Tuesday, 5 December 2017

सरकारमुळे पुणे मेट्रोचे काम म्हणजे, हातचे सोडून पळत्याच्या मागे!

सरकारमुळे पुणे मेट्रोचे काम म्हणजे, हातचे सोडून पळत्याच्या मागे! चुकीचे नेम: 1] पुण्यामध्ये मेट्रोसाठी जागा ताब्यात नाही 2] शिवाजीनगर-स्वारगेट भूमिगत मार्गाची निविदा पुढच्यावर्षी मंजूर होईल 3] शिवाजीनगर-स्वारगेट नदीपात्रातून मार्गाला विरोध, मार्गाची रचना निश्चित नाही, कोर्टात याचिका Govt has forced Pune Metro to go in wrong direction. Building Nigd-Shivajinagar route ​(under PCMC jurisdiction) is easy compared to Pune. Currently Pune Metro facing lot of hurdles in Pune due to space unavailability, oppose by activist and court cases also underground work has not begun yet

[Video] पवना जलपर्णीमुक्त अभियान | Week 3

पवना जलपर्णीमुक्त अभियान, Week 3
खासदार अमर साबळे भेट
रोटरी क्लब, वाल्हेकरवाडी व Connecting NGO PCMC यांच्या सहकार्याने... 

पवना नदी प्रदूषणमुक्त व जलपर्णीमुक्त करण्यासाठी जनचळवळ उभारणार – खासदार अमर साबळे

पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणारी पवना नदी ही खऱ्या अर्थाने पवनामाई आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून जलपर्णीमुळे ही नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे या पवनामाईला जलपर्णीमुक्त व प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन जनचळवळ उभारणार असल्याचा निर्धार राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला.

महापालिकेला 22 कोटींचा भुर्दंड?

सराफ व्यावसायिकांचे “चांगभले’ : आयात मालाची जकात पाण्यात
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आयात केलेल्या सोने, चांदी व अन्य मौल्यवान धातुवर महापालिका जकात आकारणी करत होती. त्यानुसार सोने, चांदी या मालाचा व्यवसाय करणाऱ्या 44 व्यावसायिकांना सन 2008-09 आणि 2009-10 आर्थिक वर्षांसाठी आयात केलेल्या मालावर दोन टक्‍के प्रमाणे जकात व दहा पट तडजोड शुल्क भरण्याची नोटीस बजाविण्यात आली. परंतु, नोटीस दिल्यानंतरही व्यावसायिकांनी जकात व तडजोड फी रक्कम भरलेली नाही. त्यामुळे सन 2011-12 आर्थिक वर्षांतील लेखापरीक्षणात जकात व तडजोड शुल्कापोटी सुमारे 22 कोटी रुपयांच्या वसुलीवर पाणी सोडावे लागले आहे. महापालिकेच्या लेखापरीक्षणातून महापालिका अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाचा भांडाफोड झाला आहे.

पिंपळे सौदागरवासियांनी केला कापडी पिशवी वापराचा संकल्प

पिंपळे सौदागर – प्लास्टिक बंदी बाबत शासनाने विविध कायदे केले. तरीदेखील प्लास्टिक पूर्णतः बंद होऊ शकले नाही. वाढत्या प्लास्टिकचा धोका लक्षात घेत पिंपळे सौदागर येथील नागरिकांनी कापडी पिशव्यांचा स्वीकार केला आहे.

Area under Pune's Bhosari flyover becomes garbage dump

Flyovers, which are meant to be a solution to the city’s traffic problems, are now being used for waste disposal. The area below a flyover, connecting Bhosari-Alandi road, has become a garbage dumping site in the city since past few days.

उद्योगनगरीच्या “स्वच्छ’ सर्व्हेक्षणास जानेवारीत प्रारंभ

पिंपरी – स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छ सर्वेक्षण 4 जानेवारी 2018 पासून सुरु होणार आहे. शहर स्वच्छतेसाठी सर्वांनी प्रयत्न करुन अव्वलस्थानी आणण्यास सहकार्य करावे, असे आवाहन सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.

महापालिकेतर्फे मौखिक आरोग्य तपासणी मोहीम

पिंपरी – महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने महिनाभर शहरात मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचे उद्‌घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात झाले. या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन शहरवासियांना करण्यात आले आहे.

“अटल टिंकरिंग मॅरॅथॉन’ स्पर्धेत ज्ञान प्रबोधिनीचे यश

निगडी – अटल इनोव्हेशन मिशनतर्फे अटल टिंकरिंग मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत देशातील उत्कृष्ट प्रकल्पांची निवड करण्यात आली. यामध्ये निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या तब्बल दोन प्रकल्पांची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

चायनीज विक्रेत्यांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

पिंपरी – शहरात चायनीज विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र त्याची महापालिकेकडे नोंद नाही. शहरातील मुख्य भागांमध्ये अनेक चायनीज विक्रेत्यांनी पदपथ, वाहनतळाच्या जागा बळकाविल्या आहेत. निर्धास्तपणे जागा मोकळी दिसेल तेथे व्यवसाय सुरु केला जातो. रस्त्यावरच खुर्च्या टाकल्या जातात. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीक संताप व्यक्‍त करत आहेत.

व्यवस्थापन समितीचा शाळा भेट उपक्रम

पिंपरी – जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागातर्फे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा शाळा भेट कार्यक्रम घेण्यात आला.

शिक्षण प्रशासनाच्या कामकाजाला गती मिळणार?

पिंपरी – शैक्षणिक गुणवत्ता विकास व वाढ कार्यक्रमांतर्गत प्रतिनियुक्तीवर 11 केंद्र समन्वयकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या क्षमता, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र तसेच सरल, शाळा सिद्दी, आरटीई, तसेच शाळा पर्यवेक्षणाच्या कामकाजासाठी व प्रशासकीय कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने सहायक प्रशासन अधिकारी व पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली केंद्र समन्वयकांच्या तात्पुरत्या स्वरूपात नेमणूका करण्यात आल्या आहेत.

भाजप-शिवसेनेत पुन्हा जुंपणार

पिंपरी – वाकड येथील स्थळ बदलाचा शिवसेनेने दाखल केलेला विषय विधी समितीने फेटाळून लावला आहे. यामुळे शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा जुंपणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.