पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाहतूक विभागाकडून विविध ठिकाणी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ठराविक वेळेत हे बदल असणार आहेत. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. हे सर्व बदल प्रायोगिक तत्वावर (२४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर) सुरू करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाने केलेल्या बदलांबाबत नागरिकांना काही हरकती अथवा सूचना असतील तर त्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे लेखी स्वरूपात जमा करण्याचे आवाहन, वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 25 September 2018
[Video] पिंपरी चिंचवडच्या गॅरेजचालकाने बनवलं भारतीय जवानांसाठी हेलीकॉप्टर
एकच नंबर !! पिंपरी चिंचवडच्या गॅरेजचालकाने बनवलं भारतीय जवानांसाठी हेलीकॉप्टर!
Metro work in Range Hills, Khadki with MoD’s nod
MahaMetro will start constructing pillars and the station in ..
रिक्षा संघटनेचे केंद्रीय परिवहन मंत्र्यांना साकडे
पिंपरी – इलेक्ट्रॉनिक रिक्षांना केंद्र सरकारने परवानगी दिली असून या रिक्षांना परवान्याची आवश्यकता राहणार नाही, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. मात्र, हे परवाने वाटप करताना रिक्षा चालकांना विश्वासात घ्या, अशी मागणी रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाने गडकरी यांच्याकडे केली आहे. त्याबरोबर विविध मागण्यांचे निवेदन गडकरी यांना सादर केले. या शिष्टमंडळात दिल्ली रिक्षा टॅक्सी संघटनेचे नेते राजेंद्र सोनी, अचल सिंग, मधुकर थोरात, मारुती कोंडे, मोशवीर लोकरे, सुनील बोर्डे, विजय पाटील, श्रीरंग जाधव यांचा समावेश होता.
…अन्यथा क प्रभागाला टाळे ठोकणार
पिंपरी – गेली महिनाभरापासून बालाजीनगर परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. दो दिवसांत यात सुधारणा न झाल्यास क प्रभाग कार्यालयाला “टाळे ठोको’ आंदोलनाचा इशारा बहुजन सम्राट सेनेने दिला आहे.
बालाजीनगरची सुमारे दहा हजार लोकवस्ती आहे
बालाजीनगरची सुमारे दहा हजार लोकवस्ती आहे
नागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार
फुलेनगर येथे नागरी सुविधा केंद्र सुरू; पक्षनेते पवार यांच्या हस्ते उद्घाटन
नागरिकांना घराजवळ पालिकेच्या सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे पालिकेतील हेलपाटे कमी व्हावेत. त्यांना सर्व प्रकारचे दाखले सहजरित्या उपलब्ध व्हावेत. त्यांची पालिकेशी निगडीत कामे झटपट व्हावीत, यासाठी नागरी सुविधा केंद्र लाभदायक ठरणार आहे, असे प्रतिपादन महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले.
नागरिकांना घराजवळ पालिकेच्या सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे पालिकेतील हेलपाटे कमी व्हावेत. त्यांना सर्व प्रकारचे दाखले सहजरित्या उपलब्ध व्हावेत. त्यांची पालिकेशी निगडीत कामे झटपट व्हावीत, यासाठी नागरी सुविधा केंद्र लाभदायक ठरणार आहे, असे प्रतिपादन महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले.
'त्या' बदल्या बेकायदा
शहर आणि ग्रामीण पोलिसदलाचे विभाजन करून नव्याने कार्यान्वित झालेल्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयासाठी कर्मचारी-अधिकारी आणि सरकारी वाहने देण्यावरून वाद सुरू असतानाच, आता पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय विरुद्ध पुणे शहर व ग्रामीण पोलिस असा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. पिंपरी आयुक्तालय कार्यान्वित होण्याच्या पूर्वसंध्येला करण्यात आलेल्या बदल्या बेकायदा असल्याचा थेट पवित्रा पिंपरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. 'पुण्यात जाऊ नका. माझा तुमच्यावर वॉच आहे', अशा शब्दांत पोलिसांना जाहीर तंबी देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील ५ घाटांवर ४३ हजार मूर्तीदान
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील विविध घाटांवर गणेश भक्तांना मूर्तीदान करण्यासाठी प्रेरित करून त्याद्वारे ४३ हजार १२३ मूर्त्यांचे दान जमा केले. हा उपक्रम संस्कार प्रतिष्ठान, टाटा व्होलेंटीअरिंग टाटा मोटर्स पुणे आणि डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्स अँड रिसर्च पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पाच विसर्जन घाटांवर राबविण्यात आला. तसेच या उपक्रमांतर्गत तब्बल ३५ टन निर्माल्य जमा करण्यात आले.
चिंचवडमध्ये हजारों गणेशभक्तांनी घेतला ‘नमो चहा’ सेवेचा लाभ
पिंपरी (Pclive7.com):- गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या… या जयघोषात शहरात सर्वत्रच गणरायाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. चिंचवड येथे बाप्पांच्या या विसर्जन मिरवणूकीत आलेल्या गणेशभक्तांसाठी ‘नमो चहा’ सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. या सेवेचा तब्बल १० हजार भाविकांनी लाभ घेतला असल्याची माहिती आयोजक भाजपाचे नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे यांनी दिली.
पोलिसांना ‘घरचा डबा’
वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस मित्रांना चिंचवड येथील प्रतिष्ठानने ‘घरचा डबा’ देण्याचा उपक्रम राबविला.
चिंचवडमध्ये साडेदहा तास विसर्जन सोहळा रंगला
चिंचवड - फुलांची उधळण, ढोल-ताशांचा दणदणाट,थिरकणारी तरुणाई, "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' अशा भक्तिमय वातावरणात रविवारी भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. गेल्या तीन वर्षापासूनची डिजे आणि गुलालविरहीत मिरवणुकीची परंपरा यंदाही कायम होती. तब्बल साडेदहा तास विसर्जन मिरवणुकीचा सोहळा रंगला. विविध मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सामाजिक तसेच शैक्षणिक विषयांवर देखावे केले होते. त्याची ही चित्रमय झलक. (छायाचित्रे - अरुण गायकवाड)
पिंपळे गुरव परिसरात डीजेचे पोलिसांकडून विसर्जन...
नवी सांगवी ( पुणे ) - डिजेचा थयथयाट नसल्यामुळे यंदा पिंपळे गुरवची विसर्जन मिरवणूक वैशिष्ठपुर्ण ठरली. डीजे अभावी गणेश मंडळांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांचा हिरमोड निश्चित झाला असला तरी सामान्यांनी मात्र समाधान व्यक्त करीत सुटकेचा निश्वास टाकला. सांगवी पोलिसांच्या कडक, ठाम आणि नियोजनबध्द निर्णयामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणूकीतून डीजे या कर्कश: ध्वनीयंत्रेनेचे विसर्जनच झाले असे म्हणावे लागेल.
जिल्ह्यातील साडेचार लाख कुटुंबांना ‘आयुष्मान’चे कवच
रामदास आठवले, गिरीश बापट यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप
पुणे – केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. दरम्यान, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एकूण 4 लाख 57 हजार 28 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करून घेतले जाणार आहे.
प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ
चिंचवड – भारतीय रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने चिंचवड रेल्वे स्थानक व परिसराची स्वच्छता व स्वच्छता शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चिंचवड स्टेशन येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली. रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णा पाटील यांनी ही शपथ दिली. कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या सुचनेनुसार मध्य रेल्वेच्या आवाहनानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपप्राचार्या वनिता कुऱ्हाडे, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, मध्य रेल्वे विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एस. के. दास, संजीव सोन्ना, चिंचवड रेल्वे स्थानक प्रमुख ए. एम. नायर, उपप्रमुख अमित कुमार आदी उपस्थित होते. प्रा. जस्मीन फरास, प्रा. वैशाली देशपांडे, प्रा. तृप्ती बजाज, प्रा. अश्विनी तंटक, प्रा. समीता शिंदे, प्रा. प्रगती कलंबे, प्रा. नितू चव्हाण, ब्रिजेश देशमुख, प्रा. सुरेखा कुंभार, प्रा. मच्छिंद्र सोनावणे, प्रा. प्रज्ञा गुजराती, प्रा. सोनाली निकम, रेल्वे कर्मचारी मनोहर वडके, अनिल कदम आदींनी संयोजन केले.
Subscribe to:
Posts (Atom)