Tuesday, 3 July 2018

Managing director of Maha-Metro exclusively for HT: Vision 2021

For such a large urban conglomerate, with a population nearing 65 lakh, the need for an efficient mass rapid transit system (MRTS) needs no emphasis; therefore, the central and state government-approved Phase I of Pune Metro railway project in December 2016

Brijesh Dixit, managing director, Maha-Metro . (Illustration: Shrikrishna Patkar)

Buildings in blue line areas to be regularized

Pimpri Chinchwad: In a relief to numerous residents living in demarcated blue line areas, the state urban development department has directed the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to regularize constructions along the river banks under the Maharashtra Regional Town Planning Act.

शहराचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी "व्हीजन' गरजेचे : हर्डीकर

पिंपरी (पुणे) : "शहराच्या चिरंतन व चिरस्थायी विकासासाठी प्रयत्न व्हायला हवे. शहराचे जागतिक पातळीवर स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी "व्हीजन' निश्‍चित करावे लागेल. शहर विकास व नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी वैयक्तिक जबाबदारी स्वीकारावी. शहराचे 2030 पर्यंतचे नियोजन करून त्यानुसार कार्य करण्यासाठी तत्पर राहावे'', अशा सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

हॅरीस पूल अखेर भाजपकडून खुला

पिंपरी – दापोडीतील हॅरीस पुलाला समांतर पुलाच्या उद्‌घाटनास विलंब होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने रमजान ईदचा मुहुर्त साधून खुला केलेला पूल पिंपरी-चिंचवड महापालिकेने बंद केला होता. त्यावरुन टिकेची झोड उठल्यानंतर अखेर भाजपने सतरा दिवसानंतर आज (सोमवारी) या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासाठी हे उद्‌घाटन लांबणीवर टाकले असताना अद्यापही त्यांची वेळ न मिळाल्याने भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्‌घाटन उरकते घेण्यात आले.

“स्मार्ट सिटी’चा प्रवास निधीअभावी “ब्रेक डाउन’

पिंपरी – केंद्रातील भाजप सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या “स्मार्ट सिटी’ योजनेला तीन वर्षे पूर्ण झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा योजनेतील तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला. त्याला 25 जून 2018 रोजी एक वर्ष पूर्ण झाले. महापालिकेला एका वर्षात दोनशे कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असताना केंद्र व राज्याचा केवळ 27 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे तुटपुंज्या निधीमुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी योजनेचा खेळखंडोबा झाला असून, अद्याप “एरिया बेस डेव्हलमेंट’ आणि “पॅन सिटी’च्या निविदा प्रक्रियेत “स्मार्ट सिटी’ची कंपनी अडकली आहे. त्यामुळे वर्षभरानंतर स्मार्ट सिटी योजनांच्या कामांना गती मिळत नसल्याचे दिसत आहे.

वास्तू विशारद नेमणुकीचा घाट

पिंपरी – महापालिकेत विविध विकास कामांसाठी वास्तुविशारदांची नेमणूक करण्याचा घाट घालण्यात आला आहे. इमारत बांधकाम, लॅण्डस्केपिंग, इंटेरिअर डिझायनिंग अशा कामाच्या प्रकारानुसार 50 लाखापासून 10 कोटीच्या पुढील खर्चाच्या कामांसाठी वास्तुविशारदांची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 37 वास्तुविशारदांनी महापालिकेकडे नोंदणी केली आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात 13 वास्तुविशारदांना पॅनेलवर घेण्यात येणार आहे.

Watch Out! These Are The Most Dangerous Junctions In City

Pune’s traffic problems are mounting by the day, with accidents, many fatal, happening daily. Despite regular appeals to drivers to follow the rules, they frequently fail to do so and end up in accidents.

City Traffic Junctions

Cab aggregators mull safety steps for women commuters

PUNE: Cab aggregators Ola and Uber are likely to introduce some fresh security measures in the light of recent incidents of molestation and assault on women passengers travelling in ride hailing taxis.

डिजिटल मीडिया अधिक फायदेशीर: आमदार लक्ष्मण जगताप

डिजिटल मीडिया अधिक फायदेशीर: आमदार लक्ष्मण जगताप
सिंहासनचे शानदार प्रसारण

पिंपरी, २ जुलै : पिंपरी चिंचवड शहरातून प्रसारित होणार्या सिंहासन या बातम्यांच्या पोर्ट्लचे सोमवारी(ता.२ जुलै) सायंकाळी शानदार प्रसारण सुरू झाले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते क्लिक करून पोर्ट्लचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे प्रदेश संघट्क गोविंद घोळवे, सत्तरूढ पक्षनेते एकनाथ पवार, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले उपस्थित होते.

माध्यमांनी विश्वासर्हता जपावी: खासदार श्रीरंग बारणे

माध्यमांनी विश्वासर्हता जपावी: खासदार श्रीरंग बारणे
सिंहासनचे शानदार प्रसारण

पिंपरी, २ जुलै : पिंपरी चिंचवड शहरातून प्रसारित होणार्या सिंहासन या बातम्यांच्या पोर्ट्लचे सोमवारी(ता.२ जुलै) सायंकाळी शानदार प्रसारण सुरू झाले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते क्लिक करून पोर्ट्लचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे प्रदेश संघट्क गोविंद घोळवे, सत्तरूढ पक्षनेते एकनाथ पवार, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले उपस्थित होते.

अखेर वारकऱ्यांना भेटवस्तूचा निर्णय झालाच; ताडपत्री किंवा तंबू देण्यास गटनेत्यांच्या बैठकीत ‘शिक्कामोर्तब’

पिंपरी (Pclive7.com):- गेल्या काही दिवसांपासून वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला चांगलेच धारेवर धरले होते. भेटवस्तू देण्याची परंपरा बंद करणारे भाजपवाले नास्तिक असल्याचा आरोप देखील होत होते. सर्वच स्तरातून होत असलेल्या टिकेमुळे सत्ताधाऱ्यांनी आज सर्व गटनेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत वारकऱ्यांना भेटवस्तू देण्यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रशासकीय स्तरावर शक्य न झाल्यास सर्व नगरसेवकांच्या मानधनातून ताडपत्री किंवा तंबू ही उपयोगी असणारी वस्तू वारकऱ्यांना भेट स्वरूपात देण्याचा निर्णय झाला असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी यावेळी जाहिर केले.

स्वाइन फ्लू, मलेरिया नियंत्रणात

पिंपरी - शहरामध्ये सध्या स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी साथीच्या आजारांचे रुग्ण घटले आहेत. डेंगीच्या संशयित रुग्णांमध्ये मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते जून या ६ महिन्यांच्या कालावधीत डेंगीचे १६८ संशयित रुग्ण आढळले होते. तर, यंदा याच कालावधीत २२८ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांबाबत प्रामुख्याने दक्षता घेण्याची गरज आहे. 

#SaathChal पाचशे फिरती स्वच्छतागृहे

देहू - संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या हजारो भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी देहू ग्रामपंचायत सज्ज झाली आहे. पालखी प्रस्थानाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने देऊळवाडा, पालखी मार्ग आणि गाथा मंदिर परिसरातील १५० अतिक्रमणे हटविली आहेत. त्यामुळे पालखीमार्ग रुंद झाले आहेत, तर इंद्रायणी नदीचा घाट स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी रात्रंदिवस झटत आहे. देहूतील विविध ठिकाणी ५०० फिरती स्वच्छतागृह सोमवारी ठेवण्यात आली.

सांगवी, पिंपळे गुरव परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव

नवी सांगवी (पुणे) : सांगवी पिंपळे गुरव परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. दिवसरात्र ही भटकी कुत्री परिसरात फिरून अस्वच्छता तर पसरवित असतातच परंतु पहाटे व रात्रीच्या वेळेस फिरणाऱ्या पादचारी व दुचाकीस्वारांच्या अंगावर अचानक धावुन जाऊन छोट्यामोठ्या अपघातांना कारणीभूत ठरतात. 

भेटवस्तू अन्‌ अनाठायी नाठाळपणा!

पिंपरी-चिंचवड वर्तमान
निशा पिसे
—–
संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दिंड्यांना भेटवस्तू देण्यावरुन पिंपरी-चिंचवड महापालिका वर्तुळात कलह माजला आहे. वस्तू खरेदीत होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सत्ताधारी भाजपने भेटवस्तू न देण्याचा पावित्रा घेतला आहे. तर 20 वर्षांपासूनची परंपरा खंडीत होणार असल्याचा कांगावा करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध केल्याने राजकारण तापले आहे. नगरसेवकांच्या मानधनातून वस्तू खरेदीची तयारी भाजप व राष्ट्रवादीनेही दाखवली आहे. वास्तविकतः घरदार सोडून केवळ विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने जाणाऱ्या वैष्णवांना खरंतर कोणत्याही भेटवस्तूची आस नाही. वस्तू खरेदीवर होणारा लाखो रुपयांचा खर्च, त्यावरुन होणारे भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे महापालिकेची भेटवस्तू “न आवडे जिवाला’ असे म्हणण्याची वेळ दिंडी प्रमुखांवर आली आहे. एकीकडे अनावश्‍यक बाबींवर महापालिका लाखो रुपयांची उधळपट्टी करत असताना दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देण्यासाठी आखता हात घेण्याची भूमिका आणि त्यावरुन होणारे राजकारण करदात्यांसाठी क्‍लेषदायक आहे.

फुकट्यांना “पीएमपी’चा तडाखा

दंड वसुली तीव्र : प्रशासनाची डोकेदुखी वाढली
पिंपरी – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली “पीएमपीएमएल’च्या बसमध्ये फुकट प्रवास करणारांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे फुकट्या प्रवाशांना लगाम बसणार असला, तरी प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

पाणीप्रश्‍नी भाजपची कसरत!

– पवना बंद जलवाहिनी प्रकल्प अडचणीचा
पिंपरी – आळंदीला होणारा अस्वच्छ पाणी पुरवठा हे पिंपरी-चिंचवडकरांचे पाप असल्याचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य आणि त्यातच शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही पाणी प्रदुषणाचा मुद्दा सुटेपर्यंत आळंदीकरांना पिण्याचे पाणी पुरवण्याचा आदेश देणार, असे वक्तव्य केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपची कोंडी झाली आहे. एकीकडे पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचा तिढा कायम असताना आता आळंदीच्या पाण्याचा प्रश्‍नही समोर ठाकल्याने हे प्रश्‍न हाताळताना भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मनसेचा “मल्टीप्लेक्‍स’ला “अल्टीमेटम’

पिंपरी – मल्टीप्लेक्‍स मधील खाद्यपदार्थांच्या दराविरोधात मुंबई, पुणे पाठोपाठ पिंपरी येथेही मनसेने मल्टीप्लेक्‍स धारकांना आठ दिवसांचा “अल्टीमेटम’ दिला आहे. आठ दिवसात खाद्य पदार्थांचे दर कमी केले नाहीत तर मनसे स्टाईलने निषेध करण्यात येईल, असा इशारा मनसेचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सभापतीपदासाठी “फिल्डिंग’

– शिक्षण समिती: जगताप-लांडगे गटांमध्ये खलबते
पिंपरी – महापालिकेच्या सत्तेतील वाट्यात महत्त्वाची पदे मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या दोन प्रमुख गटांतील इच्छुकांमध्ये आता शिक्षण मंडळ सभापतीपदासाठी जोरदार “फिल्डिंग’ सुरू आहे. त्यादृष्टीने राजकीय खलबते सुरू झाली आहेत.

कोवळ्या वयातच अभ्यासाचे जड झाले ओझे...

पुणे - वयाची दोन वर्षेही न उलटलेल्या कोवळ्या बोटांमध्ये पेन्सिल देऊन मुलाचा शैक्षणिक पाया पक्का करण्याचा विचार तुम्ही करत असाल, तर क्षणभर थांबा. कारण, यातून पाया निश्‍चित पक्का होणार नाही, तर भविष्यात त्याची शैक्षणिक आणि सर्वांगीण प्रगती धोक्‍यात येऊ शकते.