Monday, 13 May 2013

वीस वर्षापूर्वीचा तो विश्वविक्रम...!

वीस वर्षापूर्वीचा तो विश्वविक्रम...!

देहुरोडमधील मिलिंद देशमुख म्हणजे बजाज ऑटो कंपनीत नोकरीस असलेला एक सर्वसमान्य
कामगार ! अशा परस्थितीत अंधश्रध्दा व अज्ञात समाजातून दूर व्हावे, हे देशमुख यांनी
उराशी बाळगलं ध्येय होतं. त्यावेळी एखाद्या आजाराच्या विषाणूप्रमाणे समाजाच्या
पोटात जाऊन त्याला पोखरण्याचं काम अंधश्रध्दा करीत होती.

हापूसचा दर उतरला

हापूसचा दर उतरला: व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत असला तरी आंब्याच्या खरेदीसाठी मात्र रविवारी फळबाजार गर्दीने फुलून गेला होता. आंब्याचा भाव उतरल्याने पुणेकरांनी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने मनसोक्त खरेदी केली.

पारा चढल्याने भाज्या महागल्या

पारा चढल्याने भाज्या महागल्या: घेवडा १४० रुपये...दोडका ८० रुपये...हिरवी मिरची ६० ते ७० रुपये...कारली, भेंडी, गवार, ६० रुपये...आणि कोथिंबीर जुडी २० रुपये तर, मुळा २५ रुपये जुडी ! भाज्यांचे हे प्रति किलोचे भाव आहेत किरकोळ बाजारातले.

पिंपरीत लोकसभेपूर्वीच विधानसभेची फिल्डिंग

पिंपरीत लोकसभेपूर्वीच विधानसभेची फिल्डिंग: काँग्रेसने चिंचवडऐवजी पिंपरीसाठी केलेले सुतोवाच, शिवसेनेचे भोसरीत नाटय़मय वळण, भाजपचा पिंपरीऐवजी भोसरीवर डोळा, चिंचवडला वाढलेले इच्छुक, पिंपरीतील त्रांगडे, भोसरीला तापलेले वातावरण आदी घडामोडी पाहताआमदारकीच्या डावपेचांना उधाण आल्याचे दिसते.

अपुर्‍या पाणीपुरवठय़ाने नागरिकांचे हाल

अपुर्‍या पाणीपुरवठय़ाने नागरिकांचे हाल: पिंपरी । दि. १२ (प्रतिनिधी)

गेले दोन दिवस कमी दाबाने व अल्प वेळ पाणी येत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. पाण्याअभावी रहिवाशी, व्यावसायिकांचे हाल झाले. दोन दिवसांपासून शहरातील विविध भागांत कमी दाबाने व अल्प पाणीपुरवठा होत आहे. तर काही भागांत सकाळी, तर काही भागांत संध्याकाळी पाणीच आले नाही. त्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. ऐन साप्ताहिक सुटी दिवशी शनिवारी व रविवारी कमी प्रमाणात पाणी आले. पिण्याचे पाणी नसल्याने बोअरींगच्या पाण्याचा वापर रहिवाशांना करावा लागला. विशेषत हॉटेल व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली. हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांना विचारूनच पाणी दिले जात होते.

गळतीने गॅसवाहिनीस आग

गळतीने गॅसवाहिनीस आग: नेहरुनगर । दि. १२ (वार्ताहर)

मासुळकर कॉलनी येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस वाहिनीच्या व्हॉल्व्ह मधून घरगुती गॅसची गळती होऊन आग लागल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. वेळीच उपाययोजना केल्याने मोठी दुघर्टना टळली.

रविवारी सकाळी ६.४५ च्या दरम्यान झिरोबॉईज चौकाच्या काही अंतरावर नेहरूनगर मासुळकर कॉलनी रस्त्यावर ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शनी सांगितलेल्या माहितीनुसार, सकाळी एका अज्ञात इसमाने गॅसवाहिनी असलेल्या खड्डय़ामध्ये कचरा जाळला व येथून गॅसची गळती होणार्‍या वाहिनीने अचानक पेट घेतला. या गॅसच्या ‘प्रेशर’चा मोठा आवाज दूरपर्यंत नागरिकांना ऐकू येत होता.

आयोगाची आज महापालिकेला भेट


आयोगाची आज महापालिकेला भेट

from Esakal 

पिंपरी - राज्य सरकारच्या वतीने मागासवर्गीयांसाठी जाहीर करण्यात येणाऱ्या विविध योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते की नाही, याचा आढावा घेण्यासाठी अनुसूचित जाती व जमाती आयोग पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्राधिकरणाला सोमवारी (ता.

बाह्यरुग्णांची सोय छे! होणार गैरसोय


बाह्यरुग्णांची सोय छे! होणार गैरसोय

from Esakal 

पिंपरी - तालेरा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण होत आले आहे परंतु त्यात बाह्यरुग्णांची गैरसोय कशी होईल, याकडे लक्ष देण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे.

नगरसेवकांनो, नागरिक दुधखुळे नाहीत


नगरसेवकांनो, नागरिक दुधखुळे नाहीत

from Esakal 

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामे होण्याला महापालिका प्रशासनाएवढेच नगरसेवकही जबाबदार आहेत, हे उघड गुपित आहे.

व्यापाऱ्यांमध्ये फूट?


व्यापाऱ्यांमध्ये फूट?

from Esakal 

पिंपरी - एलबीटी करामुळे सुरू असलेला "बंद', त्यातच काही घाऊक विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीमुळे अनेक किरकोळ व्यापारी वैतागले आहेत.

आमदारकीसाठी मतदारांना "ऑनलाइन' साद


आमदारकीसाठी मतदारांना "ऑनलाइन' साद

from Esakal 

पिंपरी - विधानसभा निवडणुकीला तब्बल दीड वर्षाचा अवधी असतानाही पिंपरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी "सोशल मीडिया'चा आधार घेत मतदारांना साद घालण्यास सुरवात केली आहे.

उपायुक्त कार्यालयात किरकोळ आगीची घटना


उपायुक्त कार्यालयात किरकोळ आगीची घटना

from Esakal 

उपायुक्त कार्यालयात किरकोळ आगीची घटनापिंपरी - पिंपरी-चिंचवडचे पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या कार्यालयाच्या दरवाजाजवळील वायरिंगने शॉर्टसर्किटमुळे रविवारी (ता.

Minor fire at DCP''s office in Chinchwad

Minor fire at DCP''s office in Chinchwad: A minor fire broke out at the office of Deputy Commissioner of Police (Zone III) Shahaji Umap due to short circuit on Sunday afternoon.