Saturday, 9 June 2018

‘एचए’च्या कामगारांना मुलांच्या शिक्षणाची चिंता

दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. मुले चांगल्या गुणांनी उत्‍तीर्ण झाली आहेत. पुढे इंजिनिअरिंग व मेडिकलसाठी प्रवेश घ्यायची मुलांची इच्छा आहे; मात्र कंपनीकडून पगारच झालेला नाही. त्यामुळे मुलांना पुढे प्रवेश कसे घ्यायचे? असा सवाल ‘एचए’ कामगार विचारत आहेत. 

भाजपच्या ‘फरार’ नगरसेवकांमुळे क्रीडा समिती सभा रद्द

पिंपरी (Pclive7.com):- गंभीर गुन्हे दाखल असलेल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे दोन नगरसेवक सध्या फरार आहेत. क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे आणि सदस्य सुजाता पालांडे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मात्र आज महापालिकेत होणाऱ्या क्रीडा समितीच्या बैठकीला हे दोघेही उपस्थित राहणार की नाहीत, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आजची सभाच चक्क रद्द करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपावर ओढावली आहे.

जागेचा मालकी हक्क नसताना पिंपरी महापालिकेकडून बिल्डरला बांधकाम परवानगी

पिंपरी -चिंचवड महापालिकेचा सर्वाधिक बदनाम असलेला नगररचना विभाग स्थानिक शेतकऱ्यांना वेड्यात काढून बिल्डरांच्यासाठी कशा प्रकारे पायघड्या घालते, याचे एक ज्वलंत उदाहरण समोर आले आहे. मुंबईतील एका बिल्डरला वाकडमध्ये गृहप्रकल्प उभारण्यासाठी कागदपत्रांच्या आधारे एका सर्व्हे क्रमांकावर परवानगी दिली. प्रत्यक्षात हे बांधकाम दुसऱ्याच सर्व्हे क्रमांकावर सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जागेच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात वाद सुरू असताना नगररचना विभागाने बांधकामांसाठी एफएसआय देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे जागेच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात दावा दाखल केलेले शेतकरी महेश भुजबळ यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेने दिलेली बांधकाम परवानगी रद्द न केल्यास कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सोमवारी महापालिका कामगारांची पिंपरीत राज्यस्तरीय बैठक

राज्यभरातील सर्व महापालिका व नगरपालिकेतील कामगार संघटनांच्या प्रमुख पदाधिका-यांची राज्यस्तरीय बैठक शनिवारी (दि.9) पिंपरीत आयोजित केली आहे, अशी माहिती महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड दर्शन बस खरेदीला विरोध !

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी पिंपरी चिंचवड दर्शन बस खरेदी करण्याचा विषय काल पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीने घेतला मात्र त्यास शहरातून विरोध होत आहे. 

मॉल-मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग शुल्क नको

मॉल, मल्टिप्लेक्स तसेच हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य नागरिकांना पार्किंग शुल्क आकारण्यात येऊ नये, अशी भूमिका शहर सुधारणा समितीने घेतली आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने स्वतंत्र धोरण तयार करून ते समितीपुढे सादर करावे, अशा सूचना शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आली आहे. सध्या शहरातील ३५ मॉल-मल्टिप्लेक्सपैकी १२ ठिकाणी पार्किंग शुल्क आकारण्यात येत नाही. पार्किंग शुल्काच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांची लूट होत असल्याने ती टाळण्यासाठी धोरण तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा शहर सुधारणा समितीने केला आहे.

वाकडमध्ये वर्षाला हजार गुन्ह्यांची नोंद

सर्वाधिक गुन्हे दाखल होणाऱ्या वाकडपोलिस ठाण्याची हद्द विस्तिर्णपणे पसरलेली आहे. दीड ते दोन हजार मोठे गृहप्रकल्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतात. रहाटणी, थेरगाव, कस्पटेवस्ती, वाकड, पुनावळे, ताथवडे याभागातील उच्चभ्रू लोकवस्ती तर दुसरीकडे काळेवाडी गावठाण यामुळे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. 


‘साहेब, फ्लेक्सच्या कामाचे पैसे द्या ना!’

कोणतेही कर्तृत्व नसताना केवळ मिरवून घेण्यासाठी फ्लेक्सद्वारे केल्या जाणाऱ्या जाहिरातबाजीचा आधार राजकारणी मंडळी हमखास घेतात. मात्र, ज्यांच्याकडून फ्लेक्स तयार करून घेतले जातात, त्यांचे कामाचे पैसे बुडवण्याचे उद्योग अनेक राजकारणी व त्यांच्या बगलबच्च्यांनी केले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात अशा बुडवेगिरीमुळे त्रस्त झालेले फ्लेक्स व्यावसायिक एकत्र आले आहेत. त्यांच्याकडील माहिती समाजमाध्यमावर प्रसारित करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. धुळ्यात एका व्यावसायिकाने पैसे वसूल करण्यासाठी केलेला असा प्रयोग भलताच यशस्वी ठरल्याने तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पिंपरीतील पैसे बुडव्यांची माहिती जाहीर करण्याची मानसिकता येथील व्यावसायिकांची झाली आहे.

पालखी सोहळय़ांना देणाऱ्या भेटवस्तूंची पिंपरीत अधिकारी, पदाधिकाऱ्यांना धास्ती

पिंपरी पालिकेच्या वतीने पालखी सोहळय़ांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंची यंदा अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी भलतीच धास्ती घेतली आहे. राष्ट्रवादीची सत्ता असताना विठ्ठलमूर्ती खरेदीवरून तर भाजपच्या हातात सूत्रे आल्यानंतर सतरंजी खरेदीतील गैरव्यवहारावरून झालेल्या गंभीर आरोपांमुळे या वर्षी भेटवस्तू खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, लागलीच संभाव्य टीकेच्या भीतीने भेटवस्तू खरेदी केली पाहिजे, असा दुसरा विचारही पुढे आल्याने यावरून खल सुरू आहे.

वल्लभनगर आगारात प्रवाशांचे हाल

पिंपरी - एसटी कामगारांच्या संपामुळे वल्लभनगर आगारामधून राज्यातील विविध मार्गावर सकाळपासून एकही बसगाडी धावली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तिकिटाचे आगाऊ नोंदणीचे पैसे प्रवाशांना परत देण्याची एसटी प्रशासनावर वेळ आली. 

यंदा दिंड्यांना महापालिका देणार तंबू

पिंपरी – आषाढीवारीत दिंड्यांना यंदा तंबु भेट देण्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विचाराधिन आहे. मात्र, या वस्तु खरेदीवरून कोणताही गदारोळ, आरोप होऊ नये, याकरिता विरोधी पक्षनेते व सर्व गटनेत्यांच्या उपस्थितीत या तंबुंची तपासणी, बाजारभाव व महापालिकेने खरेदी केलेला दर याची शहानिशा करुनच तंबू वाटप केले जातील, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांना दिली.

बेकायदा नर्सिंग होम, रुग्णालयांना बसणार आळा

मुंबई – राज्यातील बेकायदा नर्सिंग होम आणि रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच क्‍लिनिकल एस्टाब्लिशमेंट ऍक्‍ट संदर्भात निर्णय घेतला जाईल. याबाबत तीन आठवड्यात योग्य तो निर्णय घेतला जाई, अशी हमी राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. तसेच आतापर्यंत अशा बेकायदा तीन हजार रुग्णालये आणि नर्सिंग होमवर कारवाई करण्यात आली असून उर्वरित तीन हजार रूग्णालयांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केले. याची दखल घेऊन न्यायालयाने आतापर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.

पीएमआरडीएच्या हद्दीत अग्निशमन सेवा

पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील नागरिकांना अग्निशमन सेवा देण्यासाठी पाऊले उचलेली आहेत. त्यानुसार वाघोली, नांदेड (ता. हवेली), हिंजवडी आणि मारुंजी (ता. हवेली) या चार ठिकाणी लवकर अग्निशमन केंद्र लवकर सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रांमुळे किमान 25 किलोमीटरच्या परिसरातील 50 गावांतील सहा लाख नागरिकांना अग्निशमन सेवा उपलब्ध होणार आहे.

27 भाडेकरुंकडे सुमारे 88 लाखांची थकबाकी

पिंपरी – ग प्रभाग कार्यालयांतर्गत विविध ठिकाणच्या भाजी मंडई व मच्छी मार्केटमधील एकूण 27 भाडेकरुंकडे 87 लाख, 92 हजार, 586 रुपयांची थकबाकी आहे. येत्या 14 दिवसांत हा थकबाकीदारानी ही रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा समावेश आहे. या शाळेकडे सर्वाधिक 52 लाख, 96 हजार, 800 रुपये एवढी थकबाकी आहे.

थिसेनक्रुप पतसंस्थेच्या सभासदांना 9 टक्के लाभांश जाहीर

    पिंपरी ः थिसेनक्रुप इंडस्ट्रीज कामगार सहकारी पतसंस्थेची 55 वी वार्षिक सर्व साधारण सभा नुकतीच पार पडली. सभासदांना 9 टक्के दराने लाभांश जाहीर करण्यात आला.

महापालिकेच्या शाळेत वृक्षारोपण

    पिंपरी ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशनच्या वतीने महापा लिकेच्या पिंपरीगावातील शाळेच्या मैदानावर अशोका, कडू लिंबांचे रोपण करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा किरण जाधव, सचिन जाधव, दिपक साबळे, अजय बेडगे, आलिशा आर्धाडकर, महेश जांभळे, शादाब सय्यद आदी उपस्थित होते.

पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा सव्वा वर्षांतील कारभार निराशाजनक

    चिंचवड ः  चिंचवडगावातील चापेकर चौकात गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीची समस्या गंभीर होत चालली आहे. या चौकात भुयारी मार्गाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, या मार्गात किती गाळे काढायाचे याबाबत स्थानिक नगरसेवकांमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचे काम रखडले असून झारीतील शुक्राचार्य कोण? असा खडा सवाल ज्येष्ठ नागरिक रमेश देव यांनी केला आहे.

आषाढीवारी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध होणार – नितीन काळजे

चौफेर न्यूज  – आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त येणा-या सर्व वारकऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या सोईसुविधा महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. स्थायी समिती सभागृहात झालेल्या आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत समारंभ व पालखी मुक्कामाचे नियोजनाच्या आढावा बैठकप्रसंगी ते बोलत होते.

भोसरीतील वीज पुरवठा सक्षमीकरणासाठी २९५ कोटींचा निधी

चौफेर न्यूज –  भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत वीज पुरवठा सक्षमीकरण आणि भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामासाठी केंद्र सरकारच्या उर्जा मंत्रालयाने तब्बल २९५ कोटी रुपयांच्या निधीला ‘हिरवा कंदील’ दाखवला आहे.  राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य आणि आमदार महेश लांडगे यांनी दिली.