Monday, 21 January 2019

पक्षांची तहान भागविण्यासाठी तरुणांचा पुढाकार

देहूरोड (दि. १९ जाने.) :-  निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेच्या वतीने आणि कॅपजेमीनीच्या मनुष्यबळ विभागाच्या पुढाकाराने आयप्पा टेकडी, देहूरोड येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पक्षांसाठी पाणी आणि कृत्रिम घरट्याची व्यवस्था करण्यात आली. कॅपजेमिनिकचे पुनीत कुर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त ही झाडे लावण्यात आली.

धनगर महासंघाचा आंदोलनाला इशारा

पिंपरी : अहिल्यादेवी पुतळ्याची जागा हलवण्याचा प्रयत्न केल्यास मेट्रो आणि महापालिका दोन्हींचे कामकाज तीव्र आंदोलन करुन बंद पाडु असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर धनगर समाज महासंघाच्यावतीने आयुक्त श्रावण हार्डीकर, महापौर राहुल जाधव तसेच मेट्रोचे सहाय्यक मुख्य अधिकारी गौतम बिर्‍हाडे यांना देण्यात आला.

मिळकतींच्या देखभालीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करा- राहुल जाधव

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकतीमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविणे, स्पर्धा परीक्षा केंद्रे अद्ययावत करणे, पडून असलेल्या भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे अशा विविध कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्‍यांना दिल्या. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, व्यायामशाळा, सांस्कृतिक हॉल, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, जलतरण तलाव, कुस्ती केंद्र यांना महापौर जाधव यांनी भेटी दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी शनिवारी आठही प्रभाग अध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता यांची बैठक घेतली. आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभाग अध्यक्ष अनुराधा गोरखे, भीमा फुगे, कमल घोलप, करुणा चिंचवडे, अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य बाळासाहेब ओव्हाळ, सर्व प्रभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, नगररचना, उद्यान, क्रीडा, भूमि जिंदगी, आरोग्य विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

एचसीएमटीआर बाबत पालिका “संरक्षण खात्याशी” अप्रामाणिक

पिंपरी चिंचवड : ज्या एचसीएमटीआर च्या कारणासाठी महापालिका प्रशासनाने डिफेन्स विभागाला पत्र व्यवहार केला होता ते कारण पुन्हा संरक्षण खात्याने पडताळून पाहिल्यास महापालिका प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता आहे. घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने एचसीएमटीआर संदर्भातील प्रशासनाच्या पत्रांची पहाणी करत असताना सदर बाब उघडकीस आली आहे.

PCMC, police and RTO to join hands for removing abandoned vehicles

PIMPRI CHINCHWAD: The civic body, traffic police and the Regional Transport Office (RTO) will jointly launch a crackdown on abandoned vehicles across .

Dapodi residents oppose slum rehabilitation project

Pimpri Chinchwad: Around 1000 residents of the slums in Dapodi took out a morcha on Saturday from Dr Babasaheb Ambedkar Chowk in Pimpri to the Pimpri.

PCMC to find Wakad water woes solution in Feb

Pimpri ChinchwadPimpri Chinchwad municipal commissioner Shravan Hardikar said on Saturday that they would hold a meeting next month to discuss ways 

लोहमार्ग टाकण्याचे काम मार्चपासून

पिंपरी - दापोडी व महापालिका भवन येथील मेट्रो स्थानकाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. मेट्रोच्या लोहमार्गाचे काम मार्चमध्ये सुरू होईल.
संत तुकारामनगर येथील स्थानकाच्या सर्व दहाही खांबांचे पिलर आर्म्स बसवून झाले आहेत. तेथील वरच्या बाजूच्या खांबांचे व कॅप बसविण्याचे काम सुरू झाले आहे. खांबांवर कॅप बसविल्यानंतर तेथील व्हायाडक्‍टचे काम सुरू होईल. फुगेवाडी येथील पाच खांबांचे पिलर आर्म्स बसविण्यात आले आहेत.

प्राधिकरण पदपथ-रस्त्यांवर अतिक्रमण

प्राधिकरणातील मुख्य चौक तसेच रस्त्यांवर व पदपथांवर फळ विक्रेते, खाद्यपर्थांच्या हातगाड्या आणि चायनीज स्टॉल चालकांनी अतिक्रमण केल्याने बकालपणा वाढला आहे. नियोजित महापौर बंगल्याजवळील रस्त्यावर सायंकाळच्यावेळी एका रांगेत जवळपास दहा ते पंधरा चायनीज स्टॉल लागलेले असतात. संभाजी चौकाला लागुन असलेल्या पदपथावर वडा-पावच्या हातगाड्या लागलेल्या असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना या पदपथाचा वापर करता येत नाही. टिळकचौकातील पदपथांवर भेळपुरी तसेच इतर खाद्यपर्थांच्या सुमारे पंधरा ते वीस हातगाड्या लागलेल्या असतात तर ग्राहकांच्या दुचाकी गाड्या रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या केल्या जात असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी होते. पदपथ व रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या हातगाड्या व चायनिज स्टॉलवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यात यावी अशी स्थानिक नागरीकांची मागणी आहे.

भोसरीत सुपर स्पेशालिटी रुग्णसेवा

पिंपरी - शहरातील नागरिकांना सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महापालिकेने भोसरीत सुसज्य रुग्णालयासाठी प्रशस्त इमारत उभारली आहे. त्यात पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सध्या दिल्या जाणाऱ्या १६ प्रकारच्या स्पेशालिटी वैद्यकीय सुविधांसह न्यूरोलॉजी, प्लॅस्टिक सर्जरी, अशा सुपर स्पेशालिटी प्रकारातील तब्बल दहा सुविधा जास्तीच्या मिळणार आहेत.

‘विद्यावाणी’ आता मोबाईल ॲपवर

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘विद्यावाणी’ या कम्युनिटी रेडिओवरील थेट प्रसारण आता श्रोत्यांना ‘मोबाईल ॲप’द्वारे ऐकता येणार आहेत. त्यामुळे केवळ विद्यार्थी आणि नागरिकांनाच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या नागरिकांनादेखील ‘विद्यावाणी’वरील कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे.

सहकार दरबारमुळे सोसायट्यांचे प्रश्‍न मार्गी

पिंपरी - सहकारी गृहरचना संस्थांमध्ये सभासदांकडून देखभाली दुरुस्तीचा खर्च वसूल करताना येणाऱ्या अडचणी...पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी...अशा अनेक समस्या गृहनिर्माण संस्थांसमोर उभ्या असतात. मात्र, प्रत्येक महिन्याला शहरातील विविध भागांमध्ये भरवण्यात येणाऱ्या सहकार दरबारामुळे शहरातील सोसायट्यांमधील प्रश्‍न मार्गी लागले आहेत.

“पीएमपी’ बस पासवर तारखांचा घोळ

पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) प्रवाशांना देण्यात येणाऱ्या पासेसवर तारखांचा गोंधळ झाल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपी प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ही बाब एका दक्ष प्रवाशाच्या निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

शहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील 90 टक्‍के नागरिकांना वैश्‍विक ओळख क्रमांक (युआयडी) मिळाला. तसेच, शहरातील क्षेत्रीय कार्यालयात आधार कार्ड काढण्याचे काम सुरु आहे. 2010 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या सुमारे 17 लाख 27 हजार असून त्यामधील 15 लाखाहून अधिक नागरिकांनी आधार कार्ड काढलेली असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

खेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

पुणे – केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे पुण्यामध्ये म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स 2019 चे सर्वसाधरण विजेतेपद यजमान महाराष्ट्राच्या संघाने पटकाविले. तसेच मागील वर्षी विजेते असलेल्या हरयाणाला यंदा द्वितीय आणि दिल्लीच्या संघाला तृतीय क्रमांकाचा करंडक प्रदान करण्यात आला.

…आता मीटररिडींगचे छायाचित्र नसलेले वीजबील

पुणे – महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटररिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाइलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने येत्या एक फेब्रुवारीपासून वीजबिलावरील मीटररिडींगचे छायाचित्र देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नामकरणाविरोधात घरकुलवासीय एकवटले!

पिंपरी – महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या घरकुलाचे नामांतर करुन भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याच्या निर्णयाविरोधात फेडरेशन ऑफ घरकुलच्या वतीने रविवारी (दि. 20) निषेध सभा घेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. घरकुल नवनगर संकुल असे नामकरण करण्याची एकमुखी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. नाव द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तंत्रशिक्षण महाविद्यालयांवर देखरेखीसाठी “एनबीए’ पोर्टल

पुणे – तंत्रशिक्षण संचलनालयाच्या अखत्यारितील दीड हजार महाविद्यालयांवर देखरेख करणे आता अधिक सोयीचे ठरणार आहे. संचलनालयातर्फे विकसित करण्यात आलेल्या नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रिडेशन (एनबीए) पोर्टलवर लवकरच या सर्व महाविद्यालयांची एकत्रित आणि अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे.

हायपरलूपसाठी नोंदविता येणार हरकती

पुणे – सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील क्रांती समजला जाणारा हायपूरलूप हा महत्त्वकांक्षी प्रकल्प राबविण्याचा निर्णय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. या प्रकल्पासाठी हरकती मागविल्या जाणार आहेत. हायपरलूप प्रकल्पामुळे हितसंबधित व्यक्तीस किंवा थेट बाधित होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस हरकत नोंदविता येणार आहे. हायपरलूप प्रकल्पामुळे पुणे-मुंबई हे अंतर फक्त 30 मिनिटांत पार करता येणार आहे.

शेअरिंग सायकलला वाढतोय प्रतिसाद

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असताना महापालिकेने शहरातील काही भागात प्रायोगिक तत्त्वावर शेअरिंग सायकल योजना सुरु केली आहे. आता या योजनेला प्रतिसाद वाढत असून ही योजना नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरत आहे.