Friday, 2 November 2018

इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प मार्गी लावण्यास ‘अटल’

पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच्या उपसूचनेला महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या भूमिकेवर आम्ही ‘अटल’ आहोत, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्‍ती केले. 

पीएमपीएमएलच्या चार बसमार्गांचा विस्तार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या चार मार्गावर पीएमपीएमएल बस मार्गाचा विस्तार करण्यात आला आहे. तसेच दोन नवीन मार्गांवर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. नगरसेवक व पीएमपीएमएल अधिका-यांची नुकतीच एक बैठक झाली होती. नगरसेवकांनी काही नवीन मार्गावर बस सेवा सुरू करण्यासह विस्तार करण्याची सूचना केली होती. 

आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे पिंपरी-चिंचवडवर लक्ष; उद्या धडाडणार तोफा !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरावर आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.3) भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला जाणार आहे.

नळजोड नियमितीकरणासाठी केवळ दोन हजार अर्ज; 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात 14 हजार 447 नळजोड अनधिकृत असले तरी  केवळ दोन हजार 298 लोकांनी नियमित करण्यासाठी पाच महिन्यात अर्ज केले आहेत. त्यापैकी केवळ एक हजार 627 जणांचे अर्ज पाणीपुरवठा विभागाने मंजूर केले आहेत.

भोसरीतील सोसायटी धारकांच्या नागरी समस्या मार्गी लावा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – भोसरी मतदार संघातील अनेक सोसायट्यांच्या तक्रारी आहेत. नागरी समस्या त्यांना भेडसावत आहेत. नागरी समस्यांची तातडीने सोडवणूक करावी, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेच्या अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच नोटीस दिलेल्या विकसकांनी पुढे कार्यवाही केली की नाही याचा आढावा घेण्यात यावा.

अग्निशमन आणि आरोग्य विभागात होणार तातडीची पद भरती

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या आरोग्य आणि अग्निशामन दलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या तातडीच्या पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने या भरतीसाठी सकारात्मक अभिप्राय दिला असून हा प्रस्ताव अर्थ विभागाच्या मान्यतेसाठी गेला असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.  

सरदार पटेल जयंतीनिमित्त राष्ट्ररत्न पुरस्काराचे वितरण !

पिंपरी-चिंचवड-देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४३ वी जयंती साजरी करण्यात आली. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त डॉ.मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट (एनवायके), युवा क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय संलग्नित संस्थेतर्फे सरदार पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार, मणिरत्न शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सेवावृत्ती, निस्वार्थपणे समाज सेवा करणाऱ्यांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार, ११० शिक्षकांना मणिरत्न शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

Rs 20L for Smart City officials' Spain tour

PIMPRI CHINCHWAD: Five office-bearers and two officials of t .. 

जलसंपदा विभागाला 45 कोटींचा पहिला हप्ता

पिंपरी- गेली दहा वर्षांपासून रखडलेल्या आंद्र आणि भामा आसखेड धरणातील आरक्षित पाणी देताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने 239 कोटी सिंचन पुनर्स्थापना खर्च देण्याची मागणी केली होती. महापालिका प्रशासनाने प्रयत्नांची शिकस्त करूनही हा खर्च माफ करण्यास जलसंपदा विभागाने नकार दिल्याने आता उशिरा शहाणे झालेले महापालिका प्रशासन सिंचन पुनर्स्थापनेचा पहिला हप्ता देण्यास राजी झाले आहे. गुरुवारी झालेल्या महासभेत 45 कोटींचा पहिला हप्ता देण्यास उपसूचनेसह मंजुरी देण्यात आली आहे.

मगर स्टेडियमवरील सुरक्षा रक्षकांचे आरोग्य धोक्‍यात

पिंपरी- नेहरुनगर येथे आण्णासाहेब मगर स्टेडियमवर अतिक्रमणातून जप्त केलेले साहित्य ठेवले आहे. त्या ठिकाणी विजेची व्यवस्था नाही. डासांचे प्रमाण वाढून साथीचे आजार पसरत आहेत. त्यामुळे अतिक्रमण साहित्याची सुरक्षा करताना सुरक्षारक्षकांचेच आरोग्य धोक्‍यात आले आहे.

सफाई कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी

पिंपरी- दैनंदिन साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला जात नाही. यंदा ठेकेदारांकडून त्यांना बोनस द्यावा, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. प्रल्हाद कांबळे, मंगल जाधव, वंदना साळवे, सविता लोंढे, मंगल कसबे, अनिता ससाणे, प्रविण महाडिक, माया कांबळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. निवेदनात नमूद केले आहे की, दैनंदिन साफसफाई करणारे दीड हजार कामगार कार्यरत आहेत. 

“एचबीओटी’ केंद्र खासगीकरण लांबणीवर!

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालया (वायसीएम) मधील मल्टिीप्लेस हायड्रोलिंक ऑक्‍सिजन चेंबर विथ एअर लॉक सिस्टिम’साठी (एचबीओटी) केंद्र खासगी तत्वावर चालविण्याचा प्रस्तावाला विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सदर विषय मंजूर न करता तहकूब केला.

PMPML in search of agency for fleet fire audit, contacts central institute

PUNE: PMPML is still in search of an agency to conduct fire audit of buses though 17 vehicles in its fleet have gone up in flames since April 2016.