Monday, 30 July 2018

प्लास्टिक वापरणार्‍यांकडून पाच लाखांचा दंड वसूल

पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या चार महिन्यातील कारवाई; थर्माकोल बंदीच्या अनुषंगाने अंमलबजावणी होणार अधिक तीव्र

सायकल शेअरिंगसाठी ४५ ठिकाणे

पिंपरी -स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेतर्फे शहरात सायकल सुविधा योजना (बायसिकल शेअरिंग) राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर ते वाकड रस्त्यासह क्षेत्रीय पायाभूत सुविधा तत्त्वावर निश्‍चित केलेल्या ४५ ठिकाणांची निवड केली आहे. त्यासाठी सायकल प्रायोजक कंपन्या आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. 

आयुक्तालयाची रचना निश्चित

पिंपरी : शहरात सुरू होत असलेल्या पोलिस आयुक्त कार्यालयाची अंतर्गत रचना निश्चित झाली आहे. नवनियुक्त आयुक्त हे पहिल्या मजल्यावर व नागरिकांशी संबधित सर्व विभाग हे तळमजल्यावर असणार आहेत. त्याचबरोबर अप्पर आयुक्त हे चिंचवड प्रेमलोकपार्क येथे असणाऱ्या आयुक्तालयात बसणार नसून, त्यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारतीची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. सध्याचे उपायुक्त कार्यालय किंवा चिंचवडगावातील कामठे चौकातील इमारतीत त्यांचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.

Police headquarters may be inaugurated after August 15

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad police commissionerat .. 

पिंपरी शहरात घुमू लागला ढोल-ताशांचा दणदणाट

पिंपरी - गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणरायाच्या स्वागतासाठी शहरातील ढोल-ताशांची पथके सराव करू लागली आहे. मानसिक ताण कमी करणे, आवड आणि पारंपरिक कला जोपासणे अशा विविध कारणांसाठी यात तरुणाईचा सहभाग वाढत आहे.

प्लॅस्टिकबंदी अंमलबजावणीसाठी ३२ पथके

पिंपरी - शहरात प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय चार याप्रमाणे ३२ पथके स्थापन केली आहेत. संबंधित बंदीला अनुसरून आवश्‍यक कार्यवाही करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. 

31 हजार वृक्ष लागवड पुर्ण

– महापालिकेचे उद्दिष्ट्य पुर्ण होणार का?
पिंपरी – महापालिका हद्दीत यावर्षी 60 हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. शहरात आत्तापर्यंत 31 हजार 419 वृक्ष लागवड करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे.

पिंपरीतील १०२ महिलांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन मंजुरी पत्रे वाटप

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विधवा, निराधार, अपंग आदी १०२ महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पेन्शन मंजूरी पत्रे वाटप पत्रे आज प्रदान करण्यात आली.

पाणीप्रश्‍नाविषयी दिले निवेदन

पिंपरी- चिंचवड स्टेशन, मोहननगर, काळभोर नगर व रामनगर येथील परिसरात वारंवार पाणी प्रश्‍न भेडसावत असतो. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होते आहे. या भेडसावणार्‍या पाणीप्रश्‍नासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निवासस्थानी जाऊन येथील रहिवाश्यांनी निवेदन दिले. आयुक्त कॉन्फरन्सकरिता बाहेरगावी गेले असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे पाणी समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले. सदर निवेदन देण्यास गणेश लगोटे, रमेश कोठारी, विक्रम वहिले, संतोष धावडे, उदय नामदे, यू.यम .ठाकने, दशरथ पोटघन, लक्ष्मण शिंदे, विकास काळे, शुभम नामदे, अशोक देवासी, मोहनराव नाईक व प्रकाश हजारे आदी रहिवासी उपस्थित होते.

अनधिकृत शाळांवर महापालिका करणार कारवाई

अधिनियमात जबर दंड आकारण्याची तरतूद
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 18 अनधिकृत शाळा असून या शाळांवर पालिका कारवाईचा बडगा उगारणार आहे. शाळा चालकांना नोटीसा देऊन त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली. तसेच शहरात आणखीन अनधिकृत शाळा आहेत का याचे पन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही, त्यांनी सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता अशा अनधिकृत शाळांकडून जबर दंड आकारण्याची तरतूद राज्य सरकारने पारित केलेल्या अधिनियमात केली आहे. त्यामुळे अशा गैरप्रकारांना आळा असेल, असा अंदाज होता. मात्र, या अधिनियमातील दंडाच्या तरतुदीचा कोणत्याही महापालिकेने वापरच न केल्याने ही तरतूद निष्प्रभ ठरली.

महापालिकेतील प्रवीण आष्टीकर आणि दिलीप गावडे यांच्याकडे 18-20 विभागांचे काम

अतिरिक्त व सहाय्यक आयुक्तांसाठी शासनाकडे केली मागणी
काम पूर्ण करण्यासाठी होते कसरत

सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे

नागरी हक्क सुरक्षा समितीची मागणी
पिंपरी- पिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना शहराची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी पालिकेच्यावतीने सद्यस्थितीत एकही हॉल अथवा नाट्यगृह उपलब्ध नाही. त्यामुळे पालिकेच्यावतीने हॉल उपलब्ध करून देण्याची मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत समितीच्यावतीने मानव कांबळे, दिलीप काकडे, प्रदीप पवार, उमेश इनामदार, गिरिधारी लढ्ढा, प्रताप लोके, अशोक मोहिते आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे.

बाल पर्यावरण संस्कार समितीची स्थापना

इसिएतर्फे राबविला उपक्रम
पिंपरी :एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनच्या पुढाकाराने आप्पा भानसे शिक्षण संस्थेच्या न्यू एंजल इंग्लिश स्कूल, तळवडे येथे विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाल पर्यावरण संस्कार समितीची स्थापना करण्यात आली. प्रसंगी शाळेतील 30 विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून निवडण्यात आले. त्यांना पर्यावरण पूरक साहित्य मोफत देण्यात आले. शाळेला पर्यावरण पूरक उपक्रमासाठी एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए) मार्फत सहकार्य करण्याबाबत शाळेला आश्‍वासन देण्यात आले. कार्यक्रमासाठी 350 विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या आवारात 25 देशी प्रजातीची झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. बकुळ, कडुलिंब सारक्या 10 फुट उंचीच्या झाडांचे रोपण नव्याने स्थापन केलेल्या बाल पर्यावरण संस्कार समितीच्या पर्यावरण दूतांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Pune transport body delays procurement of 1550 buses

PUNE: The transport utility Pune Mahanagar Parivahan Mahamandal (PMPML) is yet to procure 1,550 buses, including 550 air-conditioned ones, from the Association of State Road Transport Undertakings. It has been two years since the decision was taken.

हिंजवडीत वाहतूक कोंडी कायम

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधल्या फेज वनमधील इन्फोसिस सर्कल ते माणदरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. परंतु वाहतूक कोंडीचा प्रश्‍न जैसे थे आहे.

नैसर्गिक संपदा अधिकाधिक समृध्द करा : राहुल कलाटे

नवी सांगवी (पुणे) : " हरित क्रांती म्हणजे केवळ शेतीतून अन्नधान्य पिकविने असे नव्हे; तर सेंद्रीय खतांचा वापर करून आरोग्यवर्धक भाजीपाला लोकांपर्यंत पोहचवित असताना येणाऱ्या काळाची गरज पाहुन नैसर्गिक संपदा अधिकाधिक समृध्द करणे होय. " असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी वाकड येथे केले. पिंपरी चिंचवड सहकारी गृहनिर्माण सोसायटी फेडरेशनच्या वतीने वाकड परिसरात एक हजार वृक्षांचे रोपन करण्यात येत असताना आज ( ता. 29 ) रोजी त्याचा शुभारंभ रोहन तरंग सोसायटीतून करण्यात आला. त्यावेळी उपस्थित नागरिकांना उद्देशून त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपिठावर सहायक आयुक्त दिलिप गावडे, नगरसेवक मयुर कलाटे, संदिप कस्पटे, सुदेश राजे, डॉ द्वारकानाथ खर्डे, डॉ किरण मुळे उपस्थित होते. 

आमदार लांडगे यांचे जाधव यांच्यासाठी जोरदार लॉबिंग

पिंपरी  : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी- चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांच्या राजीनाम्यानंतर महापौर कोण होणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राहुल जाधव यांच्यासाठी माळी समाजाला पुढे करत जोरदार लॉबिंग केले आहे.  मात्र, महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ममता गायकवाड यांचे नाव अचानक पुढे आणून त्यांची वर्णी लावलेल्या आ.  लक्ष्मण जगताप यांच्या खेळयांची लांडगे समर्थकांना काहीशी भीती आहे.  ब्लॅक हॉर्सप्रमाणे ते आपल्या समर्थकाचे नाव महापौर पदासाठी पुढे आणू शकतात. 

महापौर पदावरून ‘कुणबी विरूध्द माळी’ संघर्ष!

पिंपरी (Pclive7.com):- पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपात सध्या कमालीचा संघर्ष सुरू झालायं. महापौर पदावरून पक्षात जातिय रंग चढू लागलायं. चिंचवडमधून कुणबी असलेले शत्रुघ्न काटे विरूध्द भोसरीतील माळी समाजाचे राहुल जाधव असा सामना सुरू आहे. हे पद आपल्याकडेच राखण्यासाठी भाजपमधील दोन आमदारांच्या गटाने प्रतिष्ठापणाला लावलीलआहे. त्यामुळे आता हे पद चिंचवडकडे जाते की भोसरीतच राहाते याकडे साऱ्या शहराचे लक्ष लागले आहे. 

महापौरपदावरून पिंपरीत खरे-खोटे ओबीसी संघर्ष

भाजपने कुणबी दाखल्यावर निवडून आलेल्या नगरसेवकास पहिले महापौरपद दिले.

#MarathaKrantiMorcha पिंपरी चिंचवड अघोषित बंदला हिंसक वळण

पिंपरी : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवडगाव येथे फक्‍त श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. मात्र सोशल मिडियावरून पिंपरी चिंचवड बंद असल्याचे मेसेज फिरत होते. चिंचवडच्या वाल्हेकरवाडी भागात एका टोळक्‍याने दहा ते बारा दुकानांवर दगडफेक करीत दहशत निर्माण केली. तर फुगेवाडी परिसरात बसवर दगडफेक करण्यात आली. यामुळे अघोषित बंदला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. 

प्लास्टिक, थर्माकोल खाणाऱ्या अळ्यांचा शोध

पुण्यातील संशोधकाचे पर्यावरणपूरक योगदान