Wednesday, 1 November 2017

पिंपरी-चिंचवडला होणार वाहन पासिंग, ब्रेक टेस्ट ट्रॅकवर चाचणी घेणे बंधनकारक

वाहन योग्यता तपासणीचे नूतनीकरण पिंपरी-चिंचवडसह राज्यातील १४ वाहन तपासणी मार्गावर (ट्रॅक) करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली. राज्यातील कोणत्याही वाहनास उपलब्ध ट्रॅकवरुन वाहन तपासणी करता ...

मेट्रो मार्गिका विस्तारीकरणासाठी लोकचळवळ

शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी मेट्रोचे काम प्रगतीपथावर असतानाच मेट्रो मार्गिकांच्या विस्तारीकरणाचाही विचार विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि जागरूक नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन सुरू केला असून जागरूक ...

मेट्रो, लोकल अन्‌ बीआरटी

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पुणे-मुंबई रस्त्यावर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे वेगाने सुरू झाले असून, तीन वर्षांत या रस्त्यावरून पुण्यात ये-जा करण्यासाठी नागरिकांना तीन सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहेत. बीआरटी बससेवा, लोकल रेल्वे आणि मेट्रो या वाहतूक सेवांमुळे या दोन्ही शहरांतील नागरिकांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास करता येईल.

चिखली ‘आरटीओ’त दलालराज

चिखली - परिवहन कार्यालयाच्या परिसरात दलालांना मज्जाव करावा, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. परंतु पिंपरी-चिंचवड कार्यालच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरातील दलाल हटविण्यात आलेले नाहीत. उलट आधिकाऱ्यांबरोबर कार्यालयीन कागदपत्रेही ते हाताळत आहेत. विशेष म्हणजे हे दलाल वाहन परवाना देताना अर्जदार आणि आधिकाऱ्यांमध्ये ‘आर्थिक दुवा’ म्हणून दलाल भूमिका बजावत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

शहरबात पिंपरी-चिंचवड आयुक्तांना सूर गवसेना

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झालेल्या श्रावण हर्डीकर यांना सहा महिने पूर्ण झाले. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असल्याने हर्डीकर यांच्याकडे भक्कम राजकीय पाठबळ आहे. पिंपरीत भाजपची सत्ता असल्याने त्यांना ...

PCMC's Empire Estate residents up in arms against ramp on flyover

In 2010, the residents had opposed the project itself, but the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) assured them to provide various amenities in the space under the flyover. This time, the society members have alleged that they would have to ...

Elected civic body leaders to get Smart City training

... under CEPT University's CEPT Research & Development Foundation (CRDF) in association with Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) of the Pune Metro city has organised a capacity building workshop for elected representatives of PCMC.

बांधकामाच्या बाजारमूल्यावर करआकारणी, महापालिका स्थापनेनंतर पहिल्यांदाच फेररचना

महापालिका स्थापनेनंतर पहिल्यांदाच मिळकत दरात (रेटेबल व्हॅल्यू) फेररचना करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे वार्षिक मूल्य दर (रेडिरेकनर) व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास ...

पश्चिम महाराष्ट्रातील गाड्या 'पासिंग'साठी पुण्यात

पुण्यासह बारामती, कोल्हापूर, कराड येथील वाहने पासिंगसाठी पिंपरी-चिंचवड येथील आरटीओ ट्रॅकवर आणण्यात येणार आहेत. या पाचही ठिकाणची वाहने येथे आल्याने पासिंगच्या कामावर ताण येऊन विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चिंचवड विधानसभा : राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान!

विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी असला तरी इच्छुकांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची विधानसभेत तरी परिस्थिती सुधारणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. खासकरून चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कोणाला उतरवणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

विजेच्या प्रश्नाबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली आढावा बैठक

पिंपरी चिंचवड शहरामध्ये विजेचा लपंडाव गेली अनेक दिवसांपासून चालू आहे. थेरगाव, काळेवाडी, वाकड, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावेत तसेच सांगवी, पिंपळे सौदागर या भागात लाईटच्या अनेक समस्या आहे. विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नाहीत. अनेक वेळा ऑफिसमधील फोन उचलून ठेवला जातो. अशा अनेक तक्रारी नागरिकांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे कडे केल्या होत्या त्या तक्रारीची दखल घेऊन खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पुणे विभागाचे मुख्य अभियंता एम.जी. शिंदे यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक महेंद्र दिवाकर, नगरसेवक निलेश बारणे, सचिन भोसले, रेखा दर्शिले, माई काटे, गजानन चिंचवडे व विद्युत विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Don't buy 400 diesel buses, buy CNG: Pune citizens write to PMPML

Civic activists and various organisations including Parisar and Jhatkaa.org, on behalf of Pune citizens, have written to PMPML and Pune and Pimpri-Chinchwad mayors asking them to reconsider this decision. “Around 900 Punekars have signed an online ...

No shelter, no food and zero funds: This is the state of most of Pune's animal welfare centres

Amidst increasing cases of animal cruelty and complaints of stray menace on the rise, an introspective look into the city's current animal welfare and sterilisation centres reveals a darker shade. While Pimpri-Chinchwad and Pune Municipal Corporation ...

‘द्रुतगती’वरही उतरणार विमान?

पिंपरी - गेल्या आठवड्यात लखनौ-आग्रा महामार्गावर भारतीय हवाई दलाचे विमान उतरविण्यात आले होते. तशाप्रकारचा प्रयोग पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर राबवता येऊ शकतो का, याची चाचपणी सुरू झाली आहे. त्यासाठी द्रुतगती मार्गावरील उर्से आणि खालापूर या दोन ठिकाणांची माहिती रस्ते विकास महामंडळाने लष्कराला दिल्याचे कळते.

देशासाठी पटेलांचे योगदान महत्वाचे- आयुक्त हर्डीकर

वाल्हेकरवाडी : सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाबद्लचे योगदान युवा पिढीला माहीत व्हावे व जी एकात्मता त्यांनी जोडली. ती आपण एकसंध ठेवूया त्यांचे असणारे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे श्रावण हर्डीकर यांनी आज चिंचवड येथे एकता दौडला संबोधित करतांना केले.

जिल्हा रुग्णालयाचा आमदार जगताप यांनी घेतला आढावा

पिंपरी – औंध येथील जिल्हा रुग्णालयात अनेक समस्या आहेत. या समस्यांचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी (दि. 30) रुग्णालयाला भेट दिली. या वेळी रुग्णालयाच्या कामकाजावर नाराजी दर्शवत काम सुधारण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. के. शेळके यांना त्यांनी दिल्या.

खेडच्या हद्दीत प्रवेश करताच वाहतूक कोंडीची साथ

चाकण- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तसेच तळेगाव -शिक्रापूर रस्त्या जवळ असलेल्या औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यावरून अवजड वाहने सर्रास धोकादायक पद्धतीने चालविण्यात, वळविण्यात येत आहेत. त्यामुळे अशा बेशिस्त रहदारीमुळे या महामार्गावरील आंबेठाण चौक, चिंबळी फाटा, मुऱ्हे वस्ती, कुरुळी, निघोजे गावांकडे जाणारे रस्ते व चौक व विशेषतः आळंदी फाट्या जवळील औद्योगिक वसाहतीत जाणारा रस्ता वाहतूक कोंडीला निमंत्रण देणारा आणि धोकादायक ठरत आहेत. मोशी येथील टोलनाका ओलांडून पुढे खेड तालुक्‍याच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर प्रत्येक चौकात वाहतुकीची कोंडी नित्याचीच आहे. मागील अनेक वर्षे वाहतूक कोंडीच्या समस्याने ग्रासलेल्या वाहनधारकांची या संकटातून सुटका कधी होणार असा यक्ष प्रश्‍न निर्माण झाला आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर असल्याने पुढील काळात सुरुवात होईलच मात्र, तो पर्यंत दररोजच्या त्रासाला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.

खबऱ्यांमुळेच फुटते खुनांच्या घटनांना वाचा

पिंपरी : टेक्नोसॅव्ही पोलिसिंगवर सध्या भर दिला जात आहे. मात्र, यामुळे खबऱ्यांचे जाळे दिवसेंदिवस क्षीण होत असून, पोलिसांच्या तपासावर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसतो. परंतु, काही ठराविक कर्मचारी-अधिकाऱ्यांनी खबऱ्यांचे हेच ...

प्रतीक्षा सर्वांसाठी घरांची

पिंपरी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने वार्षिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. ... त्यात बृह्नमुंबई पुण्यासह पिंपरी-चिंचवड, नागपूर, ठाणे, नाशिक, नवी ...