Thursday, 23 August 2018

डेअरी फार्मच्या जागेत रेल्वे जंक्‍शन उभारा- आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी – पिंपरी रेल्वे स्थानकालगत सैन्य दलाचा डेअरी फार्म आहे. हा डेअरी फार्म बंद करण्यात आल्याने डेअरी फार्मची शेकडो एकर जमीन पडून आहे. या जागेवर जंक्‍शन उभारून मोठे रेल्वे स्थानक येथे निर्माण करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

'महामेट्रो' कडून महापालिकेच्या नोटिसेला केराची टोपली


#PollNigdiDapodiBRT 6 वर्षांपूर्वीचा बीआरटी प्रकल्प आजमितीस खरंच आवश्यक आहे का?

#PollNigdiDapodiBRT तुम्हाला काय हवे? १) निगडी-दापोडी बीआरटी का २) निगडी-शिवाजीनगर मेट्रो... दोन्ही प्रकल्प केल्यास अनेक अडचणी निर्माण होतील! सजग पिंपरी-चिंचवडकर नागरिकांची मते आम्ही #PCMCFirst फेसबुक ग्रुपद्वारे जाणून घेत आहे, आपले मत जरूर नोंदवा

Eye on electric vehicles’ boom, industries in Pimpri-Chinchwad take steps to prepare

With an aim to prepare for the upcoming boom in electric vehicles, the Forum of Small Scale Industries Association — an umbrella body of industries in Pimpri-Chinchwad — has decided form a special consultancy cell to help entrepreneurs in the sector. Abhay Bhor, president of the forum, said they have asked for setting up of Udyog Kendras as one-stop shops for all consultancy and policy-related work for the sector in Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) centres.

No more, says Pimpri Chinchwad civic body as it stops wet garbage collection from societies

Around 1,100 societies in the Pimpri Chinchwad municipal corporation (PCMC) area have received a notice from the civic body stating that from September 20, PCMC will not collect wet garbage from their societies and that it has to be processed on the society premises.
pune,Pimpri Chinchwad,wet

होय, मेट्रोनं महापालिकेचं नाक कापलं

पुणे मेट्रो आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातील समन्वयाचा अभाव वारंवार दिसतो. परवानगीविना बीआरटी मार्गात अतिक्रमण करून, तोडगा म्हणून रस्त्याच्या मधोमध पिलर घेऊन आणि महापालिकेच्या नकाराला न जुमानण्याचा उद्दामपणा करून मेट्रोने खरंच महापालिकेचं नाक कापलंय. आणि महापालिकेचे आयुक्त, प्रशासन आणि पुढारीही कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या बीआरटीला खड्ड्यात घालून मेट्रोला डोक्यावर घेऊन नाचत आहेत.


मेट्रोचे कामकाज म्हणजे पालिकेचा नियोजनशून्य व ढिसाळ कारभार : साने

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोरील रस्त्यावर काम करु नये असे आदेश दिले असताना महामेट्रोकडून बॅरीकेटस् लावून बीआरटीच्या मार्गात खोदाई सुरु आहे. यावरुन पालिकेचा नियोजनशून्य व ढिसाळ कारभार असल्याची, टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. तसेच मेट्रोचे काम थांबविण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

After nearly six-year delay: Nigdi-Dapodi BRTS route to open Friday

The Nigdi-Dapodi BRTS route, which has been delayed for nearly six years, will start services from Friday.

निगडी-दापोडी प्रशस्त मार्गही पडतोय अपुरा

ग्रेडसेपरेटर, बीआरटीएस आणि पुणे मेट्रोच्या मार्गिकेमुळे पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील निगडी ते दापोडी हा रस्ता वाहतुकीस सध्या अपुरा ठरत आहे. परिणामी, 180 फुटांचा प्रशस्त रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. एकेकाळी शहराच्या नावलौकीकात भर टाकणारा हा प्रशस्त मार्ग आता शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. 

स्पाइन रस्त्याला ३०० मीटरचा ‘खोडा’

पिंपरी - पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई महामार्ग जोडण्यासाठी नवनगर विकास प्राधिकरणाने स्पाइन रस्ता उभारला आहे. मात्र, महापालिका आणि प्राधिकरण यांच्या त्रिवेणीनगर येथील डीपी प्लॅनमध्ये फरक आहे. त्यामुळे काही नागरिकांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीतील केवळ तीनशे मीटरचा रस्ता सुमारे पंधरा वर्षांपासून रखडला असून, स्पाइन रस्त्याच्या मार्गात तो मोठा अडथळा ठरत आहे. 

घातक रासायनिक कचरा नदीतील पाण्यात मिसळला जातोय

औदयोगिक चाकण परिसरातून जाणार्‍या नदी पात्रात मोठ्या प्रमाणात होते प्रदुषण 
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने केली पाहणी
चाकण : गेल्या अनेकवर्षांपासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पर्यावरण अभ्यासक औदयोगिक नगरी व शहरवासियांची जीवनदायिनी असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत प्रबोधन व जागरूकता आणण्याचे काम करीत आहेत. यामुळे मावळ, देहू आळंदी परिसरातील नागरिक बर्‍यापैकी इंद्रायणी स्वच्छतेबाबत जागरुक झाल्याचे मागील दोन वर्षांमध्ये दिसून आले. परंतु औदयोगिक चाकण परिसरातून जाणार्‍या नदी पात्रातील ठिकाणी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे औदयोगिक घातक रासायनिक कचरा नदीतील पाण्यात मिसळत आहे. समिती पर्यावरण विभाग सदस्य विजय पाटील, विजय मुनोत, मोहन भोळे, संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी यांनी चाकण इंद्रायणी नदी परिसरात पाहणी केली असता खालील महत्वपूर्ण बाबी निदर्शनास आल्या.

पवना धरणातून 4785 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

नदी काठच्या गावांना सावधनतेचा इशारा
वडगाव मावळ : गेल्या काही दिवसांपासून पवना धरण परिसरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातून 4785 क्यूसेक या वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासियांची तहान भागविण्यारे पवना धरण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 100 टक्के भरले आहे. त्यामुळे शहरवासीयांसह मावळ परिसरातील नागरिकांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्‍न संपला आहे. एक जूनपासून 2774 मिमी पाऊस धरण परिसरात झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 2582 मिमी पाऊस झाला होता.

New WhatsApp number for complaints on traffic issues

The newly established Pimpri Chinchwad police commissionera ..

‘रेरा’तील प्रकल्प वैधतेमुळे ‘बिल्डर’ वठणीवर

रेरा कायदा लागू झाल्यापासून प्रत्येक नोंदणीकृत प्रकल्पाची माहिती महारेरा पोर्टलवर अगदी सहज उपलब्ध झाली आहे. बांधकाम प्रकल्प वैधतेची माहिती ग्राहकांना अगदी सहजरित्या उपलब्ध होत असल्याने मनमानी करणारे बिल्डर वठणीवर आले आहेत. 

पिंपरी शहरात बकरी ईद उत्साहात

पिंपरी - अत्तराचा सुंगध आणि अल्लाहचे नामस्मरण अशा वातावरणात शहरातील मशिदी आणि ईदगाह मैदानांवर सामूहिक नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी बकरी ईद उत्साहात साजरी केली. सामाजिक सलोखा, अल्लाहप्रती निष्ठा, त्याग, समर्पण व मानवतेचा संदेश मौलवींनी दिला.

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीतर्फे वाहतूकीचे धडे

पिंपरी-गेल्या दोन महिन्यांपासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे वाहतूक स्वयंसेवक चाकण विभागामध्ये महत्वाच्या चौकांमध्ये तसेच उद्योगनगरी परिसरामध्ये वाहतूक व प्रदूषण समस्यांचे निरीक्षण करीत आहेत .त्याचप्रमाणे बेशिस्त वाहनचालकांना शिस्तीचे धडे देत आहेत. समिती अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय मुनोत, ऍड.विद्या शिंदे, जयेंद्र मकवाना, जयप्रकाश शिंदे,संतोष चव्हाण, अर्चना घाळी, विशाल शेवाळे,समीर चिले, अजय घाडी,बाबासाहेब घाळी, तेजस सापरिया, राजेश बाबर, सतीश मांडवे,भारत उपाध्ये, मंगेश घाग, संदीप सकपाळ,सतीश देशमुख,लक्ष्मण इंगवले,नितीन मांडवे,तुकाराम दहे, अमित डांगे आदी स्वयंसेवक सहभागी झाले होते.

समाविष्ट पोलीस ठाण्यांना वाहनांची प्रतिक्षा

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात समावेश झाल्यानंतरची परिस्थिती
मनुष्यबळाबाबत अजुनही घडी बसलेली नाही
देहूरोड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ग्रामीणमधील देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी आणि चाकण ही चार पोलीस ठाणी समाविष्ट करण्यात आली आहेत. स्वातंत्र्यदिनी आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार सुरू झाला. त्यामुळे या चार पोलीस ठाण्यांचे कामकाजही आयुक्तालयांतर्गत सुरू झाले. पण पाच दिवसांनंतरही या पोलीस ठाण्यांना ग्रामीणची वाहने वापरावी लागत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी आणि चाकण या पोलीस ठाण्यांचे कामकाज नव्या आयुक्तालयांतर्गत सुरू झाले. पोलीस ठाण्यातील संदेश आयुक्तालयाच्या कंट्रोलला जाऊ लागले. पण इतर सुविधा आणि मनुष्यबळाबाबत अजुनही या पोलीस ठाण्यांची घडी बसली नसल्याचे चित्र आहे. पोलीसांना पुर्वीची ग्रामीणचीच पोलीस वाहने वापरावी लागत आहेत. ग्रामीणकडून देण्यात आलेली अतिरिक्त वाहने, बीट मार्शलची वाहने काढून घेण्यात आली आहेत. अयुक्तालयाकडून पोलिसांना नव्या वाहनांची प्रतिक्षा आहे.

महापालिका आयुक्‍त, पोलीस उपायुक्‍तांना समन्स

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील हातगाडी, टपरी, स्टॉलधारकांवर महापालिकेकडून पोलीस बळाचा वापर करून गुन्हेगारांप्रमाणे होत असलेल्या कारवाईमुळे मानवी हक्कावर गदा येत असून घटनेने दिलेल्या स्वयंरोजगाराच्या अधिकाराची पायमल्ली होत असल्याची महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने केली होती. त्याची दखल घेत महाराष्ट्र मानवी हक्‍क आयोगाने महापालिका आयुक्‍त व पोलीस उपायुक्‍तांना समन्स बजावले आहे. 1 सप्टेंबर 2018 रोजी त्यांना आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Corporators to donate Rs 20 lakh

PIMPRI CHINCHWAD: The corporators of Pimpri Chinchwad Municipal Corporation will be donating one month’s honorarium each — amounting to about Rs 20 lakh — for the Kerala relief efforts.

ट्रेन कुठे आहे? आता मिळणार लाईव्ह स्टेट्स व्हॉट्सअॅपवर

ट्रेनची माहिती मिळविण्यासाठी आता १३९किंवा अन्य कोणत्याही अॅपवर जाण्याची यापुढे गरजच उरलेली नाही. कारण आता ट्रेनचा लाईव्ह स्टेटस, पीएनआरची माहिती आपल्या जिवाभावाच्या व्हॉट्सअॅपवर सहज मिळणार आहे. यासाठी रेल्वेने MakeMyTrip या वेबसाईटसोबत सामंजस्य करार केला आहे.

15 व्या वित्त आयोगाच्या सदस्यांनी घेतली ‘स्क्वॉडा’ प्रकल्पासह ‘पुणे मेट्रो’ प्रकल्पाची माहिती

पंधराव्या वित्त आयोगाच्या सदस्यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या ‘स्क्वॉडा’ पाणी पुरवठा प्रकल्पाची पाहणी करून या प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती घेतली. त्याच बरोबर त्यांनी ‘पुणे मेट्रो’ प्रकल्पाची माहिती घेवून या कामाचा आढावा घेतला.

कॉलेज, विद्यापीठांत अजूनही ‘जंक फूड’

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये 'जंक फूड' देऊ नये, या विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतलेल्या निर्णयाला कॉलेज आणि विद्यापीठांनी केराची टोपली दाखविल्याने 'यूजीसी'ने पुन्हा विद्यापीठांना स्मरणपत्र पाठवले आहे. तसेच या संदर्भात काय कार्यवाही केली, त्याची माहिती विद्यापीठाने द्यावी, अशा सूचना 'यूजीसी'ने केल्या आहेत.

रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांच्या सूचना विचारात घ्या

उच्च न्यायालयाचे आदेश ; ‘तक्रार निवारण यंत्रणा’ स्थापन करावी
पुणे : महापालिकांनी यांच्या अखत्यारीतील सर्व रस्ते सुस्थितीत ठेवावेत. खड्डे शास्त्रोक्तपद्धतीने बुजवावेत. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांकडून प्राप्त होणार्‍या तक्रारी स्वीकारण्यासाठी व त्यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी ‘तक्रार निवारण यंत्रणा’ सर्व महापालिकांनी कार्यन्वित करावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

संततधार पावसाने रस्त्याची पुन्हा चाळण

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथे संततधार पावसामुळे मुळानदी किनारा रस्त्यावर खड्डे पडुन रस्त्याची चाळण झाली आहे. नागरिकांना खड्डे, रस्त्यावर पसरलेली खडी यातुन रहदारी करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. याचबरोबर मधुबन सोसायटी अंतर्गत रस्त्यांच्या संथ गतीने सुरू असलेल्या काम, पद पथांच्या कामामुळे मधुबन रहिवाशांना रहदारीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुळानदी किनारा रस्त्याचे एप्रिल मे महिन्यादरम्यान भुमिगत ड्रेनेज लाईनचे काम झाले होते. यानंतर पालिका स्थापत्य विभागाकडुन खडी व डांबरीकरण करून केलेल्या कामाची दुरूस्ती केली होती.