Wednesday, 21 March 2018

‘हॅरिस’चा समांतर पूल एक मेपासून खुला

पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील हॅरिस पुलालगत आणखी दोन समांतर पूल बांधण्याचे काम वेगात सुरू असून, पिंपरीकडून पुण्याकडे जाणारा पूल एक मेपासून वाहनचालकांसाठी खुला करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. पुण्याकडून पिंपरीकडे जाणाऱ्या पुलाच्या बांधकामाला अडथळा ठरणाऱ्या बोपोडीतील झोपड्यांचे स्थलांतर करण्यास येत्या आठ-दहा दिवसांत सुरवात होईल. त्या पुलाच्या नदीपात्रातील स्लॅबचे काम सुरू झाले आहे. 

राजकीय पाठीराख्यांमुळेच बेशिस्तीला बळ

चिखली - गुन्हा केला म्हणून पोलिस ठाण्यात आणलेला आरोपी असो नियम तोडला म्हणून वाहतूक पोलिसाने पकडलेला वाहनचालक असो, यांना राजकीय ‘पाठीराखा’ असतो. त्यामुळे पोलिसांच्या कामांत हस्तक्षेप नित्याचाच झाला आहे. आपण गुन्हा केला असल्याचे माहीत असताना; तसेच नियम तोडून अरेरावीची भाषा वापरणारे बेशिस्त वाहनचालक महिला पोलिसांना अरेरावीची भाषा करतात. कार्यकर्त्यांची चूक असताना तोऱ्यात हे पाठीराखे ‘त्यांना सोडून द्या’ असे सांगून गुन्हेगारीला बळ देतात.

पिंपरीत आता पूर्णवेळ पासपोर्ट सेवा केंद्र

पिंपरी - शहरातील नागरिकांना पासपोर्ट काढणे सुसह्य व्हावे, यासाठी पिंपरीतील टपाल कार्यालयात सुरू केलेल्या सेवेत लवकरच बदल करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत याचे रूपांतर पूर्णवेळ पासपोर्ट सेवा केंद्रात होणार असून, त्यामुळे नागरिकांना जलदगतीने सेवा मिळणार आहे.

पुणे- लोणावळा लोकलची तिकिटे आता मोबाईलवर मिळणार !

पुणे : पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची तिकिटे आता येत्या आठ दिवसांत मध्य रेल्वेच्या utsapp या ऍपवर उपलब्ध होणार आहेत.

वीजबिलावरील पत्ता बदला एका क्‍लिकवर

पुणे - वीजबिलावर चुकीचा पत्ता येतोय ? त्यामध्ये दुरुस्ती करायची आहे? काळजीचे कारण नको. आता एका एसएमएसद्वारे तुम्ही ही दुरस्ती करू शकता. अर्थात, ही सुविधा महावितरणकडे ज्या ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली त्यांनाच वापरता येणार आहे. 

मोकळ्या भूखंडांची कचराकुंडी

भोसरी - इंद्रायणीनगरातील प्राधिकरणाच्या भूखंडांवर नागरिक राडारोडा व कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. काहीजण घरबांधणीनंतर उरलेला राडारोडा टाकतात. काही लघुउद्योजक कारखान्यातील टाकाऊ पदार्थ टाकतात. त्यामुळे इंद्रायणीनगरातील मोकळे भूखंड कचरा कुंडी झाले आहेत.

मशिन मिळेना, रांग संपेना!

पुणे - तुम्हाला आधार कार्ड काढण्यासाठी अजून काही दिवस तरी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार आहे. कारण, आधार नोंदणी मशिनची संख्या वाढविण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना एकीकडे यश मिळत नाही, तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातून पुण्यात येणारी ३९ पैकी १४ मशिन बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. 

गुन्हेगारांचे उद्योगनगरीत वास्तव्य

पोलीस खात्यातील खाबुगिरी, उदासीनता यांसारख्या कारणांमुळे ठोस कारवाई होताना दिसत नाही.

शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई

शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास न्यायालयाने बंदी घातली

स्थायी समितीत ५ नवीन सदस्यांची निवड

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या ५ सदस्यांच्या जागेवर भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, विकास डोळस, अर्चना बारणे यांची तर अपक्ष आघाडीच्या साधना मळेकर यांची निवड करण्यात आली. आजच्या सर्वसाधारण सभेत या नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

पिंपरीत एकेरी वाहतुकीचे तीन तेरा

शहरात अनेक ठिकाणी ‘नो-एन्ट्री’चे फलक असतानाही बेशिस्त वाहनचालक वाहतूक नियम धाब्यावर बसवून, ‘नो-एन्ट्री’मधून प्रवास करत आहेत. या यामुळे ‘नो-एन्ट्री’तून वाहनधारक सर्रास वाहने चालवत आहेत. यामुळे अनेकदा समोरासमोर वाहने येऊन उभी टाकत असल्याने एकेरी मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक पोलिसांनी या बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Water-soluble starch bags in offing after Maharashtra bans plastic

Vitthal Kate, corporator from Pimple Saudagar in Pimpri-Chinchwad, welcomed the move and said it would lend greater urgency to stop the use of plastic utility items.

Road accidents in Pune jump 9.59% in 2017

PUNE: The city registered a 9.59% increase in the number of road accidents in 2017 over the previous year. While every other city in the state managed to make its roads safer in 2017 as against 2016, Pune was the only one where the number of accidents had gone up.

Saving the sparrow: Artificial nests see high acceptance, breeding success, says study

The breeding success by the house sparrows at the nests was 72.6 per cent, said Dr Pande while releasing the report ahead of World Sparrow Day that is observed on March 20.

जागतिक चिमणी दिवस...


दररोज २८ जण 'सायबर क्राइम'च्या

पुणे - ‘मॅडम मी एका विमा कंपनीकडून बोलत आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे तुम्हाला दहा वर्षांसाठी दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बॅंक स्टेटमेंट, कॅन्सल चेक माझ्या व्हॉटस्‌ॲपवर पाठवा.’’ अशा शब्दांत येरवड्यात राहणाऱ्या एका गृहिणीच्या मोबाईलवर एका महिलेने संवाद साधला. वारंवार फोन आल्यावर विश्‍वास ठेवून तिने साठ हजार रुपये भरले. दिवसागणिक आणखी पैशांची मागणी होत गेली.

बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी सहा महिन्यांत योजना आणा

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
नवी दिल्ली – बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या हितासाठी सहा महिन्यांत योजना आणण्याचा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला. हा आदेश देताना न्यायालयाने बांधकाम कामगार केवळ पायाभूत सुविधा उभारत नाहीत; तर देशाची उभारणी करतात, असे म्हटले.

आता अॅट्रॉसिटी अंतर्गत तात्काळ अटक होणार नाही- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली:  सर्वोच्च न्यायालयाने एससी आणि एसटी कायद्यांत मोठे बदल केले आहे. एससी/एसटी अॅक्टअंतर्गत प्रकरणातील व्यक्तीला यापुढे तात्काळ अटक करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.

आजपासून तीन दिवस शहीद भगतसिंग व्याख्यान माला

चिंचवड – आयुष्यभर रक्‍तदान, मरणोत्तर नेत्रदान ब्रीद घेऊन नेत्र सेवा प्रतिष्ठानने तीन दिवस शहीद भगतसिंग व्याख्यान माला आयोजित केली आहे. बुधवार दि. 21 ते शुक्रवार दि. 23 मार्चला काकडे पार्क, पोदार शाळेजवळ, चिंचवड येथे दररोज सायंकाळी ठीक साडेसहा वाजता व्याख्यान माला होईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे व्याख्यान मालेस प्रमुख उपस्थिती राहतील.

केशवराव घोळवे पॅनलचे थरमॅक्समध्ये निर्विवाद वर्चस्व

चौफेर न्यूज –  मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार थरमॅक्स लि. चिंचवड येथे थरमॅक्स कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक मतदानाद्वारे संपन्न झाली. या निवडणुकीकडे जिल्ह्यातील दिग्गजांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीमध्ये केशवराव घोळवे यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनल एकमताने निवडून आला.