Saturday, 13 October 2018

शहरात चाललेल्या अवैध वृक्षतोडीविरोधात सामाजिक संस्था सन्मानपत्र करणार परत

वाल्हेकरवाडी (पुणे): शहरात बेसुमार अवैधरित्या वृक्षतोड चालूच आहे वारंवार मागणी करून देखील अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कुठे हि कडक कारवाई केली गेली नाही अथवा वृक्ष कायदा यामध्ये तरतूद असून, देखील आजपर्यंत एक हि गुन्हा नोंद झाला नाही किंवा जाणीवपूर्वक केला गेला नाही.

‘पीसीएमसी ईट आऊट’ नावाने शहरातील खवय्यांसाठी सोशल व्यासपीठ सुरू

पिंपरी (Pclive7.com):- ११ ऑक्टोबर हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा तसेच शहराचा ३६ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. या दिनाचे औचित्य साधून शहरातील खवय्यांसाठी ‘पीसीएमसी ईट आऊट’ (PCMC Eat Outs) या नावाने सोशल व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. त्याचा गुरूवारी शुभारंभ करण्यात आला. यापूर्वी ‘पुणे ईट आउट’च्या (Pune Eat Outs) माध्यमातून पुणेकरांना विविध खाद्यपदार्थांबाबत माहिती मिळत होती. आता त्याच संकल्पनेतून प्रेरणा घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील युवकांनी ‘पीसीएमसी ईट आऊट’ सुरू केले आहे.

‘रेंजहिल्स’चे मेट्रोकाम लवकरच होणार सुरू

पंच्याऐंशी खांबाचे काम वेगाने करणार पूर्ण

संरक्षण विभागाची मान्यता मिळाल्यानंतर रेंजहिल्स येथील काम सुरू करण्यासाठी 'महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन'ने (महामेट्रो) सर्व पूर्वतयारी केली असून, येत्या काही दिवसांत येथील काम सुरू होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी वाहतुकीचा अडथळा नसल्याने संरक्षण विभागाच्या हद्दीतील ८५ खांबांचे काम वेगाने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट 'महामेट्रो'ने निश्चित केले आहे.

Pune: Don’t have enough manpower or vehicles, says Pimpri top cop

On June 9, two pistol-wielding men fired at two women in HA Colony, Pimpri. While the women had managed to escape, four months on, the Pimpri-Chinchwad police is yet to get any information about the accused men. The police say they are hampered by a shortage of manpower to investigate the case.
Pune: Don’t have enough manpower or vehicles, says Pimpri top cop

PCMC to prepare updated detailed project report

The Pimpri Chinchwad municipal corporation (PCMC) has decided to prepare an updated detailed project report (DPR) for the development of industrial township. The decision to prepare an updated DPR was taken considering the merger of nine new villages, which may be added to the township limits soon. PCMC’s DPR was prepared in 2002.

महापालिकेच्या वतीने कासारवाडीतील दुकानावर अखेर कारवाई

कासारवाडीतील नाशिक फाटा चौकातील उड्डाणपुलाखाली अनधिकृत दुकानांवर अखेर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि.12) कारवाई करण्यात आली. कारवाईत एकूण 15 पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आले. पालिकेच्या बांधकाम परवानगी व अधिकृत बांधकाम/अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभागाने ही कारवाई केली.

वल्लभनगर एस. टी. आगार तोट्यात

पिंपरी – दिवसें-दिवस वाढत्या डिझेल, पेट्रोल दरामुळे वल्लभनगर एस. टी. महामंडळाच्या आगाराला “बुरे दिन’ आले असून उत्पादनापेक्षा खर्चच जास्त झाला असल्याने आगार तोट्यात आले आहे.

“सेवा ज्येष्ठता यादी’ला न्यायालयाची स्थगिती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थापत्य विभागात पदवी व पदविकाधारक अभियंत्यांची सेवा ज्येष्ठता यादी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. ती यादी एकत्रित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासन व महापालिकेला दिले होते. मात्र, या प्रकरणात उच्च न्यायालयाने अभियंत्याची सेवाज्येष्ठता यादी एकत्रीकरण करण्यास दुसऱ्यांदा स्थगिती दिली आहे.

मिळकतकरासाठी अभय योजना

करसंकलन विभागामार्फत थकबाकीदारांना आवाहन
15 ऑक्टोबरपूर्वी संपूर्ण कर भरल्यास शास्तीत 90 टक्के सवलत
पिंपरी-चिंचवड : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांसाठी करसंकलन विभागामार्फत 1 ऑक्टोबरपासून मनपाकर शास्ती (दंड) रक्कमेमध्ये सवलत देण्याची अभय योजना राबविणण्यात येत आहे. थकबाकीदारांनी 15 ऑक्टोबरपूर्वी संपूर्ण कराची रक्कम भरणा केल्यास मनपा शास्ती कराच्या रक्कमेवर 90 टक्के सवलत देण्यात येणार आहे. जे मिळकतधारक मिळकत कराचा भरणा करणार नाहीत, अशा मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचीही माहिती दिली आहे.

Maharashtra: Govt to offer injectable contraceptives at over 80 sub-district hospitals across state


महापालिका शिक्षकांना प्रशिक्षण देणार – महापौर राहुल जाधव

पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व अधिका-यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. त्यानंतर दिल्लीतील शाळांच्या धर्तीवर शाळांचा सुधारणार असल्याचा निर्धार सर्वपक्षीय गटनेत्यांनी घेतला आहे. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दिल्लीतील शिक्षकांना बोलविण्यात येणार आहे. पिंपरी महापालिकेच्या शिक्षकांना प्रशिक्षणसाठी दिल्लीत पाठविले जाईल. तसेच शिक्षकांचा वर्ग घेण्यात येणार आहे. शिक्षकांची नकारात्मक भुमिका असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात पालिकेच्या शाळामागे राहिले आहेत. त्यामुळे शिक्षकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे महापौर राहुल जाधव म्हणाले.

ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत हिंजवडीची श्रावणी ‘बेस्ट’

पिंपरी-चिंचवड : येथील श्रावणी नियोगी हिने ‘ग्लॅमॉन मिस इंडिया 2018’ स्पर्धेच्या अंमित फेरीत धडक मारून ‘मिस बेस्ट टॅलेंट’ हा किताब पटकावला. दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील 25 राज्यातील एक हजार स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम फेरीत 35 स्पर्धक पोहोचले होते. यामधून निवडलेल्या पाच युवतींमध्ये तिचा समावेश होता. ग्लॅमॉन इंडियाने ही स्पर्धा आयोजित केली होती. अंतिम फेरीवेळी अभिनेत्री रविना टंडन, अभिनेता अमन वर्मा, नितू शिवपुरी व अमिता नांगिया उपस्थित होते.

[Video] नवरात्रोत्सव पिंपरी चिंचवडचा !


चिंचवडगावात अयोध्या श्रीराम मंदिर प्रतिकृती

चिंचवड नवरात्र महोत्सवातर्फे 18 ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रम
‘श्रीराम नाम जप’ सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत संकल्पना
पिंपरी-चिंचवड : चिंचवड नवरात्र उत्सवानिमित्त भक्तीमय वातावरणात देवीची, तसेच श्रीराम मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. राजेंद्र पवार, स्वाती पवार यांच्या हस्ते कार्यक्रम झाला. मकरंद बेलसरे यांनी पौराहित्य केले. चिंचवड नवरात्र महोत्सवातर्फे 18 ऑक्टोबरपर्यंत महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. दरम्यान, नियोजित अयोध्या श्रीराम मंदिराच्या साकारलेल्या हुबेहुब प्रतिकृतीचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. अयोध्येतील श्रीराम मंदिर संकल्प पूर्तीसाठी ‘श्री राम नाम जप’ सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत अशी संकल्पना केली आहे. त्याला नागरिकांचा उस्त्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रतिकृती पाहण्यास उत्स्फूर्त गर्दी केली.

रविवारी खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

पिंपळे गुरवमधील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात आयोजन
पिंपरी-चिंचवड : खान्देशातून उद्योग, व्यवसायानिमित्त पिंपरी, चिंचवड व पुणे शहरात स्थायिक झालेल्या खान्देश परिवाराने ‘खान्देश सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित केला आहे. खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रिडा मंच (पुणे)तर्फे होणार्‍या या महोत्सवाचा उद्देश खान्देश संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचा आहे. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात महोत्सव होईल, अशी माहिती कार्याध्यक्ष पि. के. महाजन यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

पिंपरीचे आयुक्त जेव्हा मिमिक्री करतात..! (व्हिडिओ)

पिंपरी : आतापर्यंत मिमिक्री करणारे अनेक कलाकार तुम्ही पाहिले असतील.. पण पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केलेली मिमिक्री पाहण्याचा योग कधी आला नसेल..

मुलभुत सुविधांअभावी दापोडीतील सिद्धार्थनगर वंचित

नी सांगवी - दापोडी प्रभागातील शेवटचे टोक असलेला पुणे मुंबई रस्त्यालगतचा सिद्धार्थनगर हा जवळपास सात ते आठ हजार लोकवस्तीचा भाग आहे. एकीकडे शहराच्या भरभराटीत तितकाच दुर्लक्षित व मागास राहिल्याचे येथील मुलभुत प्रश्नांनी समोर येत आहे. एकीकडे पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या वल्गना करीत असताना येथील नागरीकांना मुलभुत सुविधाच व्यवस्थित मिळत नसल्याने आम्ही ही माणसं आहोत अशी आर्त हाक येथील रहिवाशांकडुन ऐकायला मिळते. तुंबलेल्या ड्रेनेज लाईन, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव यामुळे सिद्धार्थनगर रहिवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. उघडी गटारे तुंबलेले चेंबर,झाकणं नसलेले चेंबर यामुळे मैलामिश्रितपाणी रस्त्यावर येत आहे. नागरीकांना यातुनच रहदारी करावी लागते. लहान मुले, जेष्ठांचे आरोग्य अबाधित कसे राहणार असा प्रश्न सर्वसामान्यांमधुन विचारला जात आहे. या भागात कष्टकरी कामगार, मजुरवर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. 

गंगानगर, प्राधिकरणातील प्रलंबित प्रश्न सोडवा, सदाशिव खाडेंना साकडे

चौफेर न्यूज –  गंगानगर, प्राधिकरणमधील प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी गंगानगर विकास कृती समितीच्या शिष्ठमंडळाने प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांची भेट घेतली. यावेळी खाडे यांना निवेदन देण्यात आले असून प्रलंंबित प्रश्न सोडविण्यासाठी साकडे घालण्यात आले.