Thursday, 5 July 2018

क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाच्या पोस्ट तिकीटाचे रविवारी लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते अनावरण; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

पिंपरी (Pclive7.com):- क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्यात येणार आहे. या टपाल तिकीटाचे अनावरण लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते येत्या रविवारी (दि.८) रोजी चापेकर वाड्यात होणार आहे. दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट सुरु होणे ही शहरवासियांसाठी अभिमानाची  बाब आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पिंपरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाच्या पोस्ट तिकीटाचे रविवारी लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते अनावरण; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

PCMC collects Rs 181.68 crore in property tax in 3 months

PIMPRI CHINCHWAD: Around 14,000 more people benefited from v ..

‘सीओईपी’ला पिंपरीत २७ एकर जागा

भोसरी - पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शैक्षणिक विस्तारासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील २७ एकर जागा उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी नवलकिशोर राव यांनी घेतला आहे. त्यामुळे ‘उद्योगनगरीत’ ‘सीओईपी’सारख्या शासकीय दर्जेदार शिक्षण संस्थेची शाखा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. 

स्थायी समितीची सभा तहकूब

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा तहकूब करण्यात आली आहे. धुळे येथील हत्या झालेल्या पाच जणांना श्रद्धांजली वाहून ही सभा बुधवार (दि. 11) पर्यंत तहकूब करण्यात आली. यामुळे पंतप्रधान आवास योजनेचा महत्त्वाचा विषय लांबणीवर पडला आहे.

Hinjewadi-Shivajinagar Metro route to be extended till Hadapsar: PMRDA

The Pune metropolitan region development authority (PMRDA) has decided to extend the Hinjewadi to Shivajinagar Metro corridor till Hadapsar and has instructed the Delhi metro rail corporation (DMRC) to prepare a detailed project report (DPR) for the same.

The second corridor would also be carried out based on the public private partnership (PPP) model.

Parallel Harris Bridge finally opens to public

PIMPRI CHINCHWAD: The parallel Harris bridge, across the Mul ..

‘भामा आसखेड’साठीचा पुन:स्थापना खर्च माफ करा!

– जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन
– आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांची मागणी
 
पिंपरी- पिंपरी-चिंचवडसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भामा आसखेड प्रकल्पांतर्गत धरण क्षेत्रात कपात होणा-या ५३३९. १९ हेक्टर सिंचन क्षेत्राच्या पुन:स्थापन खर्च माफ करावा, अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. 

महापालिका आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी

पिंपरी (Pclive7.com):- आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात येणा-या वारक-यांना अधिक सक्षमपणे नागरी सुविधा देण्यासाठी सजग राहण्याच्या सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिका-यांना दिल्या.

तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान; उद्या आकुर्डीत

पिंपरी : आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरला जाण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, पालखीचे गुरुवारी (५ जुलै) प्रस्थान होणार आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूत दाखल झाले आहेत. पालखीचे शुक्रवारी (६ जुलै) आकुर्डी मध्ये प्रस्थान होणार आहे.

पवना धरणाच्या टेकडीवर अतिक्रमणांचा विळखा

'एनजीटी'मध्ये याचिका दाखल

पवना धरण क्षेत्रातील टेकडीच्या माथ्यावर तसेच उतारावर झालेल्या बेकायदा बांधकामांच्या विरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल झाली आहे. बांधकामामुळे मावळ तालुक्यातील जैवविविधतेचे नुकसान होत असल्याचा आक्षेप याचिकेत घेतला आहे. 'एनजीटी'ने या प्रकरणी बुधवारी पर्यावरण आणि वन विभाग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि राज्य जैवविविधता विभागाला नोटिसा पाठवल्या.

‘जागते रहो’ रात्रग्रस्त उपक्रमाची झाली सांगता

चिंचवड ठाण्यातर्फे पोलीस मित्रांचा सत्कार
चिंचवडः प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्यावतीने ‘जागते रहो’ हा रात्रगस्त उपक्रम पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या 16 वर्षांपासून राबविण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरफोड्या रोखण्यासाठी समितीच्यावतीने रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत उपक्रम राबविला गेला. 7 मे ते 30 जूनच्या काळामध्ये निगडी प्राधिकरण, चिंचवड परिसरामध्ये यामुळे मोठ्या प्रमाणात घरफोड्या रोखण्यात यश आले. पुणे शहर पोलीस परिमंडळ तीनमधील चिंचवड पोलीस ठाण्याच्यावतीने 22 पोलीस मित्रांचा प्रशस्तीपत्र देण्यात आले. विशाल शेवाळे, अमोल कानू, नितीन मांडवे, अजय घाडी, तेजस सापरिया, बाबासाहेब घाळी, मोहन भोळे, जयेंद्र मकवाना, जयप्रकाश शिंदे, संतोष चव्हाण, अमित डांगे, अमृत महाजनी, मनोज ढाके, सतीश मांडवे, अश्‍विन काळे, राजेश बाबर, समीर चिले, रेखा भोळे, विभावरी इंगळे, गौरी सरोदे या कार्यकर्त्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुबडे यांनी सत्कार केला.

State likely to tell Pimpri Chinchwad Municipal Corporation to supply water to Alandi

PIMPRI CHINCHWAD: The state environment department will dire .. 

मेट्रोसाठी 312 कोटी पुरवणी मागणीतून राज्य सरकारची तरतूद

नागपूर : राज्य सरकारचे समभागापोटी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी 312 कोटी 76 लाख रुपयांची तर नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची जादा तरतूद विधिमंडळाच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी बुधवारी (ता. 4) पुरवण्या मागण्यांमध्ये करण्यात आली. नगरविकास विभागाच्या सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये हा जादा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

दोन सायकल ट्रॅक अस्तित्वात, वापर होत नसल्याचे उघड

पिंपरी : सायकल चालविणे शारीरिक तंदुरुस्तीसाठी चांगले समजले जाते. नागरिकांना सायकल चालविण्याची सवय लागावी म्हणून महापालिकेने दोन ठिकाणी सायकल ट्रॅक सुरू केले आहेत. मात्र, शहरवासीयांना याचा पत्ताच नसल्याचे समोर आले आहे. 

लोकलच्या दोन फेऱ्या शनिवारपर्यंत रद्द

पुणे : कामशेतजवळ देखभाल-दुरुस्तीसाठी 4 ते 7 जुलै दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्या दरम्यान पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलच्या दोन फेऱ्या रद्द केल्या आहेत तर, दोन लोकलच्या फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. 

चेंबरच्या 35 झाकणांची चोरी

पिंपरी – सध्याच्या काळात चोर कशी व कोणत्या वस्तूची चोरी करतील हे सांगणे कठीण आहे. आत्तापर्यंच सोने, चांदी, वाहने अशी चैनीची साधने चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, चोरीचा नवीन प्रकार ऐकून कोणालाही धक्का बसेल. नवी सांगवी येथे महापालिकेने बसवलेली चेंबर्सची चक्क 35 झाकणे एका रात्रीत चोरीला गेली आहेत.

‘पीसीपीएनडीटी’ कायद्याविषयी नागरिकांना धडे

पिंपरी – पीसीएमसी रेडीओलॉजीस्ट संघटना व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे आयोजीत एका दिवसीय चर्चासत्रात नागरिकांना प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा (पीसीपीएनडीटी) संदर्भात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

30-minute check mandatory for buses before trips


PMPML to check buses run by private contractors


पानसरे यांचे मीठच आळणी...

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने आमदारकीची त्यांची संधी पुन्हा एकदा निसटली आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षाला मदत करो त्यांचे मीठच आळणी असल्याची खंत त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली; तर पानसरे यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा असलेले महामंडळ अथवा आगामी काळात 2020 मध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागांवर संधी मिळण्याची शक्यता भाजपाच्या वर्तुळात वर्तविली

#SaathChal आषाढी वारीवर आधारित छायाचित्र स्पर्धा

पुणे - ‘भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी ॲण्ड सिनेमॅटोग्राफी’ व ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ यांनी आषाढी वारीवर आधारित छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. हौशी, नवोदित व अनुभवी छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा खुली असून, विजेत्यांना एकूण २५ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येतील.  

सत्ताधारी-विरोधकांमध्ये श्रेयवादासाठी चढाओढ

पिंपरी – आषाढी वारीतील दिंड्यांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तु न देण्यावर जवळपास सहमती झालेल्या सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्षमण जगताप यांच्या सुचनेनंतर अखेर नरमले. मात्र, आता या भेटवस्तुवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या कामाचे श्रेय घेण्यासाठी अक्षरश: चढाओढ लागली आहे. तसेच ही परंपरा आम्ही खंडीत होऊ न दिल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.

ज्ञानप्रबोधिनी शाळेतील गुरुकुल विभागाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात नोंदवला सहभाग

भारत विकास परिषदेतर्फे नैसर्गिक शिक्षण संस्थेत वृक्षारोपण
विद्याथ्यार्र्ंना लागते पर्यावरणाची गोडी

लोणावळाः भारत विकास परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्यावतीने मळवली मधील नैसर्गिक शिक्षण संस्थेत वृक्षारोपण करण्यात आले. नैसर्गिक शिक्षण संस्थेच्या आवारात जांभूळ, पिंपळ, करंज, वड, आंबा आणि काही जंगली वनस्पतींची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला भारत विकास परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेचे सभासद सहकुटुंब उपस्थित होते. तसेच निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील गुरुकुल विभागाच्या विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाची गोडी निर्माण होते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडांचे महत्व समजते. झाडे नसतील तर आपण कसे जगणार, हे त्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले जाते.