Saturday, 24 June 2017

Finally, Pimpri Chinchwad finds a place in big league

"The Smart City plan submitted by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) was evaluated on Friday. The plan was based on citizens' participation," he said. The citizens have already selected Pimple Saudagar-Wakad for area-based ...

शहरातील नाल्यांना अतिक्रमणाचा विळखा

पिंपरी - शहरात नाले बुजवून तसेच नाल्यांची दिशा बदलून ठिकठिकाणी बांधकामे होत आहेत. मात्र, या बांधकामांकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. एवढेच नाही तर काही ठिकाणी महापालिकेनेच नाल्यांवर बांधकाम केल्याचे "सकाळ'ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्‍यता आहे. 

“डीवाय’ व अभियांत्रिकी महाविद्यालयात सामंजस्य करार

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी पिंपरी व पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यामध्ये तंत्रज्ञानासंदर्भात सामंजस्य करार झाला.
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. विद्या प्रतिष्ठानच्या अंतर्गत असणारे डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी येथे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे यांच्यामध्ये तंत्रज्ञानासंदर्भात सामंजस्य करार झाला. यासाठी डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे संचालक डॉ. बी. बी. अहुजा उपस्थित होते.

उद्योगनगरीच्या 'स्मार्ट' विकासाला गती

पिंपरी : महापालिका निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करू, असे आश्वासन दिल्यानंतर महापालिका आणि राज्य सरकारकडून नगरविकास ...

तुम्ही पिंपरी चिंचवडमधील PMP बससेवेबद्दल समाधानी आहात?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अंतर्गत भागात पीएमपी बससेवा पुरेशा प्रमाणात नाही, असे आहे लोकप्रतिनिधींचे म्हणणे. त्यासाठी त्यांनी पीएमपी प्रशासनाला द्यावयाचे सहा कोटी रुपये अडवून धरले आहेत. आतापर्यत महापालिकेने पाचशे कोटी रुपये दिले आहेत. पुरेशा गाड्या आहेत, असा पीएमपी प्रशासनाचा दावा आहे..
या वादामुळे काही नवे बसमार्ग सुरू होतीलही. जादा गाड्याही मिळतील. पण मार्ग तोट्यात सुरू राहिल्यास त्या बंदही होतील. त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांना कोणते नवे मार्ग हवे आहेत. त्याच्या वेळा काय असाव्यात. यावर आपले म्हणणे थोडक्यात कळवावे. त्यांचे एकत्रित मुद्दे पीएमपी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोचविता येतील. 
प्रतीक्षा आहे तुमच्या प्रतिक्रियेची...

पुर्नवसन प्रकल्पातील इमारतींची दूरवस्था

– राष्ट्रवादी कॉंग्रेसची महापालिकेकडे तक्रार
पिंपरी, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड शहर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक 19 भाटनगर येथील पुर्नवसन प्रकल्पातील इमारतीची डागडुजी करण्याची मागणी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

बांधकाम, कर संकलनमध्ये सर्वाधिक आक्षेप

– “ऑडीट’नंतर लेखापरिक्षकांचा खुलासा
पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या लेखापरिक्षकांकडून सन 2008-09 व 2009-10 या दोन आर्थिक वर्षांत बांधकाम परवानगी, करसंकलन, उद्यान विभाग, अग्निशमन, कार्यशाळा, नागरवस्ती, सार्वजनिक वाचनालय, आरोग्य, लेखा विभाग आदी विभागात प्रलंबित आक्षेप, आक्षेपाधिन रक्कम व “रेकॉर्ड’ उपलब्ध न झालेली प्रलंबित रक्कम “ऑडीट’नंतर आढळून आली आहे.

ताडपत्री खरेदी गैरव्यवहाराची चौकशी सुरूच नाही

आयुक्तांची माहिती : चौकशी समिती नेमल्याचा दावा खोटा
 पिंपरी, (प्रतिनिधी) – पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांना भेट देण्यासाठी केलेल्या ताडपत्री खरेदीतील गैरव्यवहाराबाबत आयुक्तांनी त्रीसदस्यीय चौकशी समिती नेमल्याचा दावा स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी केला होता. त्यांचा हा दावा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी फेटाळला असून प्रशासनाकडून कोणतीही चौकशी अद्याप सुरू केली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ताडपत्री खरेदी, गैरव्यवहार व चौकशीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘स्वराज्य’तर्फे शालेय साहित्यासाठी विद्यार्थी दत्तक

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिर येथील 21 विद्यार्थ्यांना स्वराज्य बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेतर्फे शैक्षणिक खर्चासाठी दत्तक घेण्यात आले आहे.