Thursday, 11 October 2012

महापालिकेचाही बेकायदा बांधकामांवर हातोडा

महापालिकेचाही बेकायदा बांधकामांवर हातोडा
पिंपरी, 10 ऑक्टोबर
पोलीस बंदोबस्त उपलब्ध होताच महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर हातोडा उगारला आहे. केशवनगर परिसरातील सुमारे साडेसात हजार चौरस फुट जागेतील तीन बांधकामांवर आज कारवाई करण्यात आली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


अवैध बांधकाम नियमितीकरणासाठी दंडामध्ये शिथिलता ; महासभेपुढे प्रस्ताव

अवैध बांधकाम नियमितीकरणासाठी दंडामध्ये शिथिलता ; महासभेपुढे प्रस्ताव
पिंपरी, 10 ऑक्टोबर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन धोरणानुसार सामासिक अंतरामध्ये 20 टक्क्यांपर्यंत केलेली वाढीव बांधकामे दंड आकारुन नियमित केली जाणार आहेत. त्यासाठी अडीच ते तीन हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामासाठी प्रती चौरस फुट 25 रुपये, तीन ते पाच हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांना 50 रुपये, पाच ते दहा हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांना शंभर रुपये आणि एक हजार चौरस फुटापुढील बांधकामासाठी प्रती चौरस फुट पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव येत्या 19 ऑक्टोबर रोजी होणा-या महापालिका सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


चिंचवडमध्ये अर्ध्या तासात तीन सोनसाखळी चोरी

चिंचवडमध्ये अर्ध्या तासात तीन सोनसाखळी चोरी
पिंपरी, 10 ऑक्टोबर
दोन पादचारी महिलांच्या, तर कट्टय़ावर बसलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळ्या दोन दुचाकीस्वार तरुणांनी अर्ध्या तासात हिसकावून पोबारा केला. या घटना काल, मंगळवारी (ता. 9) दुपारच्या सुमारास चिंचवड परिसरात घडल्या. या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


थेरगाव येथे बाल्कनीचा भाग कोसळून एक ठार, दोन जखमी

थेरगाव येथे बाल्कनीचा भाग कोसळून एक ठार, दोन जखमी
पिंपरी, 10 ऑक्टोबर
थेरगाव येथे डांगे चौकानजिक बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळून रस्त्यावरून जाणारा एक पादचारी तरुण मृत्युमुखी पडला. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेत अन्य दोघेजण जखमी झाले आहेत.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


नवरात्रीसाठी आकर्षक दांडीयांनी बाजारपेठ सजली

नवरात्रीसाठी आकर्षक दांडीयांनी बाजारपेठ सजली
पिंपरी, 10 ऑक्टोबर
अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवाची धुमधाम सुरू झाली आहे. नवरात्रीचे मुख्य आकर्षण म्हणजे दांडीया महोत्सव. या साठी पिंपरी-चिंचवडमधील बाजारपेठामध्ये दिसणा-या रंगीबेरंगी आकर्षक दांडियांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Rs 15-crore plan to predict air quality, rate UVR dose approved

Rs 15-crore plan to predict air quality, rate UVR dose approved: In a first for Pune and Pimpri-Chinchwad, a Rs 15-crore project has been sanctioned in the 12th five-year plan to predict air quality and rate the intensity level of ultra violet radiation dose on a scale of 1-10.

People demand widening of roads near railway crossings

People demand widening of roads near railway crossings: Sushil Mancharkar, president, legal cell, Pimpri Chinchwad unit of Congress has written a letter to the municipal commissioner making this demand.

Illegal buildings razed, land cleared

Illegal buildings razed, land cleared: Illegal constructions of approximately 44,000 sq ft were razed while land measuring 40,000 sq ft was cleared of encroachments in separate operations launched by the Pune Municipal Corporation (PMC) and the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) on Tuesday.

Rickshaw Panchayat demands fare hike

Rickshaw Panchayat demands fare hike: The city's biggest autorickshaw union - the Rickshaw Panchayat Pune, Pimpri-Chinchwad - has demanded a revision in autorickshaw fare.

बहुतांश नगरसेविकांचे "हाताची घडी आणि तोंडावर बोट'

बहुतांश नगरसेविकांचे "हाताची घडी आणि तोंडावर बोट': पिंपरी - स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच 65 महिला नगरसेविका निवडून आल्या. मात्र, त्यांचा निर्णयप्रक्रियेतील सहभाग अजूनही निम्मासुद्धा नसल्याचे पहिल्या सहामाहीत आढळून आले आहे. बोटांवर मोजण्याइतपत अनुभवी नगरसेविकांचा प्रत्यक्ष कामकाजामध्ये सहभाग दिसून येतो आहे, तर उर्वरितांपैकी काहींनी केवळ अनुमोदन, सूचक व उपसूचना मांडण्यासाठीच तोंड उघडले आहे. 

Scitech Park gets eviction notice

Scitech Park gets eviction notice: The Science and Technology (Scitech) Park's 'Growth Lab' in Bhosari is facing an eviction notice from the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).

Sena holds march for hawkers' rights in Pimpri-Chinchwad

Sena holds march for hawkers' rights in Pimpri-Chinchwad: The Pimpri-Chinchwad unit of the Shiv Sena took out a morcha of hawkers on Tuesday to press for implementation of hawkers' zones, renewal of licences and stopping of anti-encroachment drive targeting the hawkers.

SWaCH spreads the word on e-waste

SWaCH spreads the word on e-waste: SWaCH cooperative is implementing a project in the city to create awareness regarding e-waste among schoolchildren and their eco-club teachers.

ग्राहकांच्या खात्यामध्ये सबसिडी जमा करा

ग्राहकांच्या खात्यामध्ये सबसिडी जमा करा: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार घरगुती सिलिंडर ग्राहकांना वर्षाकाठी सहाऐवजी नऊ सिलिंडर देण्याची ‘तसदी’ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार घेत नसल्यामुळे राज्यातील वितरक संघटनेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. घरगुती सिलिंडरसाठी एकच दर आकारून सबसिडीची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याचा प्रस्ताव वितरकांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिला आहे.

पिंपरी पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेतून अजितदादांना वगळले!

पिंपरी पालिकेच्या निमंत्रण ...:
पिंपरी / प्रतिनिधी
उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या अजित पवार यांचे नाव पिंपरी पालिकेच्या वर्धापनदिनाच्या निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी पालिकेत अजितदादा सर्वेसर्वा असून त्यांचे नाव नसलेल्या पत्रिका प्रथमच बाहेर पडल्याने त्याचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
Read more...

पाच इमारतींवर हातोडा

पाच इमारतींवर हातोडा: वाकड। दि. ८ (वार्ताहर)

पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाने दुसर्‍या टप्प्यातील ५ अनधिकृत बांधकामांवर आज कारवाई केली. त्यातील ४ व्यावसायिक बांधकामांवर प्राधिकरणाचा हातोडा पडला. मोठय़ा पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरळीत पार पडली. कारवाईस विरोध करण्याचे कोणाचे धाडस झाले नाही. मात्र, प्रचंड संख्येने वाकडकर रस्त्यावर जमा झाले होते. आपलेही घर पाडले जाते की काय, असा भाव प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होता.

इतर वेळच्या तुलनेत या वेळी कारवाई निवांतपणे संथगतीने सुरू होती. ११ वाजता एका पोकलेनच्या सहायाने कारवाईला सुरुवात झाली. या वेळी प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व्ही. के. पाटील यांच्यासह उपअभियंता वसंत नाईक, शाखा अभियंता टी. आर. वारी, विद्युत विभाग उपअभियंता राजू काटे यांच्यासह लेखनिक, सर्व्हेअर, प्राधिकरण पोलीस, बिगारी आदी ५0 कर्मचारी कारवाईसाठी तैनात होते.

११ ला सर्व्हे १७७ काळाखडक रोडलगतच्या भरत कस्पटे व धनाजी बारणे यांच्या १४ व्यावसायिक गाळ्यांसह कार्यालय भुईसपाट करण्यात आले. पाऊणच्या सुमारास आणखी एका पोकलेनला पाचारण करण्यात आले.
दुसरी कारवाई काळाखडक रस्त्यालगतच्या हॉटेल साबीरच्या पत्राशेडवर करून ताफा आदर्श कॉलनी, वाकडरोडकडे वळला. येथील दिलीप कलाटे यांची पहिल्या कारवाईत पाडलेली, पण त्यांनी पुन्हा बांधलेली सीमाभिंत पाडण्यात आली. ५ वी कारवाई सुदर्शन कॉलनी नं. २ मधील चंद्रकांत गायकवाड यांच्या ३ मजली २४00 स्क्वेअर फूट इमारतीवर करण्यात आली. ही कारवाई होईपर्यंत ५.३0 वाजले होते. त्यामुळे यानंतर कारवाई थांबविण्यात आली.

या वेळी बंदोबस्तासाठी सहायक पोलीस आयुक्त सुधीर चौगुले यांच्यासह ८ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २४ उपनिरीक्षक, १३३ पोलीस कर्मचारी, ४४ महिला कर्मचारी, हिंजवडी वाहतूक विभागातील एका उपनिरीक्षकासह ४ पोलीस कर्मचारी, एक दंगल काबू पथक (सीआरपी) तसेच मुख्यालय राखीव फोर्स मागील वेळी झालेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तावर होते.

Kejriwal group already in action mode, battles for waste-pickers

Kejriwal group already in action mode, battles for waste-pickers: Even before Arvind Kejriwal’s party officially comes into existence, the group supporting him in the city has decided to take up its first issue and it relates to waste-pickers who stand to lose their jobs in Pimpri-Chinchwad.

Now, info on secondary schools in Maharashtra only a click away

Now, info on secondary schools in Maharashtra only a click away: Rashtriya Madhyamik Shiksha Abhiyaan has envisaged a digitalisation plan for a report card for every school in the state.

पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केल्या प्रकरणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे यांना अटक

पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केल्या प्रकरणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे यांना अटक
तळेगाव दाभाडे, 9 ऑक्टोबर
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात एका कॉन्स्टेबलला अधिका-यांसमक्ष बेदम मारहाण केल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे यांच्यासह दोनजणांना पोलिसांनी आज अटक केली. यापूर्वीही लांडे यांच्यावर भोसरी येथे वीज कंपनीच्या अभियंत्याला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

पिंपरीमध्ये सेक्सरॅकेटचा पर्दाफाश; नऊ मुली आणि सहा एजंट पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरीमध्ये सेक्सरॅकेटचा पर्दाफाश; नऊ मुली आणि सहा एजंट पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी, 9 ऑक्टोबर
परराज्यातील मुलींच्या मदतीने सेक्स रॅकेट चालविणा-या एका टोळक्याला पिंपरी पोलिसांनी आज संध्याकाळी सापळा रचून अटक केली. या कारवाईत नऊ मुलींसह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये दोघेजण उच्चशिक्षित तरुण आहेत.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

पुणे-मुंबई महामार्गावर खिळे टाकण्याचा 'उद्योग' सुरूच !

पुणे-मुंबई महामार्गावर खिळे टाकण्याचा 'उद्योग' सुरूच !
पिंपरी, 9 ऑक्टोबर
पुणे-मुंबई महामार्गावर खिळे टाकून वाहने पंक्चर करण्याचा उद्योग पुन्हा सुरू झाला असून आज चिंचवड येथील एम्पायर इस्टेटसमोर टाकण्यात आलेल्या शेकडो खिळ्यांमुळे अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांसमवेत रस्त्यावर मोठ्या संख्येने पडलेले खिळे गोळा केले. खिळे टाकण्याच्या उद्योगाला पायबंद केंव्हा बसणार असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून केला जात आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

हिवाळ्यातील गुलाबी थंडीची चाहूल

 मंगळवारी (दि. 9) भल्या पहाटे पिंपरी-चिंचवडकरांना आला. परतीच्या प्रवासात हस्त नक्षत्राची एक्सप्रेस सुसाट सुटली आणि टपो-या थेंबांचा सफर अनेकांनी अनुभवली खरी... मात्र धुक्याच्या दाट दुलईत औद्योगिक नगरी आज लपेटली गेल्याने नकळत हिवाळ्यातील गुलाबी थंडीची चाहूल लागली चित्र निर्माण झाले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in