Saturday, 3 June 2017

​देहूरोडमध्ये साकारत आहे जलयुक्त शिवार

निगडीपासून काही अंतरावर देहूरोड केंद्रीय शाळेजवळ एका तळ्याचे लोकसहभागातून जलसंवर्धन केले जात आहे. निगडी प्राधिकरण रहिवासी संघटनेने (NPRF) यासाठी पुढाकार घेतला असून सर्वांना मदतीसाठी पुढे येण्याचे आव्हाहन केले आहे. आत्तापर्यंत जेसीबीच्या सहाय्याने ४०० ट्रक गाळाची माती काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामुळे जलसाठवणूक क्षमता २.५ लक्ष लिटरने वाढली आहे.
अधिक माहितीसाठी इथे संपर्क साधावा 9822038829

जागतिक बॅंकेला १५० कोटी परत करा - आमदार जगताप

पिंपरी - ‘‘महापालिकेने नऊ वर्षांपूर्वी व त्यानंतर जागतिक बॅंकेकडून विविध विकासकामांसाठी घेतलेल्या १५० कोटी रुपये कर्जावर दरवर्षी ३० ते ४० टक्के वार्षिक व्याज द्यावे लागत आहे. भारतीय बॅंकांचा व्याजदर सध्या वार्षिक सात ते १४ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता जागतिक बॅंकेला १५० कोटी रुपये परत करणे सहज शक्‍य आहे. ती रक्कम जागतिक बॅंकेला तातडीने देऊन शहरातील करदात्यांची कर्जातून मुक्तता करावी,’’ अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी केली.

डेअरी फार्म येथील नियोजित उड्डाण पुलाचे काम लवकरच

पिंपरी - महामार्ग व पिंपरीगाव यांना जोडणाऱ्या डेअरी फार्म येथील उड्डाण पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांकडे केली. येत्या तीन महिन्यांत हे काम सुरू करण्याचे आश्‍वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. 

मदर तेरेसा की, पंडित दीनदयाळ उपाध्याय?

एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलाच्या नामकरणावरून राजकारण
पिंपरी - एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलाला मदर तेरेसा यांचे नाव देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असताना केली होती. आता या पुलाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका जयश्री गावडे यांनी केली आहे. यामुळे आगामी काळात या पुलाच्या नामकरणावरून राजकारण होण्याची शक्‍यता आहे.

[Video] कचरा व्यवस्थापनासाठी पिंपरी महापालिका सरसावली; पाच जूनपासून कचरा विलगीकरणाची मोहीम


एमपीसी न्यूज - स्वच्छ भारत अभियानात 'कचरा' झालेली पिंपरी-चिंचवड महापालिका आता कचरामुक्त शहर करण्यासाठी सरसावली आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पाच जूनपासून घनकचरा विलगीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती, महापौर नितीन काळजे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, सह आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य अधिकारी मिनीनाथ दंडवते आदी उपस्थित होते. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पाच जूनपासून पिंपरी-चिंचवड शहरात घनकचरा विलगीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था मदत करणार आहेत. कचरा मुक्त प्रभाग करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून याची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात सोसायट्या आणि व्यावसायिक बाजारपेठा कचरा मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे, आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

बांधकाम कामगारांची सुरक्षा रामभरोसे

कामगार आयुक्‍तालयाची डोळेझाक : पोट पाण्यासाठी जीव धोक्‍यात
भोसरी,  (वार्ताहर) – दिघी, मोशी, चऱ्होली परिसरात अनेक गृहप्रकल्पांची बांधकामे सुरु असून, याठिकाणच्या नागरीकरणाचा वेग वाढला आहे. मात्र, या गृहप्रकल्पांचे काम सुरू असताना साईटवर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या जीवाच्या रक्षणासाठी ठेकेदाराकडून कोणतीही सुरक्षा साधने पुरविली जात नसल्याने या कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र सर्वच साईटस्‌वर दिसत आहे.

[Video] देहुरोड ते निगडी दरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी जुन्या झाडांवरील कु-हाड रोखण्यासाठी लवकरच होणार बैठक


महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) अंतर्गत निगडी ते देहु या रस्त्यांचे चौपदरीकरण चालू आहे. या रुंदीकरणात स्थानिक वड, चिंच यासारखी 261 वृक्षांची कत्तल होणार आहे. देहुरोड ते निगडी सावकर दरम्यानची यासाठी शहरातील अनेक पर्यावरण प्रेमी व सामाजिक संस्थानी विरोध केला होता. मात्र हा विरोध लक्षात घेता प्रशासासनाने चक्क दि.29 ला रात्री चिंचेची तीन जुनी झाडे तोडली. याबाबत पर्यावरण प्रेमी संस्था व नागरिकांनी प्रशासानाला जाब विचारला असता याबाबत लवकरच बैठक व पहाणी करुन निर्णय घेऊ असे आश्वासन एमएसआरडीसीतर्फे देण्यात आले आहे. 

वृक्षतोड संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

निगडी,  (प्रतिनिधी) – देहूरोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील वृक्षतोड संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करा, असा आदेश निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुंडे वनविभागाला दिले आहेत.

मध्यरात्रीच्या मॅरेथॉन बैठकीनंतर शेतकऱ्यांचा संप मागे

मुंबई – गेले दोन दिवस राज्यातील शेतकरी संपाने वातावरण ढवळून निघत असताना जागे झालेल्या सरकारने शेतकरी प्रतिनीधींशी शुक्रवारी रात्री केलेली चर्चा फळाला आली. यामुळे शेतकऱ्यांनी संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री आणि शेतकरी संघटनेचे नेते यांच्यात तब्बल 4 तास बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यानंतर शनिवारी पहाटे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, नाशिकमधील शेतकऱ्यांनी हा निर्णय अमान्य असल्याचे सांगत संप सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. यामुळे शनिवारी सकाळीदेखील नाशिकच्या बाजार समितीमधील शेतीमालाचा आणि दुधाचा व्यापार बंदच आहे.

शेतकरी संपाने जनजीवन विस्कळीत

निगडी : विविध प्रश्नांवर वारंवार मागण्या करून, आंदोलने करूनही सरकार प्रतिसाद देत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी अखेर संप पुकारल्याने आकुर्डी आणि यमुनानगर येथील भाजी मंडईत त्याचा परिणाम लगेचच दिसून आला. भाज्यांचे ... पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सर्व ठिकाणच्या भाजी ...

गृहिणींचे “बजेट’ कोलमडले

पिंपरी, (प्रतिनिधी) – शेतकरी संपाची धग आता सर्वसामान्यांपर्यंत पोहचली आहे.भाजीपाल्याच्या वाढलेल्या अव्वाच्या-सव्वा दरामुळे रोजच्या जेवणात कोणत्या भाज्या बनवाव्यात, असा प्रश्‍न गृहिणींना पडला आहे. त्यामुळे आता गृहिणींचे “बजेट’ कोलमडले असून, त्यांनी आपला मोर्चा डाळी व कडधान्यांकडे वळविला आहे.

[Video] शेतकरी संपामुळे पिंपरीच्या बाजारात भाज्यांची आवक कमी; भाज्यांच्या भावात दिवसात 20 टक्क्यांनी वाढ


एमपीसी न्यूज - राज्यभरातील शेतकरी संपाचा पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड भाजी बाजारावरही परिणाम झाला असून भाज्यांची आवक 60 ते 70 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर मात्र एका दिवसात 20 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना याचा चांगलाच फटका बसला आहे. 

वृक्षतोड संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

निगडी,  (प्रतिनिधी) – देहूरोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील वृक्षतोड संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करा, असा आदेश निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुंडे वनविभागाला दिले आहेत.