Sunday, 12 April 2020

Voluntary containment in PCMC fringes


PCMC’s overnight decision to close facilities puzzles people


State labour minister orders investigation into complaints of job loss in IT sector


केंद्रीय पथकाकडून रुग्णालयांची पाहणी


नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरातील कामगिरीनुसार मूल्यमापन

शिक्षण विभागाकडून राज्य सरकारला प्रस्ताव

हजारो बांधकाम कामगारांना मिळणार “दोन वेळ’चे जेवण

पिंपरी (प्रतिनिधी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून व्यक्त केलेली नाराजी, कामगार आयुक्तांचे सतत टोचलेले कान तसेच बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी घरातच राहून उपोषणाचे उपसलेले हत्यार यांमुळे हजारो बांधकाम कामगारांना आता दोनवेळचे जेवण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

बोपखेलमधील मुख्य रस्ता बंद

बोपखेल  (वार्ताहर) – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बोपखेलमधील तरुण आणि ग्रामस्थांनी बाहेरून येणाऱ्या वाहनांना व नागरिकांना बोपखेलमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. तरीदेखील काही वाहने व नागरिक वेगवेगळी कारणे सांगून बोपखेलमध्ये येत असल्याचे ग्रामस्थाच्या लक्षात आल्याने नागरिकांनी मिळून बोपखेलमध्ये येणारा एकमेव मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. 

घरकुलमधील कुटुंबांवर उपासमारीची वेळ

चिखली (वार्ताहर) – चिखली येथील घरकुलमध्ये करोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना रेशनही मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. येथील तब्ब्ल पाच हजारांहून अधिक कुटुंबे ही दैनंदिन रोजगाराची कामे करून उदरनिर्वाह करीत होती. हातचे काम गेल्यामुळे येथील नागरिकांनी किमान रेशन तरी मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

“लॉकडाऊन’ मागे घेतल्यानंतरच होणार “एच.ए.’च्या जागेचा लिलाव

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरीतील हिंदुस्थान ऍण्टीबायोटिक्स (एचए) कंपनीच्या ताब्यातील 87.7 एकर जागेचे मुल्यांकन राष्ट्रीय बांधकाम निर्माण महामंडळाकडून (एनबीसीसी) करण्यात येणार होते. मात्र लॉकडाउन सुरू असल्याने हे काम थांबविण्यात आले असून लॉकडाउन मागे घेतल्यानंतर संबंधित जमिनीची विक्री करण्यासाठी लिलाव केला जाणार आहे. या लिलावात खासगी क्षेत्रालाही संधी मिळू शकणार आहे.

दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी परिसर “सील’

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – दापोडी परिसरात शुक्रवारी (दि. 10) करोनाबाधित रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दापोडी, फुगेवाडी व कासारवाडी परिसर शनिवार ते मंगळवार (दि.11 ते 14) असा चार दिवस सील करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाने घेतला आहे. 

मुंबई, पुणे आणि ठाणे रेड झोनमध्ये, आरोग्य मंत्र्यांनी दिला ‘हा’ इशारा

कोरोनाचा महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाऊनही वाढवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले देशातच कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन देशात ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे रेडझोनमध्येच असतील. त्या ठिकाणी लॉकडाऊनचं पालन करावं लागेल. हे पालन योग्य पद्धतीने झालं नाही तर लॉकडाऊन आणखी वाढवावा लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. तसेच मेट्रो सिटीमध्ये याचे योग्य प्रकारे पालन होत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर

एमपीसी न्यूज – कोरोना साथरोग नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे. जनतेने रेशनिंग संदर्भातील तक्रारी आणि माहिती मिळविण्यासाठी 1800224950 किंवा 1967 या नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे. लॉकडाऊन कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन बाबतीत जनतेत जागरूकता निर्माण करण्याची […]b

कोरोनामुळे पुणे विद्यापीठ सील

पुणे : 'कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठाचा परिसर पूर्ण सील केला आहे. विद्यापीठ आवारात रहाणाऱ्यांना या परिसराच्या बाहेर जाण्यावर मर्यादा आणल्या आहेत.  शुक्रवारपासून (ता. १०) विद्यापीठाचे प्रवेशद्वार पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले आहेत.  

पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी तीन नवीन पाॅझिटिव्ह; आकडा पोहचला 29 वरn

पिंपरी : कोरोना संसर्ग झालेल्या शहरातील रुग्णांमध्ये गेल्या सोळा तासात तिघांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 29 झाली आहे. त्यातील 12 जण बरे होऊन यापुर्वीच घरी पोचले आहेत. दरम्यान, शहरातील पाॅझिटीव्ह व्यक्तींची संख्या गेल्या पाच-सहा दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. चार एप्रिल रोजी रात्री पाच जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्यामुळे उपचार घेत असलेल्यांची संख्या आठ झाली होती. त्यात गेल्या पाच दिवसात तब्बल नऊने वाढ झाली आहे.  

आयुष डॉक्टरांना कोविड 19 बाबत ऑनलाईन प्रशिक्षण; पिंपरीत ७० टक्के डॉक्टरांचा सहभाग

पिंपरी : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनतर्फे आयुष डॉक्टरांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड मधील 1400 निमा डॉक्टरांपैकी जवळपास 70 टक्क्यांहून अधिक डॉक्टरांनी हे प्रशिक्षण आतापर्यंत पूर्ण केले आहे. राज्यातील कोरोनाचा उद्रेक पाहता आयुष डॉक्टरांची मदत भासू शकते. हे लक्षात घेऊन राज्यभरातील आयुष डॉक्टर हे ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहेत. 

सिंधी समाज संस्थेच्या वतीने विविध ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन

पिंपरी - सिंधी भाषा दिनानिमित्त अखिल भारतीय सिंधी समाज संस्थेच्या वतीने मंगळवारी (ता. 14) विविध ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 

साहेब, घरातील रेशन संपलेय, साहित्य नाही' ...

पुणे : 'साहेब, आमच्या घरातील रेशन संपलेय, काहीच किराणा सामान नाही, मदत पाहिजे.... असे एक नव्हे तर शेकडो फोन जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षात खणखणत आहेत. गेल्या दहा दिवसांत दीड हजाराहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनातील अधिकारीही त्याची तत्परतेने नोंद घेत स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या स्थलांतरित मजूर कामगारांच्या तक्रारी सोडवीत असल्याचे आशादायक चित्र सध्या दिसून येत आहे.

भोसरी, दिघी परिसरात कडक संचारबंदी लागू

भोसरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरी, दिघी परिसरातील काही भाग सील केल्याने परिसरात शुकशुकात होता. महापालिका आणि भोसरी, दिघी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांनी शुक्रवारी (ता. १०) रात्री साडे अकरा पर्यंत पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे महापालिकेद्वारे सील केलेल्या भागात प्रतिबंधीत क्षेत्र असल्याचे फ्लेक्स लावून नागरिकांमध्ये जनजागृती केली. 

पिंपरी - चिंचवड शहरात सर्व प्रकारच्या औषधांचा साठा आणि पुरवठा सुरळीतB

पिंपरी - शहरात सर्व प्रकारच्या औषधांचा साठा आणि पुरवठा सुरळीत सुरु आहे. मात्र लॉकडाऊनमुळे पुरेशा मनुष्यबळाअभावी काही प्रकारची जंतुनाशके शहराच्या सर्व भागात त्याचा पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. 

जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक अडवू नये : विभागीय आयुक्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत अन्नधान्य, भाजीपाला पुरवठा सुरळीत सुरु राहण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पासेस देण्यात येत असून, त्यांना पोलिसांनी अडवू नये, अशा सूचना विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिल्या

Video : पीपीई कीट परिधान करून चोरट्यांनी मारला किराणा, मेडिकल दुकानात डल्ला

पिंपरी - 'लॉकडाउन'मुळे पावलोपावली तैनात असलेल्या पोलिसांच्या तावडीत सापडू नये, यासाठी चोरट्यांनीही वेगळीच शक्कल लढविल्याचे रावेत येथील चोरीच्या घटनेत पहायला मिळाले. दोन चोरट्यांनी चक्क डॉक्‍टरांचे पीपीई कीट परिधान करून किराणा व मेडिकल दुकानात डल्ला मारला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  

महेंद्रा कंपनीकडून पोलिसांना गस्तीकरिता दहा मोटारी

पिंपरी (प्रतिनिधी) – पोलिसांना वाहनांअभावी प्रभावी गस्त घालता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन महेंद्रा कंपनीने दहा मोटारी पोलिसांना गस्तीकरिता दिल्या असल्याची माहिती पोलीस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांनी दिली.