क्षेत्रीय कार्यालयांचे दुर्लक्ष : जनसेवा फाउंडेशन करणार आंदोलन
पिंपरी – शहरातील प्रत्येक चौकाचौकात, बीआरटीएस स्थानकात, उड्डाणपुलाच्या खांब, भिंतीवर अनधिकृतपणे नोकरी, खासगी क्लासेस यासह अनेक जाहिरातीचे पत्रक, बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात येवू लागले आहे. त्यामुळे छोटे-मोठे अनधिकृत फलक हटविण्यात न आल्यास येत्या 15 दिवसात जनसेवा सोशल फाउंडेशनतर्फे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.