा भास होत असे. एवढा विकास येथे झालेला आहे,'' असे सांगताना भाजपचे महापौर राहूल जाधव यांनी हा भाग पूर्वीचे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या काळातच स्मार्ट झाल्याची अप्रत्यक्ष कबुली आज दिली. भाजपचे स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या (त्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक) पाठपुराव्यामुळेच हा भाग स्मार्ट झाल्याचेही महापौरांनी आवर्जुन सागितले.
नगरसेवक पत्नीच्या नामकरणाच्या ठरावाची नगरसेवक पतीकडून अंमलबजावणी
पिंपरी : पत्नीने नगरसेविका असताना केलेल्या बस टर्मिनल नामकरण ठरावाचा पाठपुरावा नंतर नगरसेवक झालेल्या त्यांच्या पतीने करून त्याची अंमलबजावणी करून घेतल्याची दुर्मिळ घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. त्यासाठी साडेतीन वर्षे लागली. योगायोगाची बाब म्हणजे त्यावेळच्या या मनसे नगरसेविकेच्या प्रस्तावाला अनुमोदक त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक राहूल जाधव होते. सध्या ते महापौर आहेत. त्यांच्यात हस्ते या बीआरटी सेवा व बस टर्मिनलचे नामकरण नुकतेच (ता.24) झाले
नाशिकफाटा-चाकण मेट्रो प्रकल्पाचा ‘डीपीआर’ तयार
सिस्ट्राईकॉम-इजिस-राईटस या संस्थेने
पिंपरी : पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रो धावणार असल्याचे निश्चित झाले आहे. या दोन्ही मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. हा अहवाल सप्टेंबरमध्ये महापालिकेला सादर करण्यात येईल. दिल्लीतील सिस्ट्राईकॉम-इजिस-राईटस या संस्थेने हा डीपीआर तयार केला आहे. पहिल्या टप्यात मेट्रो पिंपरीपर्यंत धावणार होती. परंतु, मेट्रोचे काम वाढले असून एम्पायर इस्टेटच्या पुलापर्यंत गेले आहे. पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत सुरु करण्याची मागणी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी केली होती. त्यासाठी मोठे आंदोलन छेडले होते. त्यानंतर पालिकेने मेट्रोला निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी नाशिकफाटा ते चाकण या मार्गावरदेखील मेट्रोे प्रकल्पाचा ‘डीपीआर’ तयार करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने मेट्रोला या दोन्ही मार्गावरील डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी पुणे महामेट्रोला तब्बल 4 कोटी 31 लाख रूपये पिंपरी पालिकेने दिले होते.
Day 2 of BRTS chaos: Other vehicles trespass, buses try to find their way as traffic cops watch
The day after its launch, traffic movement on the Bus Rapid Transport System (BRTS) between Nigdi and Dapodi was far from smooth, as bus drivers remained confused, traffic police remained spectators and officials of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation struggled to manage the route. On Saturday, buses could be seen plying on the BRTS route, then moving out of the designated track, only to make their way back to it after some time.
Bus stop confusion dogs BRTS commuters on Day 1
Utter confusion marked the day one of the much delayed Bus Rapid Transit System (BRTS) service on Pune-Mumbai highway on Friday.
दीड महिन्यात शहरात प्रत्यक्ष पार्किंग पॉलिसी : आयुक्त हर्डीकर
पिंपरी-चिंचवड शहरात क्षेत्रीय कार्यालयनिहाय ‘पार्किंग पॉलिसी’ची अंमलबजावणी केली जाणार आहे. येत्या दीड महिन्यात प्रत्यक्ष ती कार्यान्वित होईल. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे वाहतूक रहदारीला शिस्त लागण्यास मदत होणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. पॉलिसी लागू झाल्यानंतर ठराविक रस्त्यावर वाहने लावण्यासाठी तासानुसार शुल्क द्यावे लागणार आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत सार्वजनिक सायकल प्रकल्पाचा प्रारंभ
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत एरिया बेस डेव्हलपमेंट प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत सार्वजनिक सायकल सुविधा प्रकल्पाचा प्रारंभ आज सकाळी कुंजीर क्रीडांगण कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर व त्यानंतर राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव येथे झाला. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपळे सौदागर ते पिंपळे गुरव पर्यंत सायकलने जात पर्यावरणाचा संदेश दिला
Abysmal traffic, potholes in Hinjawadi draw techies' ire
Pune: IT professionals commuting to and from the Hinjewadi I ..
इतके का आमच्या शहरात सुविधांचे उणे!
केंद्र सरकारने राहण्यायोग्य शहरांची यादी जाहीर केली. या यादीत शहर 69 व्या क्रमांकावर गेले. यास पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत सत्ताधारी भाजपने हात झटकले. तर विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपची सत्ता आल्यानंतर बेस्ट सिटीची वेस्ट सिटी झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला. सेेेनेेेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शहरातील गुंडगिरी, नियोजनशून्य कारभार, भ्रष्टाचार पाहता राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवडचा खालून पहिला नंबर यायला हवा होता, अशी तिखट प्रतिक्रिया दिली. मात्र पीछेहाट होण्याइतके का या शहरात सुविधांचे उणे आहे? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.महासाधू मोरया गोसावी यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या पिंपरी- चिंचवडने स्वातंत्र्य चळवळीत महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
प्राधिकरणाच्या मोकळ्या जागेवर महापालिका विकसीत करणार मैदाने, उद्याने
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा नाममात्र एक रुपया दराने घेण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. या जागेवर नागरी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्या जागांवर पालिका खेळाचे मैदान, उद्यान विकसित करणार आहे. प्राधिकरणाच्या जागा प्राधिकरण देणार असून गायरान जागा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळणार असून प्रक्रिया त्वरित केली जाणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.
अन् पुणे-नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवायला आमदार महेश लांडगे रस्त्यावर उतरले
पिंपरी (Pclive7.com):- आज सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. आज दुपारी पुणे-नाशिक मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अनेक नागरिक या कोंडीत अडकले होते. यावेळी बहिनींना आपल्या भावाला वेळेवर राखी बांधता यावी यासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे कार्यकर्त्यांचे वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे मदत कार्य सुरू होते. हा सर्व प्रकार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना समजताच ते स्वत: कुठलाच विचार न करता रस्त्यावर उतरले. त्यांनी केलेल्या या मदत कार्यामुळे अनेकांना रक्षाबंधनाचा सण वेळेवर साजरा करता आला. सध्या सोशलमिडीया आणि भोसरी परिसरात महेश लांडगे यांनी केलेल्या या मदत कार्याचे कौतुक होत आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक नियंत्रण कक्ष वाकडमध्ये
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वाहतुकीचे नियंत्रण वाकडमधून करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. त्यासाठी भुजबळ चौक येथील वाकड पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीची डागडुजी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.
केरळ पूरग्रस्तांना आमदार महेश लांडगे यांचा मदतीचा हात; दोन टन कांदा पाठवला
पिंपरी (Pclive7.com):- अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुराने उद्धवस्त झालेल्या केरळला देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी देखील केरळमधील बांधवांना मदतीचा हात दिला आहे. लांडगे यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी दोन टन कांदा पाठविला आहे. तसेच केरळ पूरग्रस्त बांधवांना आप-आपल्या परीने सर्वांनी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दापोडीत रंग नसलेले गतिरोधक ठरताहेत अपघाताचे कारण
जुनी सांगवी - दापोडी-सांगवी प्रमुख रस्ता व दापोडीतील अंतर्गत रस्त्यावर गतिरोधकांना पांढरे पट्टे नसल्याने असे गतिरोधक अपघाताचे कारण ठरत आहेत. दापोडी सांगवी रस्त्यावर एस.टी.कार्यशाळा वळणावर सांगवी व दापोडी दोन्ही बाजुने उतार रस्ता आहे. उतार रस्ता असल्यामुळे या वळणावर गतिरोधक करण्यात आलेला आहे. मात्र गतिरोधकाला पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालकांच्या हा गतिरोधक नजरेस येत नाही. परिणामी वेगात असणारी वहाने आदळुन गतिरोधक अपघाताचे कारण ठरत आहे.
स्वत:च तयार करा ‘इको फ्रेंडली बाप्पा’
पुणे - आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वत:च्या हाताने तयार करण्याची व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्याची संधी देणारी अभिनव कार्यशाळा ‘सकाळ’ने ९ सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे.
साथीच्या आजारांचा शहरवासीयांना “डंक’
प्रशासनावर ताण : “वायसीएम’मध्ये खाटांपेक्षा जास्त रुग्ण
पिंपरी – शहरातील बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया यासारख्या जीवघेण्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे, शहरातील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने खाटांची संख्या अपुरी पडत आहे. रुग्णालयातील काही विभागात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
महापालिकेतर्फे योगा एशियन चॅम्पीयनशीपच्या विजेत्यांना सात लाखांचे अर्थ सहाय्य
पिंपरी – सिंगापोरमध्ये 2017 मध्ये झालेल्या सातव्या योगा एशियन स्पोर्टस चॅम्पीयनशीप स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना महापालिकेतर्फे सात लाखांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या क्रिडा,कला,साहित्य व सांस्कृतीक समिती समोर ठेवण्यात आला आहे.
नागरवस्ती योजना विभागामार्फत नवीन तीन विभाग
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती योजना विभागामार्फत महिला व बाल कल्याण, समाज कल्याण आणि इतर विविध कल्याणकारी योजनांची सक्षमपणे वेळेत अंमलबजावणी होत नाही.
पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन
पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांचे सण उत्साही वातावरणात साजरे व्हावेत यासाठी पोलीस आपले कर्तव्य बजावत असल्याचे मत पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी चिंचवडगाव येथे व्यक्त केले.
डाई-ईची कंपनीच्या स्थलांतरास कामगारांचा विरोध
पिंपरी (Pclive7.com):- पुणे मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील डाई-ईची कंपनीचे व्यवस्थापनाने बेकायदेशीररीत्या स्थलांतर सुरु केले आहे. याला कंपनीतील कामगारांनी तीव्र विरोध केला असून, शनिवार दि.२५ ऑगस्ट पासून कंपनी प्रवेशव्दारासमोर हिंद कामगार संघटनेच्या (इंटक) वतीने ठिय्या आंदोलन इंटकचे जिल्हा अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहे.
पिंपरीत स्वाइन फ्लूमुळे ११ दिवसांत पाच जणांचा मृत्यू
स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना डॉक्टरांनी सूचना केल्या आहेत. सर्दी, खोकला, ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्यामुळे पुढील उपचार घेता येतात, असे डॉक्टरांनी सांगितले.
1 सप्टेंबरपासून मीटरचे रिडिंग मोबाईलवर
ग्राहकांना अवघ्या दोन ते तीन दिवसांत वीजबील होणार उपलब्ध
पुणे : ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी महावितरण प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 1 सप्टेंबरपासून वीज ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग मोबाईलवर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना अवघ्या दोन ते तीन दिवसांच्या आत वीजबील उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय ग्राहकांना त्यांच्या बिलांची माहिती त्यांच्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून तातडीने मिळणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त वल्लभनगरमधून जादा गाड्या
कोकणात जाणार्या प्रवाशांची
पिंपरी : गौरी-गणपती सणाला कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी एसटीच्या पिंपरी-चिंचवड आगारातर्फे या वर्षीही 58 जादा गाड्यांची सोय करण्यात येणार आहे. चिपळूण, रत्नागिरी, दापोली, खेड, रत्नागिरी, गुहागरसाठी 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान जादा गाड्या वल्लभनगर आगारातून सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती वल्लभनगर आगाराचे व्यवस्थापक एस.एन.भोसले यांनी दिली. उद्योगनगरीच्या पिंपरी, ककाळेवाडी, आकुर्डी, निगडी, भोसरी भागात कोकणवासीयांची संख्या मोठी आहे. दरवर्षी गणपतीला ते आवर्जून गावी जातात. गणेशोत्सवास यावर्षी 13 सप्टेंबरपासून सुरवात होत आहे; तर गणपती प्रतिष्ठापना झाल्यानंतर तीन दिवसांनी गौरींचेही आगमन होत असते. त्यासाठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीच्या पिंपरी-चिंचवड आगारातून करण्यात आले आहे. आगारातून दरवर्षी 50 टक्के गाड्या या कोकण विभागासाठीच सोडल्या जातात. मात्र, गौरी-गणेशोत्सवात या गाड्यासुद्धा प्रवाशांना कमी पडतात. त्यामुळे यंदा सोडण्यात येणार्या जादा गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.
अनधिकृतपणे दिलेले वीजजोड त्वरित काढून घ्यावेत
राहुल कोल्हटकर यांनी केली मागणी
भोसरी : मोशी येथील नवीन आर.टी.ओ. कार्यालयाशेजारी प्रिव्हिया बिझनेस सेंटर या व्यावसायिक इमारतीला अनधिकृतपणे वीजजोड देण्यात आलेले आहेत. अनधिकृत कनेक्शन त्वरित काढून टाकण्याची मागणी महावितरणच्या संबंधित अधिकार्यांकडे केली. मात्र तक्रार मागे घेण्याबाबत दबाव आणला जात आहे, असे आरोप विद्युत वितरण समितीचे सदस्य राहुल कोल्हटकर यांनी केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत आमदार बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
रेल्वेचा मोठा निर्णय : १ सप्टेंबरपासून ‘ही’ सुविधा होणार बंद
नवी दिल्ली – ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवेमध्ये भारतीय रेल्वेने मोठा बदल करण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच १ सप्टेंबरपासून फ्रीमध्ये मिळणारा विमा बंद करण्यात येणार आहे. हा विमा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास दिला जात होता. आता हा विमा प्रवाशांना स्वतः भरावा लागणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)