कोजागिरी पोर्णिमेचा नागरिकांना आनंद घेता यावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेची उद्याने आज रात्री १ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.
शहरातील नागरिकांना कोजागिरी पोर्णिमा साजरी करण्यासाठी दरवर्षी महापालिकेची उद्याने रात्री उशिरापर्यंत खुली ठेवली जातात. महापालिकेची शहरात १०५ उद्याने आहेत. नागरिकांना आज कोजागिरी पोर्णिमेचा आनंद घेता यावा यासाठी महापालिकेची उद्याने रात्री १ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्यान विभागाने दिली आहे.