MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 2 May 2018
PCMC asks social groups to contribute to annual environment status report
Pimpri Chinchwad: The civic body has invited social groups to contribute to this year’s environment status report to be submitted on July 31 by giving suggestions.
Waste to energy plant at Moshi gets PCMC green light
PIMPRI CHINCHWAD: The general body meeting of Pimpri Chinchwad Municipal Corporation on Friday approved the waste to energy plant at Moshi garbage depot following a detailed presentation by municipal commissioner Shravan Hardikar.
Smart city board's nod to pilot projects in Pimpri Chinchwad
The Pimpri Chinchwad Smart City Limited (PCSCL) on Monday approved the implementation of pilot projects in the city.
कंत्राटी कामगारांचे शोषण; ठेकेदार गब्बर
औद्योगिकनगरीत सुमारे पावणे दोन लाख कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांना शासनाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. मालक आणि कंत्राटदारांकडून कामगारांची पिळवणूक केली जात आहे. याविरोधात आवाज उठविल्यास त्यांना कामावरून काढले जात आहे. त्यामुळे शहरातील कंत्राटी कामगार वार्यावर आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे पाच लाख कामगार आहेत. यामध्ये पावणे दोन लाख कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. पूर्वी कायमस्वरूपी कामगार निवृत्त झाल्यावर त्यांच्या वारसाला कामावर घेतले जात असे; मात्र सध्या कंत्राटी कामगारांची भरती करून त्यांची पिळवणूक केली जात आहे. कंत्राटदाराकडून कामगारांचा इएसआय, भविष्यनिर्वाह निधींची काही रक्कम कापून घेतली जाते. ती संबंधीत विभागाकडे जमा करणे गरजेचे असते; मात्र कंत्राटदाराकडून ती रक्कम भरलीच जात नाही. याबाबत मालकाने कामगार आयुक्तांकडे तक्रार करणे गरजेचे आहे. मात्र, मालकाकडूनही दखल न घेतली गेल्याने कंत्राटदारांवर कारवाई केली जात नाही.
सौरऊर्जा निर्मिती, ई-लर्निंग, बायसिकल शेअरिंगला मंजुरी
पिंपरी-चिंचवड शहरात एरिया बेस डेव्हल्पमेंट प्रकल्पाअंतर्गत (एबीडी) सौरऊर्जेची निर्मिती, पालिकेच्या शाळांत ई-लर्निंग आणि पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प राबविण्यास पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्यता देण्यात आली. मंडळाची चौथी सभा सोमवारी (दि.30) आयुक्त दालनात झाली. अध्यक्षस्थानी डॉ. नितीन करीर होते. यावेळी महापौर नितीन काळजे, मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, प्रमोद कुटे, पोलिस अधिकारी अशोक मोराळे, पीसीएससीएलचे आर. पी. सिंग, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी राजेश लांडे उपस्थित होते.
स्मार्ट सिटी अॅडव्हायजरी फोरम स्थापनेस मान्यता
स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्प व योजनांवर चर्चा करून सल्ला व सूचना देण्यासाठी स्मार्ट सिटी अॅडव्हायजरी फोरम स्थापनेस (स्थानिक सल्लागार समिती) पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या फोरममध्ये शहरातील सर्व खासदार व आमदारांचा समावेश असणार आहे. स्मार्ट सिटीची बैठक सोमवारी (दि.30) झाली. स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग असावा, या उद्देशाने शहर पातळीवर अॅडव्हायजरी फोरम स्थापन करण्यात येणार आहे. हा फोरम स्मार्ट सिटीतील नियमानुसार स्थापन केला जाणार आहे
चिखले, कुटे अखेर अंमलबजावणी समितीत
पिंपरी – स्मार्ट सिटीच्या कामाला गती देण्यासाठी स्थापन केलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीमध्ये मनसेचे सचिन चिखले व सेनेच्या प्रमोद कुटे या दोन्ही संचालकांना डिच्चू देत सत्ताधारी भाजपने कुरघोडी केली होती. मात्र, त्यावरून आरोप झाल्यानंतर अखेर या दोघांना या समितीत घेण्याचा निर्णय आज (सोमवारी) स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
ACB grants clean chit to Eknath Khadse in Bhosari land scam
The Maharashtra Anti Corruption Bureau (ACB) on Tuesday granted clean chit to Former Minister and Bharatiya Janata Party (BJP) leader Eknath Khadse, in an alleged Bhosari land scam, official sources said.
Hinjawadi-Shivaji Nagar Metro project in Pune likely to face delay
Marred with hurdles relating to land acquisition for Metro car sheds, completion of the proposed Hinjewadi-Shivajinagar Metro line is likely to be delayed. Officials from the Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA), which is in charge of construction of the Metro line, said that they are consistently engaging themselves in a process of dialogue with all stake holders of the respective areas to resolve the issue. They added that they are hopeful of clearing all the hindrances shortly, but clarified that the on-field work of the Metro project will not begin as early as expected.
डिजीटल स्वाक्षरी असलेला सातबारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून काल (दि.१ मे) महसूल विभागाच्या वतीने आयोजित डिजीटल स्वाक्षरीयुक्त सातबाराचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. सातबारा डिजीटाझेशनमुळे जमिनीच्या नोंदणीतील गैरव्यवहाराला आळा बसणार असून संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच, संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरी असलेला सातबारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असणार आहे.
पीएमपीएमएलच्या ताफ्यात येणार 500 ई-बस ?
खरेदीबाबत स्मार्ट सिटीच्या बैठकीत चर्चा
स्मार्ट सिटी कंपनीनी उभारणार चार्जिंग स्टेशन्स
स्मार्ट सिटी कंपनीनी उभारणार चार्जिंग स्टेशन्स
बालाजीनगरमध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर
भोसरी- बालाजीनगर झोपडपट्टी येथे घरोघरी शौचालय बांधले असूनही चेंबर तसेच ड्रेनेज लाईनची अजूनही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व घाण रस्त्यावरून वाहत आहे. “शौचालय असून अडचण नसून खोळंबा’ ही अवस्था निर्माण झाली आहे.
जादा प्रवास भाडे आकारणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांची करा थेट तक्रार
चौफेर न्यूज – खासगी प्रवासी वाहने सणासुदी, सुट्यांच्या काळात राज्यातील तिकीट दर वाढवून प्रवाशांची सर्रास लूट करतात. अव्वाच्यासव्वा प्रवास भाडे प्रवाशांची अडवणूक करून आकारणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांना आता चाप लावला जाणार आहे. राज्य शासनाने मनमानी पद्धतीने तिकिटाचे पैसे घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे
थेरगावकरांना रखरखत्या उन्हात पावसाचा आनंद
येथील थेरगाव-डांगे चौक रस्त्यावर जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला. भर रस्त्यावर पाण्याचे ऊंचच्या-उंच फवारे उडत असल्यामुळे थेरगावकारांना रखरखत्या उन्हात पावसाचा आनंद घेता आला.
सामाजिक कार्यातून मानसिक समाधान – डॉ. प्रकाश आमटे
पिंपळे सौदागर येथे उन्नती सोशल फाऊंडेशनचे उद्घाटन
निर्भीडसत्ता न्यूज –
सामाजिक कार्यातून मानसिक समाधान मिळते. हे समाधान तुमच्याजवळ किती ही धनसंपदा असली तरी मिळू शकत नाही. पैशाने आयुष्य मिळमिळीत होते. आपण विविध क्षेत्रात कार्यरत असताना कितीही धावपळ, स्पर्धा असली तरी सामाजिक कार्यासाठी थोडावेळ राखून ठेवला पाहिजे. मानसिक समाधानातून तणाविरहित जीवन जगण्यास मदत होते. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेता येतात. शिवाय अशा प्रयत्नांमधून समाजातील दरी कमी होण्यास मदत होते, असे मत पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यातून मानसिक समाधान मिळते. हे समाधान तुमच्याजवळ किती ही धनसंपदा असली तरी मिळू शकत नाही. पैशाने आयुष्य मिळमिळीत होते. आपण विविध क्षेत्रात कार्यरत असताना कितीही धावपळ, स्पर्धा असली तरी सामाजिक कार्यासाठी थोडावेळ राखून ठेवला पाहिजे. मानसिक समाधानातून तणाविरहित जीवन जगण्यास मदत होते. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेता येतात. शिवाय अशा प्रयत्नांमधून समाजातील दरी कमी होण्यास मदत होते, असे मत पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
Subscribe to:
Posts (Atom)