Pimpri Chinchwad will get augmented water supply, from the Pavana river in the third and fourth phases of the project.The indicative cost of the augmentation is Rs 4.58 crore and a six-month deadline has been set for it.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 8 February 2018
कोकणे चौक ते काळेवाडी फाटा उच्चक्षमता द्रुतगती मार्गाला मंजुरी
नवी सांगवी (पुणे) : पिंपळे सौदागार -रहाटणी येथील कोकणे चौक ते काळेवाडी फाटा उच्चक्षमता द्रुतगती मार्गाच्या (एचसीएमटीआर) प्रस्तावाला स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मार्गासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षा सिमा सावळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नगरसेविका व स्थायी समिती सदस्या निर्मला कुटे यांनी 28 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर केल्याचे सांगितले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांना स्थायीची मंजूरी
चौफेर न्यूज – अमृत योजने अंतर्गत चिखली, पिंपळे निलख व बोपखेल येथे मैलाशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येणार आहेत. शहरातील जुन्या २०९ किलोमिटर ड्रेनेज लाईन बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी येणा-या सुमारे १५६ कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील २०१८-२०१९ या वर्षासाठी करांचे व करेत्तर शुल्क निश्चित करण्यास अंतिम मान्यतेसाठी महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस स्थायी समिती सभेत करण्यात आली. यासह शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे २५७ कोटी ५३ लाख ९३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. शहरामध्ये ज्या मिळकतींना पाणी कनेक्शन नाही परंतु त्यांना स्वत्रंत कनेक्शन घेण्याच्या दृष्टीने महानगरपालिके मार्फत पाणीपुरवठा लाईन टाकणेत आलेली असते. निर्धारित तरतूदीनुसार त्याकरिता पाणी कनेक्शन नसणा-या मिळकतींना मिळकत करामध्ये पाणीपट्टी कर आकारणी करता येईल. त्या अनुषंगाने सन २०१८-२०१९ पासून पाणी कनेक्शन नसणा-या मिळकतींना मिळकत कराचे बिलात त्यांचे कर योग्य मूल्याचे ५% दराने पाणीपट्टी कर लागू करणेबाबत प्रस्तावित केले आहे. सन २०१८-१९ या वर्षाकरिता महानगरपालिका करांचे दर आणि करेत्तर बाबीची फी/शुल्क निश्चित करण्याचा व खाजगी मराठी माध्यामांच्या शाळा इमारतींना मालमत्ता कर हा बीगरनिवासी दराचे ऐवजी निवासी दराने आकारणी करणेस तसेच करयोग्यमूल्य निश्चित करणेकामी जे अ,ब,क,ड विभाग करणेत आलेले आहेत त्याची पुनर्रचना करण्यास मान्यता देणेकामी महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस यावेळी बैठकीत करण्यात आली.
पिंपळे निलखमध्ये चौंधे पाटील स्पोर्टसच्या वतीने सोसायटी स्पोर्टस मिटचे आयोजन
चौफेर न्यूज – पिंपळे निलख येथील चौंधे पाटील स्पोर्टसच्या वतीने तिस-या वार्षिक इंटर सोसायटी स्पोर्टस मिटचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी (दि. 11 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका आरती चौंधे, ममता गायकवाड, नगरसेवक संदिप कस्पटे, तुषार कामठे, पीसीएमटीचे माजी चेअरमन सुरेश चौंधे आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती संचालक संकेत चौंधे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
‘आधार’शी ड्रायव्हिंग लायसन्सही जोडले जाणार
चौफेर न्यूज – बनावट परवान्याची समस्या दूर करण्यासाठी परवान्याला आधार क्रमांकाशी जोडण्याचे काम सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली. सर्व राज्यांचा यात समावेश करत एक नवीन सॉफ्टवेअर तयार केले जात आहे. न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या पीठाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. के एस राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील रस्ते सुरक्षा समितीने याची माहिती दिली. समितीने दिलेली ही माहिती महत्वाची आहे. कारण सध्या सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय संविधान पीठ आधार योजना आणि त्यासंबंधीत कायद्याचे संवैधानिकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी करत आहे.
अमृत योजनेतून सुधारणार पिंपरी चिंचवडमधील ड्रेनेज व्यवस्था: स्थायी समितीचा निर्णय
केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या माध्यमातून शहरातील ड्रेनेजव्यवस्था सुधारणार आहे. या योजनेत मंजूर झालेला १४८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला आज (बुधवारी) स्थायी समितीने मंजुरी दिली. बोपखेल, चिखली आणि पिंपळे निलख या ठिकाणी एसटीटी प्रकल्प होणार आहेत. शहरातील गावठाण भागातील व जुन्या झालेल्या ड्रेनेजलाईन बदलण्याचे मोठे काम या प्रकल्पातून होत आहे.
पिंपरी आठ तास ड्युटीचा पहिला प्रयोग
पिंपरी : कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी खासगी नोकरी प्रमाणेच पोलिसांना आठ तास ड्युटी द्यावी अशी मागणी नेहमी होते. नुकताच मुंबई पोलिसांनी हा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली असून, सर्वप्रथम पुणे पोलिसांतर्गत येणाऱ्या भोसरी पोलिस ठाण्यात हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला होता. त्यामुळे शहर पोलिसांकडून मुंबई पाठोपाठ पुण्यात पुन्हा आठ तास ड्युटीची देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जीवघेणा मार्ग
बोपोडी ते अंडी उबवणी केंद्र रस्त्याची दुरवस्था
पुणे - वार मंगळवार, वेळ दुपारी ठीक १.५७ ची, स्थळ खडकी रेल्वे स्थानकासमोरील रस्ता. याच रस्त्याच्या कडेला थांबलेली एक वृद्ध व्यक्ती दुचाकीला ‘किक’ मारून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर गाडी चढविण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात काँक्रीट रस्त्याच्या ‘कडा’ला लागून गाडी घसरते आणि वृद्ध व्यक्ती रस्त्यावर जोरदार आपटते. दैव बलवत्तर पाठीमागून मोठे वाहन नव्हते, परंतु ही संधी त्या दोन नागरिकांना मिळाली नाही. रस्त्याच्या कडेला थांबूनही त्यांना जीव गमवावा लागला. बोपोडी ते अंडी उबवणी केंद्रापर्यंतचा रस्ता व त्याभोवतीच्या दुरवस्थेमुळे अपघाताच्या घटना घडूनही रस्ता दुरुस्तीबाबत महापालिका व खडकी कॅंटोन्मेंट प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याची सद्यःस्थिती आहे.
पुणे - वार मंगळवार, वेळ दुपारी ठीक १.५७ ची, स्थळ खडकी रेल्वे स्थानकासमोरील रस्ता. याच रस्त्याच्या कडेला थांबलेली एक वृद्ध व्यक्ती दुचाकीला ‘किक’ मारून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर गाडी चढविण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात काँक्रीट रस्त्याच्या ‘कडा’ला लागून गाडी घसरते आणि वृद्ध व्यक्ती रस्त्यावर जोरदार आपटते. दैव बलवत्तर पाठीमागून मोठे वाहन नव्हते, परंतु ही संधी त्या दोन नागरिकांना मिळाली नाही. रस्त्याच्या कडेला थांबूनही त्यांना जीव गमवावा लागला. बोपोडी ते अंडी उबवणी केंद्रापर्यंतचा रस्ता व त्याभोवतीच्या दुरवस्थेमुळे अपघाताच्या घटना घडूनही रस्ता दुरुस्तीबाबत महापालिका व खडकी कॅंटोन्मेंट प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याची सद्यःस्थिती आहे.
'स्मार्ट' औषधांचा रामबाण
पुणे - औषध म्हटले की तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या, पातळ औषध असे सर्वसामान्य प्रकार आपल्याला माहिती आहेत, पण आता आधुनिक काळातील प्रगत संगणक विज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग आणि बायोटेक्नॉलॉजी यामुळे "डिजिटाइज्ड मेडिसिन्स'चे युग सुरू झाले आहे. त्यातून औषधे "स्मार्ट' होताना दिसत आहेत.
MSEDCL intensifies dues recovery drive
Around 1,400 employees, including engineers, officers and janamitra (on field staffers) were briefed by regional director Sanjay Taksande and chief engineer M G Shinde.
वाकडमध्ये वाढल्या भुरट्या चोऱ्या
उच्चभ्रू वाकड परिसरात सध्या भुरट्या चोरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या यमुनानगर, वाकड परिसरात भाजीपाला, कोंबड्या, कपडे, धान्य चोरीला जाण्याचे प्रकार घडत आहेत.
पीएमपीला शिस्त लावली, कामचुकारांना बाजूला केले: मुंढे
पुणे : माझ्या कार्यकाळात पीएमपीएमएलमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले. जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर आणण्याचा कायम प्रयत्न राहिला. संस्था बळकट करण्यासाठी विविध निर्णय घेतले. संस्थेला शिस्त लावली, कामचुकरांना बाजूला केले. चांगलं काम करण्याऱ्यांचे कौतुकही केले, असे पीएमपीएमएलचे माजी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
[Video] विविध मागण्यांसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा
पुणे – राज्य सेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करावी, 30 टक्के नोकर कपात धोरण शासनाने तत्काळ रद्द करावे, आयोगाने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घ्यावी, परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर बसवावे, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे हजारो उमेदवारांनी लक्षवेधी मोर्चा काढला.
स्थायी समितीची “लक्ष्मण’रेषा!
11 सदस्यांचे राजीनामे : महापालिकेचा “रिमोट’ जगतापांकडेच
– अधिक दिवे
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची “तिजोरी’ असलेल्या स्थायी समितीवरील कार्यकाळासाठी “लक्ष्मण’रेषा आखली असून, बुधवारी झालेल्या “लकी ड्रॉ’ पूर्वी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजप व सहयोगी अशा सर्व 11 सदस्यांचे राजीनामे घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे “ड्रॉ’मधून बाहेर पडलेल्या सहा सदस्यांसह अन्य पाचही सदस्यांना “स्वेच्छा निवृत्ती’ घ्यावी लागणार आहे, अशी माहिती महापालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची “तिजोरी’ असलेल्या स्थायी समितीवरील कार्यकाळासाठी “लक्ष्मण’रेषा आखली असून, बुधवारी झालेल्या “लकी ड्रॉ’ पूर्वी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजप व सहयोगी अशा सर्व 11 सदस्यांचे राजीनामे घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे “ड्रॉ’मधून बाहेर पडलेल्या सहा सदस्यांसह अन्य पाचही सदस्यांना “स्वेच्छा निवृत्ती’ घ्यावी लागणार आहे, अशी माहिती महापालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
Pune: After nine months at helm of PMPML, IAS Tukaram Mundhe transferred to Nashik
He had taken a series of contentious decisions, including a fare hike; Did my best to turn around PMPML, says Mundhe.
राष्ट्रवादीचा गुरूवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा
पिंपरी चिंचवड शहरात सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे रोजगाराला मोठा फटका बसत आहे. बेरोजगारांच्या विषयी शासनाच्या उदासीन धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने गुरूवारी दि.८ रोजी प्राधिकरण येथील तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी याबाबत माहिती दिली.
तुकाराम मुंढेंची बदली; पक्षनेते एकनाथ पवारांच्या पाठपुराव्याला यश
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची बदली करावी, अशी मागणी पिंपरी महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुख्यामंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. मुंढे पीएमपीचा कारभार सुधारण्याऐवजी कर्मचा-यांवर कारवाया करत असल्याने नगरसेवक, पदाधिकारी त्यांच्यावर नाराज असल्याचे एकनाथ पवार यांनी म्हटले होते.
आयपीएस सारंग आव्हाड पीएमआरडीएचे अनाधिकृत बांधकाम नियंत्रक
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मध्ये नुकतीच अनाधिकृत बांधकाम नियंत्रक म्हणून आयपीएस अधिकारी सारंग आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पीएमआरडीए मध्ये रुजू देखील झाले आहेत. आयपीएस अधिकारी सारंग आव्हाड हे यापूर्वी राज्य राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) समादेशक म्हणून कार्यरत होते.
स्थायी समितीत भाजपचे नवे चेहरे
पिंपरी - महापालिका स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्यासह भाजपच्या सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांची नावे बुधवारी लॉटरी पद्धतीने वगळण्यात आली. समितीतील भाजपच्या दहा नगरसेवकांचे आणि त्यांना पाठिंबा दिलेल्या एका अपक्ष नगरसेवकाचे स्थायी समितीच्या सदस्यत्वाचे राजीनामे आज पक्षाने घेतले. नवीन सदस्यांच्या निवडीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेण्यात येणार आहे.
सेंट ॲन्स स्कूलकडून डोनेशन आकारणी
पिंपरी - तळवडे-त्रिवेणीनगर येथील सेंट ॲन्स स्कूलने १९९८ ते २०१० यादरम्यान महापालिकेकडून विशेष बाब म्हणून करमाफीची सवलत मिळविली. मात्र, विशेष सवलत प्राप्त करूनही शाळेने डोनेशन आकारले आहे. ते नियमबाह्य असल्याने शाळेकडून दंडासहित कर वसूल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर गोरडे यांनी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे केली.
पुरंदर विमानतळाला रिंगरोडची कनेक्टिव्हीटी
पुणे : पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नुकतीच संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे. विमानतळावर जाण्यासाठी रोडची कनेक्टिव्हीटी देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील रिंगरोड हा आंबेगाव खुर्द-उरुळी-वडाची वाडी-वाघोली हा मार्ग विमानतळाच्या काही किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाने पुरंदर विमानतळाकडे जाण्यासाठीचा 18 किमी लांबीचा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विमानतळाकडे जाण्यासाठीचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
रिंगरोडवर ट्रान्सपोर्ट वाहनांनाच लागणार टोल
पीएमआरडीएची केंद्र शासनाकडे 2 हजार 468 कोटींची मागणी : ‘भारतमाला’ प्रकल्पामध्ये समावेश
‘हायब्रीड अॅन्युटी मॉडेल’ नुसार रिंगरोडचे होणार काम
128.66 किमी लांबीचा आणि 10 पदरी मार्ग असणार
एकूण प्रकल्पासाठी 13 हजार 500 कोटींची आवश्यकता
‘हायब्रीड अॅन्युटी मॉडेल’ नुसार रिंगरोडचे होणार काम
128.66 किमी लांबीचा आणि 10 पदरी मार्ग असणार
एकूण प्रकल्पासाठी 13 हजार 500 कोटींची आवश्यकता
पोलीस मित्रांना प्रशस्ती पत्रकांचे वाटप
चिंचवड – मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यात पोलीस यंत्रणेला बंदोबस्तामध्ये मोलाची मदत करणाऱ्या नागरिक पोलीस मित्रांना प्रशस्ती पत्रकांचे वाटप करण्यात आले.
Subscribe to:
Posts (Atom)